आपल्या सर्वांना मिठाई किंवा गोडाचे पदार्थ खूपच आवडतात. विशेषतः घरी बनवलेले आरोग्यदायी आणि पौष्टिक गोडाचे पदार्थ म्हणजे सर्वांचेच लाडके. मात्र, ज्यांना मधुमेह किंवा हृदयाशी संबंधित आजार असतात अशांना गोडाचे पदार्थ खाण्यावर पूर्णतः बंदी असते. मात्र असे असताना, आहारतज्ज्ञ तन्वी तुतलानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरून मधुमेही आणि हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींनादेखील चालेल अशा दुधी हलव्याची रेसिपी शेअर केली, तेव्हा ते पाहून आश्चर्य वाटले. तन्वी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये, “मधुमेही, हृदयरोगी, फिटनेस उत्साही आणि लहान मुले सर्वांसाठी परफेक्ट हलवा”, अशी कॅप्शन दिली होती.

मात्र, दुधी हलवा किंवा आहारात दुधी एक चांगली भाजी का म्हटली जाते ते पाहू.

दुधी या भाजीला खरे तर विशेष चव नसली तरीही यामध्ये भरपूर पोषक घटक उपलब्ध आहेत. “दुधीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ते शरीराला हायड्रेट ठेवून, भूक नियंत्रणास मदत करते. तसेच, या भाजीमध्ये फायटोकेमिकल्स [phytochemicals] घटक आणि अँटीइन्फ्लामेंट्री गुणधर्म असल्याने, ही भाजी शरीरात निर्माण होणारा ताण कमी करण्यास मदत करते. ही क्रिया हृदयाचे आरोग्य जपण्यास मदत करते”, अशी माहिती मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमधील पी. डी. क्लिनिकल आहारतज्ज्ञ चैताली राणे यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिली असल्याचे समजते.

curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
4 Essential Tests Every Woman Over 20 Should Do
हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी विसाव्या वर्षापासून प्रत्येक महिलेने कराव्यात ‘या’ चार चाचण्या; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात… –
Which of the raw and pasteurized milk is beneficial
कच्चे व पाश्चराइज्ड यापैकी कोणते दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून…
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
Is thirst a good predictor of dehydration
तहान लागते म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते का? तज्ज्ञांनी केला खुलासा…
Can drinking water with food cause gas or indigestion
जेवताना पाणी प्यावे का? जेवताना पाणी प्यायल्याने अपचनाचा त्रास होतो का? डॉक्टरांकडून घ्या जाणून…
What is the right time to have breakfast
सकाळी ८ ते १० नाही, तर नाश्त्याची ही वेळसुद्धा ठरू शकते फायदेशीर? वाचा तज्ज्ञांचे मत…

हेही वाचा : द्राक्षांवरील जंतू कसे घालवायचे? ‘व्हिनेगर अन् सोडा’ खरंच ठरतो उपयोगी? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…

मधुमेह आणि हृदयरोगासारख्या आजारांना नियंत्रित ठेवण्यात चांगले कोलेस्ट्रॉल महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच रक्तातील साखरेची योग्य पातळी राखण्यासाठी चरबीयुक्त पदार्थांपासून दूर राहणे हे अत्यंत महत्वाचे असते. “मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयाच्या आरोग्याशी निगडित समस्यांचा सामना करणाऱ्या व्यक्तींसाठी दुधी फायदेशीर असतो”, असे गुरुग्राम येथील मरेंगो एशिया हॉस्पिटल्सच्या वरिष्ठ सल्लागार, पोषण व आहारशास्त्राच्या डॉ. नीती शर्मा यांनी सांगितले.

दुधीसारख्या भाजीमध्ये शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक, जसे की पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, तसेच बी कॉम्प्लेक्स व सी जीवनसत्त्वे यांसारखे घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. “चरबीचे प्रमाण कमी आणि फायबरचे प्रमाण अधिक असणाऱ्या दुधीचा आहारात समावेश केल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी ते उत्तम ठरते. या भाजीमुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होऊन, रक्त नियमन आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास फायदा होतो”, असे मुंबईतील न्यूट्रिशनिस्ट व क्वालिटी ॲश्युरन्स एक्झिक्युटिव्ह, आर्या जागुष्टे म्हणतात.

दुधी शरीरातील मुक्त अॅसिड रेडिकल्सची निर्मिती कमी करते; ज्याचा सकारात्मक परिणाम इन्सुलिनच्या संवेदनशीलतेवर होतो. परिणामी अपचन, अल्सर, तणाव व नैराश्य अशा समस्या टाळण्यास आणि नियंत्रित करण्यास मदत होते. मात्र, दुधी हलवा संतुलित प्रमाणात खाणे खरेच शरीरासाठी चांगले असते का हे जाणून घ्या.

मधुमेहींच्या प्रकृतीसाठी दुधी हलवा खाणे चांगले आहे का?

दुधी हलवा हा प्रथिने आणि फायबरचे उत्तम मिश्रण आहेत. “मधुमेही रुग्णांना रोजच्या आहारात मदत करणारी ही एक रेसिपी आहे. या रेसिपीचा सर्वांत चांगला भाग असा की, यामध्ये शरीरास आवश्यक असणारे कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि एमसीटी किंवा तुपातील मध्यम-साखळी ट्रायग्लिसराइड्सच्या [medium-chain triglycerides] रूपात चांगली चरबी यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत”, असे राणे यांचे म्हणणे आहे.

दुधी हलवा खाताना / बनविताना कोणती काळजी घ्यावी?

डॉक्टर शर्मा यांच्या मते- दुधी हलवा खाणे हे मधुमेही किंवा हृदयरोग्यांसाठी अजिबात चांगले नाही. हलव्यामध्ये वापरली जाणारी साखर आणि तेल हे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवू शकते. तसेच, मधुमेहींची स्थिती बिघडवू शकते. परंतु, दुधी हलवा काळजीपूर्वक बनविल्यास मधुमेह आणि हृदयविकाराच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतो, असे जागुष्टे यांनी सांगितले आहे. “मधुमेही रुग्णांसाठी हा पदार्थ बनविताना त्यामध्ये साखरेऐवजी गूळ किंवा कृत्रिम स्वीटनर्सचा वापर केला जाऊ शकतो. आणि हलव्यातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी त्यामध्ये सुका मेवा [nuts] किंवा बियांचा वापर केला जाऊ शकतो,” असेही जागुष्टे यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : स्त्रियांनो, ‘PCOS’ चा त्रास कसा कराल कमी? आराम मिळण्यासाठी समजून घ्या तज्ज्ञांनी सुचविलेली ही पाच आसने

तसेच, हृदयरुग्णांसाठी हलवा बनविताना त्यामध्ये तेलाचा वापर करू नये. भाजीमधील पाणी हे अतिरिक्त चरबीची गरज दूर करते. “दाणे किंवा सुक्या मेव्यासह हलवा शिजविल्याने, त्या पदार्थातून निघणाऱ्या तेलामुळे हलव्याची चव आणि फायदे वाढण्यास मदत होते,” असा सल्लाही त्या देतात.

दुधीच्या भाजीचा रस किंवा शिजविलेल्या भाज्या केवळ वजन नियंत्रणासाठी उपयोगी नसून, त्याचा फायदा मधुमेह आणि उच्च रक्तदाबावरही होत असतो, असे डॉक्टर शर्मा यांनी सांगितले. “अशा प्रकारच्या समस्या असणाऱ्या व्यक्तींना दुधी हलव्यापेक्षा आहारामध्ये दुधीची भाजी आणि पोळी घेण्याचा सल्ला दिला जातो.”