Silent Heart Attack Symptoms In Body: सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत हार्ट अटॅक ही खूपच सामान्य बाब ठरत आहे. अगदी ७ ते ८ वर्षांच्या मुलांना, तरूणांना आणि महिलांना कधीही हृदयविकाराचा धोका असू शकतो. काहीवेळा सायलेंट हार्ट अटॅक येतो. तर हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात काही क्षणे दिसतात, मात्र लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बिमल छाजेर यांनी सायलेंट हार्ट अटॅक का होतो आणि तो येण्यापूर्वी शरीर कोणते संकेत देतं हे स्पष्ट केलं आहे.
सायलेंट हार्ट अटॅकची कारणं
सायलेंट हार्ट अटॅक येण्याची कारणं अनेक असू शकतात. मात्र त्यातील एक मुख्य कारण म्हणजे उच्च कोलेस्ट्रॉल. जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढल्याने प्लेक तयार होतो, तेव्हा ते कोरोनरी धमन्यांमध्ये जमा होऊ लागते. जेव्हा या प्लेकवर रक्ताच्या गुठळ्या जमा होतात, तेव्हा हृदय आणि स्नायूंना रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा योग्यरित्या पोहोचू शकत नाही. यामुळे सायलेंट हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. जे लोक ताण घेतात किंवा अचानक जास्त शारीरिक व्यायाम सुरू केला जातो, तेव्हासुद्धा सायलेंट हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो. यामागे इतरही काही कारणं आहेत ज्यामुळे साधारण किंवा सायलेंट हार्ट अटॅक येऊ शकतो.
- उच्च कोलेस्ट्रॉल
- जास्त वजन
- व्यायाम न करणे
- उच्च रक्तदाबाची समस्या
- हाय ब्लड शुगर
- तंबाखू किंवा अल्कोहोलचे अति सेवन
सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे
- छातीच्या वरच्या भागात वेदना होणे
- पाठीच्या वरच्या भागात आणि स्नायूंमध्ये वेदना
- जबडा आणि हात दुखणे
- खूप थकवा
- गॅस आणि अपचन
- पाठीत किंवा वरच्या हातांमध्ये वेदना
अनेकांना गॅस, पोटफुगी, छातीत दुखणे, छातीत जळजळ आणि अपचनाचा अनुभव येतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे आहेत, जी कायम राहू शकतात.
