अवनी : “ मी काल जास्तीचं दही दुधात मिक्स केलं होतं पण टू माय सरप्राइझ, दही आंबट लागलं ”
मी : “ विरजण अगदी एक चमचा पुरतं “
अवनी : “ मला योगर्टसारखं घट्ट दही हवंय “
मी : “ त्यासाठी फक्त दूध चांगल्या प्रतीचं हवं “
अवनी : “ मी फक्त ए २ सुरु केलंय. आणि मी मनुका किंवा मिरचीचे देठ ठेवून पण विरजण लावते .”
मी : बेस्ट आहे . विरजण म्हणून फक्त १ चमचा दही पुरेसं आहे .
अवनी : हे किती बेस्ट आहे ना हे. ताजं ,सोपं आणि पौष्टिक ! बाहेरचं दही आणायची का सवय लागलीये कळत नाही. बेसिक पदार्थांसाठी वेळ काढायला हवा आपण .
अवनीच्या या वाक्यावर मला “आपला वेळ आणि सोय दोघांचं गणित बदललंय” याची बोचरी जाणीव झाली.
दही इतकं सहज आणि सोपा पौष्टिक पदार्थ आहे घरच्या घरी थोडं सजग राहून ठरवल्यास आहार नियमनाचे बेसिक्स ( मूलभूत पथ्य ) पाळणं इतकं अवघड नाहीये.

आणखी वाचा: डाएट जीआय म्हणजे काय कमी जीआय असलेले पदार्थ कोणते

sleep apnea in marathi, what is sleep apnea in marathi
Health Special: स्लीप अ‍ॅप्नीया – झोपेत असा श्वास अचानक का थांबतो? किती गंभीर आहे ही समस्या?
why you should eat homemade curd in summer season
उन्हाळ्यात घरच्या घरी तयार केलेले दही का खावे? जाणून घ्या, घट्ट दही घरी कसे बनवावे?
washing eyes with tap water is a bad habit health news marathi
तुम्हीही झोपेतून उठल्यावर डोळ्यांवर पाणी मारताय? ही सवय ठरू शकते हानिकारक! डॉक्टरांनी दिलाय सल्ला
Health Special What exactly is heatstroke How to avoid it What is the solution
Health Special: उष्माघात म्हणजे नेमके काय? तो कसा टाळायचा? उपाय काय?

विशेषतः दुग्धजन्य पदार्थ तयार करणं
दही हा खवय्यांचा आणि आहार तज्ज्ञांचा आवडता पदार्थ आहे . केवळ चव नव्हे तर भरपूर पोषकतत्त्व असणारा , वर्षानुवर्षे स्वयंपाकघरात शाकाहार आणि मांसाहार या दोन्ही पद्धतींचा सहज भाग होऊ शकणारा दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दही !

आजचा लेख विशेषतः दह्याबद्दल. दह्याचं विरजण म्हणजेच एक चमचा दह्यामध्ये तुम्ही जर शंभर ते दीडशे मिली दूध एकत्र केल्यास उत्तम दही लागू शकते. मुख्य म्हणजे दही कशाही सोबत खाऊ शकतात तुम्ही दह्यामध्ये जिरेपूड टाकू शकता किंवा थोडेसे मसालाचे पदार्थ टाकून ते चविष्ट बनवू शकता किंवा तुम्ही उकडलेली कडधान्य दह्यामध्ये एकत्र करू शकता. दह्याला तुम्ही फोडणी देऊ शकता आणि दह्यामध्ये फळ एकत्र करून देखील तुम्हाला खाता येतात.
मात्र दही खाताना वजन कमी करायचं की वजन वाढवायचं ; कोणत्या प्रकारचे आजार आपल्याला आहे याचा विचार होणे आवश्यक आहे. दही उत्तम ऊर्जा, आतड्यासाठी पोषक सूक्ष्मंजैविके आणि अनेक जीवनसत्त्वाचा खजिना आहे.

आणखी वाचा: Health Special: ‘हा’ आहे हॅपी डाएटिंगचा फंडा
शरीरात कॅल्शियमची कमी असते त्यांच्यासाठी दही अत्यंत उपयुक्त आहे. दह्याचा विचार करता शाकाहारी आहारातील उत्तम प्रथिने दह्यामधून मिळू शकतात. आंबट दही शक्यतो कधीही खाणे टाळावे आणि दही लावताना भरपूर विरजण दुधामध्ये लावणे देखील टाळावे. अगदी चमचा दह्यात बुडवून किंवा ताकामध्ये बुडवून किंचित गार झालेल्या दुधात फिरवला तरी देखील आठ ते दहा तासात उत्तम प्रतीचे दही तयार होतं.

ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी दह्यासोबत कडधान्य किंवा कंदमुळे खावेत.
मुगाची उसळ आणि दही
बटाटयाचा कीस आणि दही
रताळं आणि दही
शिजवलेली चणाडाळ आणि दही
साबुदाणा खिचडी आणि दही

सध्या १ बाउल मील म्हणजे वाटीभर खाणं असा ट्रेंड सुरु आहे ज्यात जास्तीत जास्त आरोग्यदायी पदार्थ एकत्र करून एक संपूर्ण जेवण एका वाटीत किंवा वाडग्यात एकत्र केले जाते. यासाठी शाकाहारी रेसिपींमध्ये दह्याचा वरचा क्रमांक लागतो.

डाळिंब -दही – उकडलेले कडधान्य
काकडी- भोपळी- मिरची- पुदिना चटणी – हरभरे आणि दही
कांडा-टोमॅटो- उकलडलेली मटकी -दही
काकडी- डाळिंब- उकडलेले मूग – कोथिंबीर आणि दही
असे मिश्रण एक वाटीभर जेवण म्हणून खायला पोषक आहे

कायम सर्दी दमा खोकला अशा प्रकारचे रोग आहेत त्यांनी दही आणि मध एकत्र विसरून खावे. दही मीठासोबत खाल्ल्यास गॅसेसचे प्रमाण कमी होतं. त्वचा अत्यंत रुक्ष असणाऱ्यांनी दही आणि जिरेपूड याचा नियमित आहार घ्यावा. त्वचेच्या विकारांमध्ये मुरूमांमध्ये पू तयार होत असेल तरी दही खाणे कटाक्षाने टाळावे. पित्त प्रकृती असणाऱ्यांसाठी दही आहारातून पूर्णपणे वर्ज्य करावे.

मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दही मिळते. मार्केटमधील कोणतेही दही वापरताना त्याच्यामध्ये ॲडिशनल शुगर म्हणजेच अतिरिक्त साखर आहे का याचा विचार नक्की व्हायला हवा त्यासोबत दह्यामध्ये जर कोणत्याही प्रकारची फळ टाकून त्यात टाकून दही तयार केलेले असेल अशा प्रकारचे दही वर्ज्य करणे उत्तम.

वेगळ्या प्रकारच्या क्रीडा प्रकारांमध्ये असा भाग घेणाऱ्यांनी किमान 100 ते 200 ग्रॅम दही नियमितपणे खाणे उपयुक्त आहे शिवाय मासिक पाळीच्या आधी सात दिवस दह्याचे प्रमाण वाढविणे महिलांना देखील उत्तम फायदे होऊ शकतात. ज्यांना अशक्तपणा वाटतो आणि लघवी साफ होत नाही त्यांनी दुधाऐवजी दही खावे ज्यांना पोट भरल्यासारखे वाटत नाही किंवा पोटात सारखी भूक लागते त्यांच्यासाठी दही अत्यंत उपयुक्त आहे हातापायांची आग होणे किंवा डोळ्यांची आग होणे अशा लोकांसाठी दही अजिबातच उपयोगाचे नाही. अनेकदा मांसाहार तयार करताना अनेकदा मांसाहारी पदार्थ तयार करताना मॅरीनेशन प्रक्रियेमध्ये दह्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो त्यामुळे मांसाहार करताना दह्यामधून तयार केलेले चिकन किंवा मास उत्तम परिणाम देऊ शकते ज्यांना नुसत्या कच्च्या भाज्या खाण्याचा कंटाळा येतो तरी दह्यासोबत भाज्या एकत्र करून खाल्ल्यास आहारामध्ये तंतुमय पदार्थ आणि प्रथिने यांचे योग्य प्रमाण राहण्यास मदत होते.

संध्याकाळच्या भुकेसाठी दही पोषक आहे. कृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने आपण दहीकाला साजरा केलाच असेल. यापुढेही आपल्या आवश्यकतेनुसार दह्याचा वापर करायला हरकत नाही.