Calcium Supplements and Heart Disease Risk : शरीराच्या वाढीसाठी कॅल्शियम अत्यंत आवश्यक असते. कॅल्शियममुळे हाडे आणि दात बळकट होतात. हे हृदयाचे ठोके नियंत्रित करते. रक्तवाढीस चालना देते. आपल्या शरीराला दररोज १००० mg ते १५०० mg कॅल्शियमची गरज असते. त्यामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी डॉक्टर अनेकदा कॅल्शियमच्या गोळ्या किंवा कॅल्शिमययुक्त आहार घेण्याचा सल्ला देतात. अशा वेळी अनेक लोक डॉक्टरांच्या सल्लानुसार कॅल्शिमय गोळ्यांचे सेवन करतात. परंतु, दररोज कॅल्शिमयच्या गोळ्या घेतल्याने शरीराला फायदे मिळण्याऐवजी नुकसानच अधिक होते. अधिक कॅल्शियमच्या सेवनामुळे सूज येणे आणि बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते.

त्यात मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज कॅल्शियम सप्लिमेंट्सचे नियमित सेवन केल्यास, त्यांना हृदयविकार होऊ शकतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे.

Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
Eating walnuts on an empty stomach in the morning
अक्रोड खाताना ‘ही’ योग्य वेळ, पद्धत व प्रमाण पाळल्यास मेंदू होईल तल्लख; तुमच्या शरीरात काय बदलेल?
Radish recipe
बटाट्याचे काप नेहमी खाता, एकदा मुळ्याचे काप खाऊन तर पाहा, नोट करा सोपी रेसिपी
shani surya yuti in kumbh rashi ended
शनि-सूर्याची युती संपली; या राशींचे लोक होतील मालामाल, मिळणार अमाप पैसै

यूके बायोबँकच्या ४००.००० हून अधिक लोकांच्या डेटावर आधारित अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की, मधुमेहाच्या रुग्णांनी दीर्घकाळ कॅल्शियमयुक्त आहार घेतल्यास त्यांच्या हृदयाला हानी पोहोचू शकते आणि त्यात रुग्णाचा मृत्यू होण्याचाही धोका असतो.

संशोधनानुसार, काही लोक सवयीने कॅल्शियमपूरक आहार घेतात; ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या आजारांमुळे मृत्यूचा धोका सुमारे ६० टक्क्यांनी वाढू शकतो. ज्यांना मधुमेह नाही, त्यांच्याबाबतच्या संशोधनात कोणताही धोका दिसला नाही. मधुमेहाच्या रुग्णांच्या हृदयासाठी कॅल्शियम सप्लिमेंट कसे घातक आहे आणि ते कधी व कसे सेवन करावे हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊ.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी कॅल्शियम सप्लिमेंट हृदयासाठी धोकादायक कसे ठरते?

चेन्नईतील डॉ. मोहन डायबिटीज स्पेशॅलिटी सेंटरचे अध्यक्ष डॉ. व्ही. मोहन, यांनी सांगितले की, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणत्याही प्रकारच्या कॅल्शियम सप्लिमेंट घेऊ नका. त्यामुळे महागड्या कॅल्शियम सप्लिमेंटमुळे लघवीसंबंधित त्रास होऊ शकतो. याचा अर्थ शरीरास आवश्यक नसतानाही तुम्ही कॅल्शिमय सप्लिमेंट खात असाल, तर त्याचा कोणताही फायदा होण्याऐवजी त्रास होऊ शकतो.

कॅल्शियमचा हृदयावर कसा परिणाम होतो?

डॉ. मोहन म्हणाले, “शरीराला आवश्यक नसतानाही कॅल्शियमपूरक आहार घेतल्यास, ते कॅल्शियम हृदयाच्या वाहिन्यांमध्ये जमा होऊ लागते. हृदयाचे आरोग्य हे कोरोनरी आर्टरीद्वारेच कळते. मधुमेही रुग्णांनी नियमित कॅल्शियम सप्लिमेंट घेतल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो आणि हृदयरोगामुळे मृत्यूही होऊ शकतो.”

प्रसूतीनंतर महिलांनी कॅल्शिमय सप्लिमेंट घेणे फायदेशीर असते का?

डॉ. मोहन यांच्या मते, प्रसूतीनंतर अनेक स्त्रियांमध्ये हाडांसंबंधित दुखणी वाढतात. अशा वेळी हाडांच्या मजबुतीसाठी अशा महिलांना अनेकदा ओव्हर-द-काउंटर कॅल्शियम गोळ्या विकल्या जातात. पण, तुमच्या हाडांच्च्या आरोग्याबाबतची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी जर कॅल्शियमच्या गोळ्या लिहून दिल्या, तरच त्याचे सेवन करा; अन्यथा नको.

अशा महिलांमध्ये इस्ट्रोजेनचा हृदयावर संरक्षणात्मक प्रभाव पडतो; ज्यामुळे प्रसूतीपूर्वी त्यांना हृदयविकाराचा धोका कमी होतो. पण, प्रसूतीनंतर इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्यामुळे पुरुषांइतकाच त्यांनाही हृदयविकार होण्याचा धोका असतो. त्यामुळे गरज नसल्यास या वयात कॅल्शियम सप्लिमेंट्स घेऊ नयेत, असे डॉ. मोहन म्हणाले.

एखाद्या महिलेला ऑस्टिओपोरोसिससारखा आजार असेल आणि ती गरोदर असेल, तर तिनेही कॅल्शिमयच्या गोळ्या खाताना थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपान करवण्याच्या काळात, ज्यांना लॅक्टोज् इनटॉलरन्स आहे, दूध पिऊ शकत नाही आणि पचनासंबंधी आजार आहेत, त्या महिलांच्या शरीराची कॅल्शियम शोषण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे त्यांना कॅल्शियम सप्लिमेंटची आवश्यकता असते. परंतु, अशा लोकांनी शक्य तितके कॅल्शियम घरातील जेवणातून आणि नैसर्गिक स्वरूपात घेतले पाहिजे. कारण यामुळे शरीरास कोणताही धोका नसतो, असेही डॉ. मोहन म्हणाले.

कॅल्शियम घ्या गोळ्यांऐवजी ‘या’ पदार्थांमधून

शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी स्त्री-पुरुषांनी दुधाचे सेवन करावे, असे डॉ. मोहन सांगतात. एका ग्लास दुधात सुमारे ५०० मिलिग्रॅम कॅल्शियम असते आणि ते दिवसभरासाठी पुरेसे असते. त्याशिवाय चीज, हिरव्या किंवा पालेभाज्या जसे की, भेंडी, सोया व मासे यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम आढळू शकते; जे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात आणि शरीर निरोगी राहते.