नवी दिल्ली : मधुमेहच्या रुग्णांना आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. त्याचबरोबर या रुग्णांच्या डोळय़ांच्या पडद्या (रेटीना) भोवती कोलेस्ट्रेरॉल जमा होऊ शकतो. या कारणामुळे रुग्णांच्या दृष्टीवर वाईट परिणाम होतो. अशा स्थितीत अंधत्व येण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेतील मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या एका गटाच्या नेतृत्वाखाली या संबंधी करण्यात आलेल्या संशोधनानंतर मधुमेहाच्या धोक्याची माहिती मिळाली आहे.
हेही वाचा >>> आरोग्य वार्ता : मोबाइलमुळे करोनाचा अधिक वेगाने संसर्ग
प्रा. अॅमेरिटस ज्युलिया यांनी सांगितले की, ‘रेटीनोपॅथी’ अंधत्वाचे प्रमुख कारण असून टाईप १ आणि टाईप २ मधुमेहाच्या सर्वात अधिक गुंतागुंतीच्या स्थितीतील एक आजार आहे. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये २० वर्षांत रेटीनोपॅथीचा त्रास काही प्रमाणात होतो. तसेच याबाबत रुग्णांना अंतिम टप्प्यात माहिती होते. संशोधकांनी सांगितले की, हे धमन्यांमध्ये तयार होणाऱ्या आणि हृदयविकाराच्या झटक्यास कारण ठरणाऱ्या ‘कॉलेस्ट्रेरॉल क्रिस्टल अॅथेरोरक्लोरोटिक प्लाक’मध्ये आढळणाऱ्या ‘क्रिस्टल’प्रमाणेच असते. संधोधनात सहभागी असलेल्या प्रा. टीम डोरव्हेइलर यांनी सांगितले की, रेटीनामध्ये कोलेस्ट्रेरॉल कमी प्रमाणात जमा व्हावे यासाठी काय करता येईल याबाबत आम्ही संशोधन करत आहोत.