Protein for Health: प्रथिने ही आपल्या आहारातील सर्वांत महत्त्वाचे मॅक्रोन्यूट्रिएंट्सपैकी एक आहेत. ती स्नायूंच्या निर्मितीमध्ये मोठी भूमिका बजावतात, रोगप्रतिकार शक्ती वाढवतात आणि त्वचा व केसांची देखभाल करतात. हजारो वर्षांहून अधिक काळापासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ असूनही, अनेक अभ्यासांनुसार, भारतीय लोक जगात सर्वांत कमी प्रमाणात प्रथिनांचे सेवन करतात.

बहुतेक भारतीयांमध्ये प्रथिनांबद्दल अनेक सामान्य गैरसमज आहेत. इंडियन एक्स्प्रेस डॉटकॉमने आहारतज्ज्ञ व न्यूट्रिअ‍ॅक्टिव्हेनियाच्या संस्थापक अवनी कौल यांचा सल्ला घेतला आणि भारतीयांच्या आहारात प्रथिनांची कमतरता का आहे आणि सामान्य गैरसमज यांवर चर्चा केली. त्यांनी लोकांच्या दैनंदिन प्रथिनांच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करणारे अनेक प्रथिनांनी युक्त आहार सांगितला.

प्रथिनांबद्दलचे सामान्य गैरसमज

प्रथिने फक्त बॉडीबिल्डर्ससाठी आहेत: त्या सांगतात, “तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीला प्रथिनांची आवश्यकता असते. फक्त बॉडीबिल्डर्सनेच नाही, तर प्रत्येक व्यक्तीने प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन करायला हवे.”

डाळीमध्ये पुरेशी प्रथिने असतात: डाळ योग्य आहार आहे; परंतु त्यातील प्रथिने अपूर्ण आहेत आणि इतर कोणत्याही पदार्थाच्या मदतीशिवाय ती खाता येत नाही, असे त्यांनी सांगितले.

जास्त प्रथिने मूत्रपिंडांना हानी पोहोचवतात: त्यांनी स्पष्ट केले की, प्रथिने केवळ आधीच मूत्रपिंडाचा आजार असलेल्या लोकांनाच हानी पोहोचवू शकतात; निरोगी व्यक्तींना नाही.

प्रथिनपूरक पदार्थ हे स्टिरॉइड्स आहेत: प्रथिनांच्या पावडरबद्दलची वस्तुस्थिती सांगताना त्या म्हणाल्या की, ते औषध नाही; तर केंद्रित अन्न आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रथिनयुक्त भारतीय पदार्थ, जे तुम्ही ट्राय करायला हवेत

आरोग्यतज्ज्ञ संतुलित आणि प्रथिनयुक्त देशी पदार्थांची यादी शेअर करतात:

शाकाहारी पर्याय

  • पनीर भुर्जी मल्टीग्रेन पोळीसह – पनीरमध्ये संपूर्ण प्रथिने असतात.
  • अंकुरलेले मूग चाट – फायबर आणि वनस्पती प्रथिने समृद्ध असतात.
  • सोया चंक करी ब्राऊन राईससह – सोया हे एक उत्कृष्ट वनस्पती प्रथिनेयुक्त अन्न आहे.
  • पुदिन्याच्या चटणीसह बेसन पोळी- सोपा आणि प्रथिनेयुक्त नाश्ता
  • भाज्या टाकून बनवलेला क्विनोआ उपमा- क्विनोआ हे संपूर्ण प्रथिनयुक्त धान्य आहे.

मांसाहारी पर्याय

  • मसाला ओट्ससह उकडलेली अंडी- सरळ, सोपा आणि पौष्टिक नाश्ता
  • भाज्या टाकून बनवलेले ग्रिल्ड चिकन- फायबर आणि प्रोटीनयुक्त आहार
  • ब्राऊन राईससह मच्छी करी- प्रोटीन + ओमेगा ३ युक्त आहार
  • बाजरीची भाकरी आणि अंडा करी – सोपा आणि पौष्टिक आहार
  • नाचणीची भाकरी आणि मटण खिमा- आयर्न + प्रोटीनयुक्त आहार