मार्च महिना संपत आला असून, उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. वाढत्या उन्हामुळे घाम येण्याचे प्रमाण वाढू लागलेय. या घामाच्या त्रासामुळे खूप हैराण व्हायला होते. केसांत, काखेतून खूप घाम येतो. हात घडी करून बसलं तरी हाताला घाम सुटतो. इतकेच नाही, तर पायांना सतत घाम येतो. घामामुळे पायांना येणाऱ्या तीव्र दुर्गंधीने त्रास होऊ लागतो. अशा परिस्थितीत पायांच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे लागते. कारण- शरीराच्या इतर ठिकाणी आलेला घाम आपण रुमालाने पुसू शकतो; पण पायांना आलेला घाम पुसता येत नाही. त्यात पायांत आपण मोजांसह चपला किंवा शूज घालतो; पण ते पायांतून काढल्यानंतर अनेकदा दुर्गंधी येते. या दुर्गंधीने स्वत:ला अस्वस्थ वाटतेच; पण इतरांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो. मग त्यामुळे लाजिरवाणे वाटू लागते.

जर तुम्हीही अनेकदा अशा परिस्थितीतून जात असाल, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. कारण- द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना बंगळुरूमधील त्वचाविज्ञान डॉ. रस्या दीक्षित यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत; ज्यांच्या मदतीने तुम्ही उन्हाळ्यात घामामुळे पायांना येणारी दुर्गंधी दूर करू शकता आणि नेहमी फ्रेश राहू शकता.

IPL Star RCB Cameron Green 60 Percent Working Kidney Tells diet to control
६० टक्के कार्यरत किडनीसह IPL खेळतोय RCB चा ‘हा’ स्टार खेळाडू; किडनीच्या सुदृढतेसाठी काय खावं, काय नाही?
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”

पायांना येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका मिळविण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

१) योग्य फूटवेअर निवडा

डॉ. दीक्षित यांच्या म्हणण्यानुसार, घाम येतो तेव्हा शरीराच्या इतर भागांपेक्षा पायांमध्ये जास्त प्रमाणात जीवाणू वाढतात. त्यामुळे पायांमधून घामाची अधिक दुर्गंधी येते. त्याच वेळी जेव्हा तुम्ही उन्हाळ्यात पूर्ण पॅकबंद शूज किंवा पावले पूर्णपणे झाकले जातील, अशी चप्पल घालता तेव्हा अधिक घाम येतो; ज्यामुळे जीवाणूंची संख्यादेखील वाढते आणि दुर्गंधी येते. त्यामुळे उन्हाळात पाय मोकळे राहतील आणि हवा बाहेर जाऊ शकेल अशा प्रकारे फूटवेअर निवडा. त्यामुळे दुर्गंधीपासून सुटका होऊ शकते.

२) मोजे घाला

तुम्ही उन्हाळ्यात पाय मोकळे राहतील, अशी चप्पल घालत नसलात तरी मोजे घाला. शूज वापरणाऱ्यांनी तरी मोजे घातलेच पाहिजेत आणि दररोज ते बदलले पाहिजेत. या पद्धतीचा अवलंब करून, तुम्ही तुमच्या पायांना येणारी दुर्गंधी कमी करू शकता.

३) स्वच्छतेकडे लक्ष द्या

काम संपवून घरी परतल्यावर पाय साबणाने धुवा. त्यानंतर कपड्याच्या साह्याने पाय कोरडे होईपर्यंत पुसा. विशेषतः पायांच्या बोटांच्या गॅपमध्ये पाणी राहू देऊ नका. त्याशिवाय पायांच्या बोटांची नखे नियमितपणे कापल्यासही पायांची संपूर्ण स्वच्छता राखण्यास मदत होते.

४) पायांना खाज किंवा इतर समस्या जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

डॉक्टर दीक्षित यांच्या मते, वेळोवेळी पायांकडे लक्ष देत राहा. विशेषत: पायांच्या बोटांमधील कॅपमध्ये काही लक्षणे दिसत नाहीत ना हे तपासा. तुम्हाला पायांच्या तळव्याजवळ काळे किंवा पांढरे डाग यांसारखी बुरशीजन्य संसर्गाची लक्षणे दिसली, तर तत्काळ त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

५) संसर्ग झाल्यास काय करावे?

  • त्वचाशास्त्रज्ञांच्या मते, जर तुम्हाला बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता असेल, तर मोजे घालण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ल्याने बुरशीनाशक पावडर वापरा. त्यामुळे बुरशीजन्य संसर्गाची वाढ रोखण्यास मदत होऊ शकते.
  • प्लास्टिकची चप्पल वापरणे टाळा. कारण- अशा चपलांमुळे अधिक घाम येतो. त्यासह सुती कापडाचे मोजे घाला.
  • अशा प्रकारे काही सोप्या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही दिवसभर तुमचे पाय ताजेतवाने आणि दुर्गंधीपासून दूर ठेवू शकता.