उत्तम आरोग्यासाठी नियमित दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दुधात भरपुर प्रमाणात कॅल्शियम आढळते. त्यामुळे लहान मुलांची हाडं मजबुत व्हावी यासाठी त्यांनी दररोज किमान एक क्लास दूध पिण्याचा सल्ला तज्ञ मंडळी देतात. कॅल्शियमसह दुधात अनेक पोषकतत्त्वे आढळतात. त्यामुळे लहान मुलांसह मोठ्यांना देखील दररोज दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. पण अति प्रमाणात दूध प्यायल्याने त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे काही गंभीर आजार होण्याची शक्यता असते, कोणते आहेत ते आजार जाणून घ्या.

अपचन
दूध पचायला जड असल्याने अति दूध प्यायल्याने अपचनाचा त्रास होऊ शकतो. पचनाशी निगडित समस्या उद्भवण्याबरोबर अति दुध प्यायल्याने उलटीचा त्रास होणे, अस्वस्थ वाटणे अशा समस्या उद्भवू शकतात.

Health Benefits of Lassi
तुम्ही उन्हाळ्यात रोज ताक किंवा लस्सी प्यायल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
Health Special, sweating,
Health Special: कमी किंवा अतिघाम येण्याची कारणे काय?
diy health benefits of onions what happens your body if yo do not eat onions for a month
आहारात महिनाभर कांद्याचे सेवन न केल्यास शरीरात काय बदल होतील? तज्ज्ञ म्हणाले…
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?

आणखी वाचा : तुम्हालाही रात्री उशीरा जेवायची सवय आहे का? याचा शरीरावर काय परिणाम होतो लगेच जाणून घ्या

हाडं कमकुवत होणे
दूध हाडांना मजबुत करण्यासाठी फायदेशीर मानले जाते, पण अति प्रमाणात दूध प्यायल्याने हाडं कमकुवत होऊ शकतात. ब्रिटिश मेडीकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार कमी दूध पिणाऱ्यांना फ्रॅक्चर किंवा हाडांना सूज येणे अशा समस्या कमी आढळून आल्या.

कर्करोग होण्याची शक्यता
एनसीबी द्वारे २०१२ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार दुधात लॅक्टोजचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे महिलांना ओवेरियन कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

त्वचेशी निगडित समस्या
जास्त दूध प्यायल्याने त्वचेशी निगडित समस्या निर्माण होऊ शकतात. त्वचेवर पुरळ येणे किंवा एलर्जी होणे अशा समस्या उद्भवू शकतात.

Winter Diet: रिकाम्या पोटी ‘ही’ फळं खाणे ठरते आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या याचे अनेक फायदे

एका दिवसात किती दूध प्यावे
अति दूध प्यायल्याने आरोग्यावर अशाप्रकारे परिणाम होऊ शकतात, यामुळे गंभीर आजार उद्भवू शकतात. त्यामुळे दूध प्रमाणात प्यावे. एका दिवसातील दूध पिण्याचे प्रमाण १ ते २ ग्लास असावे. याव्यतिरिक्त पनीर, दही, ताक अशा दुग्धजन्य पदार्थांमधून दुधाचे सेवन करू शकता.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)