scorecardresearch

Winter Diet: रिकाम्या पोटी ‘ही’ फळं खाणे ठरते आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या याचे अनेक फायदे

रिकाम्या पोटी काही फळं खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी फायदा होतो

Winter Diet: रिकाम्या पोटी ‘ही’ फळं खाणे ठरते आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या याचे अनेक फायदे
नाश्त्यामध्ये कोणत्या फळांचा समावेश करावा जाणून घ्या (फोटो : Freepik)

आजकाल आरोग्याबाबत काहीजण विशेष जागृक झालेले दिसतात. याचे कारण म्हणजे अगदी कमी वयातही मधुमेह, उच्च रक्तदाब या आजारांना तरुण मंडळी बळी पडत आहेत. त्यामुळे अशा आजारांपासून वाचण्यासाठी किंवा असे आजार झाले असतील तर ते बळावू नयेत यासाठी आरोग्याकडे, आहाराकडे लक्ष दिले जाते. निरोगी राहण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे गरजेचे असते. जर तुम्ही रिकाम्या पोटी काही फळं खाल्ली तर त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते, कोणती आहेत अशी फळं जाणून घ्या.

रिकाम्या पोटी ही फळं खाणे ठरेल आरोग्यासाठी फायदेशीर

टरबूज

सकाळी रिकाम्या पोटी टरबूज खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. कारण यामुळे मेटाबॉलिजम रेट वाढतो आणि शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळते. तसेच यामुळे आतड्यांची स्वच्छता आणि शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यास मदत मिळते.

पपई

सकाळी रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने शरीर पूर्णपणे डिटॉक्स होण्यास मदत होते. पपईमध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळते, तसेच यामुळे बद्धकोष्ठता, अपचन, गॅस, आतड्याची सूज अशा पोटाच्या समस्येपासून सुटका मिळण्यास मदत मिळते.

आणखी वाचा : तुम्हालाही रात्री उशीरा जेवायची सवय आहे का? याचा शरीरावर काय परिणाम होतो लगेच जाणून घ्या

नारळ पाणी

नारळ पाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे तुम्ही दररोज सकाळी नारळाचे पाणी पिऊ शकता. यासह जिऱ्याचे पाणीही अन्नपचन सुधारण्यासाठी फायदेशीर मानले जाते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 11:59 IST

संबंधित बातम्या