Heatwave alert : उन्हाळ्यात तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढले असल्याने शरीराला थंडावा देणाऱ्या औषधी वनस्पतींचा समावेश आपल्या रोजच्या आहारात केल्यास पौष्टिकतेला चालना मिळेल आणि ताजेतवाने वाटेल. पुदिना, कोथिंबीर व तुळस यांसारख्या औषधी वनस्पती केवळ पदार्थांची चव वाढवतातच पण त्याचबरोबर आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण फायदेही देतात आणि ते सॅलड, सूप आणि ज्यूसमध्ये जोडले जाऊ शकतात

नवी दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्स, पोषणतज्ज्ञ, कनिका नारंग यांनी शरीराला थंडाव्या देणाऱ्या काही औषधी वनस्पतींबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली आहे.

पुदीना: व्हिटॅमिनचा स्त्रोत

ताज्या चवीसाठी आणि सुगंधासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुदिन्यामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक आहेत. त्यात जीवनसत्त्वे अ व क, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅशियम असतात. एक चमचा ताज्या पुदिन्यामध्ये (सुमारे ३.२ ग्रॅम) अंदाजे एक कॅलरी, दैनिक मूल्याच्या (DV) सहा टक्के अ जीवनसत्त्व, दैनिक मूल्याच्या एक टक्का क जीवनसत्त्व पुरवते.

पुदिनामधील मेन्थॉल गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्टच्या (gastrointestinal tract) स्नायूंना आराम करण्यास मदत करते. अपचन, सूज येणे आणि गॅसची लक्षणे कमी करते. याव्यतिरिक्त मेन्थॉल या घटकामध्ये डिकन्जेस्टंट (decongestant) गुणधर्म आहेत; जे श्लेष्माचे विघटन करून नाकातील सर्दी आणि अॅलर्जीची लक्षणे दूर करू शकतात. पुदिन्याच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात; जे ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करतात आणि हृदयरोग व कर्करोग यांसारख्या दीर्घकाळ टिकणाऱ्या आजारांचा धोका कमी करू शकतात. त्याशिवाय पुदिन्याची पाने चघळण्यामुळे श्वास ताजातवाना होण्यास आणि तोंडातील जीवाणू कमी करण्यास मदत मिळू शकते.

ताजेतवानेपणा मिळविण्यासाठी ही पाने आइस्ड टी, लेमोनेड्स व स्मूदीमध्ये घाला किंवा सॅलड्स, साल्सा आणि मिष्टान्नांमध्ये समाविष्ट करा.

हेही वाचा –“…म्हणून मी पत्नी आणि मुलांच्या ‘अडीच तास’ आधी उठतो”, अक्षय कुमारने सांगितले त्याच्या या खास सवयी मागचे कारण, पाहा

धणे किंवा कोथिंबीर: एक पौष्टिक पदार्थ

धणे ज्याला कोथिंबीर असेही म्हणतात. ही जीवनसत्त्वे आणि खनिजांनी भरलेली औषधी वनस्पती आहे. एक-चतुर्थांश कप (सुमारे चार ग्रॅम) ताज्या कोथिंबिरीमध्ये फक्त एक कॅलरी असते. दैनिक मूल्याच्या पाच टक्के अ जीवनसत्त्व, दैनिक मूल्याच्या दोन टक्के क जीवनसत्त्व व दैनिक मूल्याच्या १६ टक्के के जीवनसत्त्व असते.

धण्यामुळे शरीरातील जड धातू जसे की पारा आणि शिसे काढून टाकण्यास मदत करते, असे दिसून आले आहे. औषधी वनस्पतीमध्ये सिनेओल व लिनोलेइक अॅसिड असते; ज्यामध्ये दाहकविरोधी प्रभाव असतो आणि संधिवात व इतर दाहक परिस्थितीची लक्षणे कमी करण्यास मदत मिळते. त्याशिवाय कोथिंबिरीमध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात; ज्यामुळे शरीर संक्रमण आणि जीवाणूंशी लढण्यासाठी प्रभावी बनते. पुदिन्याप्रमाणेच धण्यामध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते; जे पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात आणि विविध दीर्घकालीन आजारांचा धोका कमी करू शकतात.

कोथिंबिरीची पाने कोणत्याही पदार्थामध्ये, ग्वाकामोल, साल्सा व सॅलडवर टाकू शकता किंवा सूप आणि ग्रील्ड मीटसाठी गार्निश म्हणून वापरली जाऊ शकतात.

हेही वाचा – सोयाबीन खाण्यामुळे पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी खरोखर कमी होऊ शकते का?

तुळस: दाहक विरोधी (Anti-inflammatory ) गुणधर्म असलेला पदार्थ

तुळस अ, के व क जीवनसत्त्वे, तसेच मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम व कॅल्शियमने भरलेली असते. एक चमचा (सुमारे २.५ ग्रॅम) ताजी तुळस अंदाजे एक कॅलरी, दैनिक मूल्याच्या तीन टक्के अ जीवनसत्त्व आणि दैनिक मूल्याच्या १३ टक्के के जीवनसत्त्व देते.

तुळशीमधील युजेनॉल या घटकामध्ये दाहकविरोधी गुणधर्म असतात; जे सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात. तुळस अँटिऑक्सिडंट्सनेही समृद्ध आहे; जे शरीराला मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण करण्यास मदत करते. त्याव्यतिरिक्त तुळशीचे अनुकूलक गुणधर्म (adaptogenic properties) म्हणजेच नव्या बदलास जुळवून घेणारे गुणधर्म शरीराला तणावाचा सामना करण्यास आणि मानसिक स्पष्टता सुधारण्यास मदत करू शकतात. तुळस उन्हाळ्यातील पेस्टो, सॅलड्स व लिंबूपाण्यासारख्या ताजेतवाने करणाऱ्या पेयांसाठी योग्य आहे. टोमॅटोसह तुळशीचे सेवन करणे एक चांगला पर्याय आहे.

हेही वाचा – तापमानाचा वाढला पारा, लाडक्या पाळीव प्राण्यांचे आरोग्य सांभाळा! उष्णतेच्या लाटेमुळे कुत्रा-मांजरही त्रासले, अशी घ्या त्यांची काळजी?

Lemon balm: शांत झोपेसाठी चांगले औषध

Lemon balm हे (मेलिसा ऑफिशिनालिस) पुदिन्याच्या कुटुंबातील एक बारमाही औषधी वनस्पती आहे आणि ती मूळ दक्षिण-मध्य युरोपमध्ये आढळते. याची चव सौम्य लिंबाप्रमाणे असते आणि अँटिऑक्सिडंट्सनी ती समृद्ध आहे. त्यात क जीवनसत्त्व, थायमिन व फोलेट असते. Lemon balm ही औषधी त्याच्या शांत (Calm) करणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखली जाते; जे चिंता कमी करणे आणि झोप सुधारणे यासाठी मदत करू शकते. ही औषधी अपचन आणि फुगण्याची लक्षणे कमी करते म्हणजेच पचनसंस्थेचे कार्य सुधारण्यासही मदत करू शकते. हे आइस्ड टी, फळांच्या सॅलडमध्ये वापरले जाऊ शकते किंवा चवदार चवीसाठी मिष्टान्नांमध्येही जोडले जाऊ शकते.