गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाचा बदल आला तो म्हणजे आपल्याकडे स्मार्टफोन्स आले आणि त्या माध्यमातून आपण विविध सोशल मीडियाचा वापर करू लागलो. गेल्या दहा वर्षांमध्ये सामान्य माणसांनीदेखील व्हॉट्सअप आणि फेसबुक वापरायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियाचा विचार केला तर जगामध्ये २०२२ साली जवळपास ५२६ कोटी लोक मोबाईल वापर होते आणि त्यातील ४५५ कोटी लोक  हे कुठलातरी एक सोशल मीडिया वापर होते. २०२७ पर्यंतचा विचार केला तर हे प्रमाण अजून वाढण्याची शक्यता आहे. असे ही लक्षात आले की, वयस्कर माणसं आज फेसबुक वापरतात तर तरुण मंडळी आज इन्स्टाग्राम किंवा इतर प्रकारचे सोशल मीडिया वापरतात.  YouTube,  ट्विटर आणि  linked इन यासारखे विविध सोशल मीडिया वापरले जातात. आता या सगळ्यांचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो किंवा आपण त्याचा कसा चांगला वापर करून शकतो हे आज आपण पाहूया.
 
गेल्या दशकात सोशल मीडिया आणि चांगले स्मार्टफोन आपल्याकडे आले, तेव्हा सुरुवातीला त्याच्याकडे तासन् तास आपण पाहायला सुरुवात केली. व्हॉट्सअपनेने तर आपल्या सर्वांचे आयुष्यच बदलले. आपण फेसबुकवर एखादी पोस्ट केली की, तिला किती लाईक्स आहेत, हे पाहण्यासाठी आपण दर पंधरा मिनिटांनी फेसबुक पाहू लागलो. यामुळे आपल्या डोळ्यांची चुरचुर, जळजळ वाढली.  बऱ्याचवेळा तर लोकांकडे कुठलाही मोबाईल असतो व त्याचा स्क्रीन अति प्रखर ( ब्राईट)  असतो आणि सारखा मोबाईल बघून डोळ्यांमध्ये चुरचुर होऊन डोळे कोरडे होतात. या सोशल मीडियामुळे मला वाटतं अनेक वयस्कर माणसांना रोज डोळ्यांमध्ये  आर्टिफिशल टिअर्स म्हणजे पाण्याचे थेंब टाकावे लागतात. 

हेही वाचा : रोज काम करताना जास्त वाकून बसता, चुकीच्या पद्धतीने उभे राहता? मग थांबा! तुम्हाला होऊ शकतात ‘या’ गंभीर समस्या, तज्ज्ञ सांगतात…

Physiotherapy after operation loksatta
Health Special : ऑपरेशननंतरची फिजिओथेरपी…..
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Vitamin d deficiency impact health how to increase vitamin d levels
तुमच्या शरीरात ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता आहे? मग होऊ शकतात गंभीर परिणाम, तज्ज्ञ सांगतात…
china super rich numbers declining
‘या’ देशातील श्रीमंत लोक देश सोडून का जात आहेत? श्रीमंतांच्या संपत्तीत घट होण्याचे कारण काय?
Canada allegations on amit shah
विश्लेषण: निज्जर हत्याप्रकरणी कॅनडाचा थेट अमित शहांवर ठपका… आरोपांची राळ, पण पुराव्यांचे काय?
diwali 2024 1st october 2024 panchang marathi horoscope mesh to meen
Laxmi Pujan Horoscope : लक्ष्मी कृपेने नोव्हेंबरचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल; कुणावर होणार धन अन् सुखाचा वर्षाव? वाचा तुमचे राशीभविष्य
maharashtra irrigation scam
विश्लेषण: सिंचन घोटाळा काय होता? त्यात अजित पवारांविरुद्ध गुन्हा का नाही?

आजही बऱ्याच लोकांचा स्क्रीन टाईम हा जास्तच  असतो आणि त्याच्यामध्ये लोक योग्य ती काळजी घेत नाहीत की त्यांच्या  मोबाईलचा प्रखरपणा कमी करत नाहीत किंवा डोळा आणि मोबाईलमध्ये अंतर व्यवस्थित ठेवत नाहीत, त्याच्यामुळे डोळ्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आपण पटापट टाईप करतो आणि ते टाईप करून करून छोट्या छोट्या सांध्यांची दुखणे सुरू होतात.  तिसरी गोष्ट म्हणजे  आपण एखादा मेसेज पाठवला तर ती पहिली खूण/टिक  दिसते म्हणजे तो मेसेज गेला. दोन टिका  दिसल्या म्हणजे मेसेज  तिथे पोहोचला आणि तीन टिक म्हणजे तो मेसेज वाचला गेला.  त्या तीन टिका दिसेपर्यंत बऱ्याच वेळा आपल्याला थारा नसतो आणि नंतर त्याचं काय उत्तर येतंय हे बघण्यासाठी आपण वारंवार तो मोबाईल उघडून पुन्हा पुन्हा त्याच्यात आपला पासवर्ड टाईप करून पुन्हा पुन्हा हे  मेसेजेस बघत असतो. मेसेजला काय उत्तर येते हे बघत असतो. 

मला वाटतं या सगळ्या प्रक्रियेत आपण इतके  गुंतून गेलेलो आहोत की आपण जवळजवळ बाकीच्या इतर गोष्टीचा आनंद विसरतो की काय असं मला वाटायला लागले आणि हे सगळं करण्यामध्ये आपण प्रचंड तणाव घेतो. बऱ्याचदा चित्रपटामध्ये किंवा जंगलात वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करताना किंवा संगीताच्या कार्यक्रमाला आपण गेलो तर ते भाषण रेकॉर्ड करायचा  किंवा फोटो काढायचा  किंवा सेल्फी काढायचा आपल्याला इतका छंद लागला आहे की या सगळ्यांमध्ये आपण त्या प्रसंगाचा / अनुभवाचा  जो खरा मनमुराद आनंद घ्यायचा आहे तोच आपण विसरलो का याचा आपण विचार करायला पाहिजे.  

हेही वाचा : Walking Pneumonia Vs Common Cold : वॉकिंग न्यूमोनिया आणि सामान्य सर्दीमधला फरक काय? वाचा, लक्षणे, उपाय आणि तज्ज्ञांचा सल्ला

व्हॉट्सअपमुळे अजून एक त्रास व  तणाव आपल्याला होतो. बऱ्याचवेळा  आपण परिषदांना जातो किंवा छोट्या पार्ट्या आयोजित करतो किंवा एखादा कार्यक्रम करतो. अशावेळी तत्कालीन असे ग्रुप्स केले जातात. म्हणजे त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला एक प्रकारचं आमंत्रण येतं. त्या आमंत्रणानंतर मग तुम्ही कॉन्फरन्समध्ये तुम्ही कसे येणार,कुठून येणार,  कोण तुम्हाला उतरवून घेणार आणि परिषद स्थळी आणणार?  तुमची राहण्याची व्यवस्था काय केली आहे? याबद्दलचे मेसेजेस येतात. तुम्ही कुठल्या ट्रेनने / विमानाने येणार. हे सगळेजण त्याच्यामध्ये टाकत असतात आणि तुमच्या एक मेसेजच्या ऐवजी तुम्हाला पन्नास लोकांचे निरर्थक मेसेज बघावे लागतात.  त्यानंतर कॉन्फरन्समध्ये छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये सांगितल्या जातात. त्याच्यानंतर मग  तिथे लेक्चर देतानाचा फोटो  किंवा सेल्फी,  स्मृतिचिन्ह  देतानाचा फोटो आणि त्याच्यानंतर मग कॉन्फरन्स झाल्यानंतर ही कॉन्फरन्स कशी चांगली झाली याबद्दलचे अभिनंदन. हे  संदेश  शंभर दीडशे असतात आणि त्याच्यानंतर मग सर्टिफिकेटससुद्धा दिली जातात. लग्नामध्ये व इतर समारंभाचे सुद्धा असेच असते.  अशा पद्धतीने आपल्याला जर याच्यामध्ये चार किंवा पाच संदेश पाठवायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला चारशे  ते पाचशे निरर्थक संदेश ऐकायला/बघायला  लागतात. या सर्व ताणाचा आणि वेळेच्या अपव्ययाचा आपण विचार करायला पाहिजे की खरोखरच याची आपल्याला गरज आहे का? 

होळीच्या दिवशी किंवा इतर सणांना आपण इतके मेसेजेस बघतो त्यातले आपुलकीने पाठवलेले किती आणि फॉरवर्ड केलेले किती याचा प्रश्न पडतो. त्यामुळे लोकांना तणाव येतो व त्यामुळे ऍसिडिटी व बाकीचे आजार होतात. रात्ररात्र जागून OTT वर सिनेमे पाहिल्यामुळे झालेला त्रास वेगळा.
 
खरंतर व्हाट्सअपचा चांगला फायदाही आपल्याला करून घेता येतो.  परवाच माझ्याकडे एक रुग्ण व त्याची बायको आली होती. त्याला गेल्या तीन वर्षांपासून त्रास होता. त्याने अनेक तपास  केले होते.  मी त्याला म्हटलं तुला गेल्या  दोन वर्षापासूनचा त्रास आहे, म्हटलं काही तुझे जुने रिपोर्ट्स आहेत का? तर त्याने पाच मिनिटं फोनवर शोधायचा प्रयत्न केला पण त्याला काही मिळाले नाहीत. मी त्याला सांगितले की तू तुझा आणि तुझ्या बायकोचा एक छोटासा व्हॉट्सअप ग्रुप कर आणि त्याला  कुटुंबाचे आरोग्य असं त्या ग्रुपला नाव ठेव आणि पुढचे  तुझे सगळे जे रिपोर्ट्स आहेत ते त्या ग्रुपमध्ये टाक म्हणजे  ते शोधायला तुला सोपं जाईल.  एका ठिकाणी सगळे रिपोर्ट राहतात.  मला वाटतं व्हॉट्सअपमध्ये आपण निरर्थक मेसेजेस बघतो त्यापेक्षा अशा  छोट्या छोट्या  ग्रुप्समध्ये आपले अतिमहत्त्वाचे कागदपत्रं, आपल्या आरोग्याचे अहवाल  किंवा  ड्रायव्हिंग लायसन्स किंवा गाडीचे पेपर्स, इन्शुरन्स असे ठेवले तर मला वाटतं ते त्या क्षणी शोधायला खूप सोपं होते.  आपल्याला फोटो गॅलरी मधल्या हजारो फोटो मध्ये शोधण्यापेक्षा व्हॉट्सअपचा चांगला उपयोग करता येतो. 

हेही वाचा : हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला का दिला जातो? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….

व्हॉट्सअपचे बरेच फायदे आहेत. फोन किंवा व्हिडिओ कॉल हे सर्वजण  खूप करतातच पण आपल्या चांगल्या आरोग्यासाठी व्हॉट्सअपवर आपण नियंत्रण ठेवून त्यामध्ये काही आपल्यासाठी नियम राखून घेतले पाहिजेत.  १. दर पाच मिनिटांनी व्हॉट्सअप बघण्यापेक्षा काही विशिष्ट काळानंतरच थोड्यावेळासाठी बघायचं २. निरर्थक मेसेजेस वर  फार लक्ष देऊ नका ३.  तुमचे डोळे अगदी चुरचुरण्यापर्यंत तुम्ही मोबाईल बघू नका. ४. त्याचप्रमाणे तुमच्या हाताची बोटं, मानेच्या नसा  दुखेपर्यंत किंवा तुम्हाला अगदी तणाव येईपर्यंत व्हॉट्सअपमध्ये बुडून जाऊ नका. ५. मेसेजमध्ये  दिलेली माहिती बरोबर आहे की नाही किंवा मेसेजचा स्रोत माहिती नसेल तर असे मेसेज   फॉरवर्ड करू नका. ६. अनोळखी संपर्काना  ब्लॉक करा. ७. व्हॉट्सअप त्याच्या वापरकर्त्यांना दुहेरी पडताळणी वैशिष्ट्यासह अतिरिक्त सुरक्षा प्रदान करते.  यासाठी व्हॉट्सअप अकाउंट रीसेट आणि ऑथेंटिक करण्यासाठी ६ अंकी पिन आवश्यक आहे. सिमकार्ड चोरी झाल्यास ही सुविधा उपयुक्त ठरते. 

आधुनिक शोधांचा उपयोग आपल्या उपयोगासाठी केला पाहिजे. आनंददायी  आणि  आरोग्यपूर्ण आयुष्य हे व्हॉट्सअपपेक्षा जास्त महत्वाचे आहे आणि व्हॉट्सअपच्या बाहेरचं आयुष्य सुद्धा सुंदर आहे. याची सर्वाना पुन्हा एकदा जाणीव करून देणे आवश्यक आहे.