कडक उन्हाळा सुरु झाला आहे. अनेक ठिकाणी तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पार जाऊन पोहचले आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेले नागरिक बचावासाठी विविध पद्धतींचा वापर करत आहेत. यात काही लोक थंड पेय किंवा आईस्क्रीम खाऊन शरीरातील उष्णता कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना उन्हाळ्यात आईस्क्रीम खायला आवडते. पण काही लोक जास्त थंड होण्यासाठी एक-दोन नव्हे तर अनेक आईस्क्रीम खातात. पण जर तुम्ही देखील उन्हाळ्यात भरपूर आईस्क्रीम खात असाल किंवा आईस्क्रीम खाण्याचे शौकीन असाल तर त्याचे तोटेही जाणून घ्या.

फॅट वाढतात.

बर्‍याच अभ्यासातून हे समोर आले आहे की,आईस्क्रीममध्ये भरपूर साखर आणि कॅलरीज असतात. हे शरीरातील फॅट लवकर वाढवण्याचे काम करतात. यातून लठ्ठपणा वाढतो, तसेच इतर अनेक आजारांचाही धोका वाढतो. रोज ३ ते ४ आईस्क्रीम खाल्ल्यास शरीराला त्यातून १००० पेक्षा जास्त कॅलरीज मिळतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जे शरीराच्या आरोग्यासाठी खूप नुकसानकारक ठरते.

Woman Health Tips : महिलांनी ‘या’ वयानंतर हाय हिल सँडल्स घालणे टाळा, अन्यथा ‘या’ समस्यांना सामोरे जा

हृदय विकाराचा धोका वाढतो.

आईस्क्रीममध्ये सॅच्युरेटेड फॅट आढळते. यामुळे शरीरातील ट्रायग्लिसराइड्स आणि कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. यातूनच लठ्ठपणाची समस्या वाढते. त्याचबरोबर कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोका असतो. जर कोणी आधीच हायपरटेंशनचे रुग्ण असतील तर त्याची ही समस्या अनेक पटींनी वाढू शकते.

मेंदूवर थेट परिणाम होतो.

आईस्क्रीममध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि साखर जास्त असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. यामुळे मेंदूच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. यामुळे स्मरणशक्ती कमकुवत होते. यामुळे कमीत-कमी आईस्क्रीम खाण्याचा प्रयत्न करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डायबिटीजचे रुग्णांनी सावध राहा.

ज्या लोकांची डायबिटीज लेव्हल बॉर्डर आहे किंवा त्यांना डायबिटीज आहे. त्यांनी आईस्क्रीम खाऊ नये. ज्यांना जेनेटिक डिसऑर्डर आहे त्यांनी आईस्क्रीम खाणे टाळावे.