Soaked Figs Benefits: अंजीर हे एक पौष्टिक फळ आहे. हल्ली सोशल मीडियामुळे विविध फळं आणि ड्रायफ्रुट्स खाण्याचे अनेक फायदे सांगितले जातात, त्यापैकी अंजीर खाण्याचेही अनेक फायदे सतत चर्चेत असतात. गुडगावच्या फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्टप्रमुख दीप्ती खतुजा म्हणाल्या “अंजीरमध्ये फ्लेव्होनॉइड्स, फेनोलिक अ‍ॅसिड्स, कॅरोटीनॉइड्स आणि टोकोफेरॉलसह विविध जैविक सक्रिय घटक असतात, जे शतकानुशतके पारंपरिक औषधांमध्ये त्यांच्या आरोग्य प्रभावांसाठी, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल, श्वसन, दाहक, चयापचय आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरले जात आहेत.”

अंजीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे

अंजीरमध्ये प्रथिने (६.३१ ग्रॅम/१०० ग्रॅम आणि फायबर (१७.८१ ग्रॅम/१०० ग्रॅम, DW) जास्त असतात. अंजीराच्या विविध प्रकारांमध्ये वेगवेगळे फॅटी अ‍ॅसिड आढळून आले आहेत, ज्यामध्ये लिनोलिक अ‍ॅसिड सर्वात जास्त प्रमाणात आढळते, त्यानंतर लिनोलेनिक अ‍ॅसिड, पामिटिक आणि ओलिक असतात,” असे त्या म्हणाल्या.

अंजीरमध्ये कार्बोहायड्रेट्स (२६.०२ ± ०.६३ ग्रॅम/१०० ग्रॅम ताजे वजन) आणि अमिनो अ‍ॅसिड जसे की ल्यूसीन, लायसिन, व्हॅलिन आणि आर्जिनिनसारखे अमिनो आम्लदेखील जास्त प्रमाणात असतात.

त्यांच्या मते, बहुतेक फळांची चव साखरेच्या गुणोत्तरावरून निश्चित केली जाते. “पोषण मूल्य टिकवून ठेवण्यासाठी आणि अन्नाचे गुण वाढवण्यासाठी सेंद्रिय आम्ल आवश्यक आहेत. ते जळजळ कमी करण्यास, रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित करण्यास, कॅल्शियम शोषण्यास प्रोत्साहन देण्यास आणि रक्ताच्या गुठळ्या रोखण्यासदेखील मदत करतात,” असे त्या म्हणाल्या.

त्या म्हणाल्या की, इतर सामान्य फळांच्या तुलनेत अंजीरमध्ये सर्वाधिक खनिजे असतात. पोटॅशियम, कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, फॉस्फरसचा हा एक महत्त्वाचा स्रोत आहे. त्यात लोह, मॅंगनीज, जस्त, तांबे, निकेल आणि स्ट्रॉन्टियमसारखे ट्रेस घटकदेखील असतात.

पण, पोषक तत्वांनी भरलेल्या या सुपरफूड्सचा तुम्ही सर्वोत्तम फायदा कसा मिळवू शकता? तज्ज्ञ त्यांना रात्रभर भिजवून दररोज सकाळी दोन वेळा खाण्याचा सल्ला देतात.

दररोज रात्रभर भिजवलेले दोन अंजीर खाल्ल्यास?

“भिजवलेल्या अंजीरांनी दिवसाची सुरुवात केल्याने अनावश्यक वजन वाढण्यापासून रोखून आणि निरोगी राहण्यासाठी सूक्ष्म पोषक घटक मिळून चांगली सुरुवात होते,” असे खतुजा म्हणाल्या.

“सुके अंजीर भिजवल्यावर ते पचायला सोपे होतात. सकाळी उपाशीपोटी ते खावे. नियमित आतड्यांची हालचाल, चांगले पचन आणि पोटफुगी कमी करण्यास फायदेशीर,” असे चेन्नईतील सिम्स हॉस्पिटलच्या चीफ क्लिनिकल डायटिशियन डॉ. विनिता कृष्णन म्हणाल्या.

त्यांनी पुढे म्हटले की, जर तुम्हाला अशक्तपणाची समस्या असेल तर लोह थकवा कमी करण्यास मदत करते. कॅल्शियम हाडांच्या आरोग्यास मदत करते. महिलांसाठी अंजीर हार्मोनल संतुलनासदेखील मदत करू शकते. शिवाय ते त्यांच्या नैसर्गिक गोडवा आणि फायबरमुळे साखर खाण्याची इच्छा नियंत्रित ठेवते.

हैदराबादमधील हाय-टेक सिटीच्या केअर हॉस्पिटल्सच्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ सादिया सना यांनीही सहमती दर्शवली की, सकाळी उठल्यावर सर्वात आधी दोन भिजवलेले अंजीर खाणे ही एक सोपी आणि निरोगी सवय आहे, जी पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि नैसर्गिक साखर आणि फायबरमुळे तुम्हाला थोडी ऊर्जा देते. भिजवलेले अंजीर सुक्या अंजीरांपेक्षा पोटासाठी चांगले असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही किती वेळा घ्यावे?

डॉ. कृष्णन यांनी दररोजचे सेवन आदर्श असण्याची शिफारस केली. “फक्त दोनच अंजीर खा, त्याहून अधिक जास्त अंजीर खाणे आरोग्यासाठी योग्य नाही, कारण त्यामुळे पोटफुगीचा त्रास होऊ शकतो किंवा रक्तातील साखरेवर परिणाम होऊ शकतो.” त्या पुढे म्हणाल्या की, जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा तुम्हाला किडनी स्टोनचा आधीपासून त्रास असेल तर प्रथम तुमच्या डॉक्टरांशी बोला आणि त्यांचा सल्ला घ्या. कमी प्रमाणात आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून सेवन करणे महत्त्वाचे आहे आणि आहारात बदल करण्यापूर्वी पोषणतज्ज्ञ/आरोग्यसेवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.