Risk of Heart Attack During Angiography : नुकतेच चेन्नईमध्ये एक प्रकरण उघडकीस आले. एका माणसाला रात्री जेवणानंतर अचानक छातीत दुखायला लागले. त्यानंतर त्याला चेन्नईच्या एका रुग्णालयात नेण्यात आले आणि त्याच्या इको-कार्डिओग्राम (Echo-Cardiogram) व ईसीजी (ECG) या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या दोन्ही चाचण्यांमध्ये हा रुग्ण निरोगी असल्याचे समोर आले. त्यानंतर रात्रभर या रुग्णाला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आणि सकाळी ट्रेडमिल ईसीजी करण्यात आली. अगोदरच्या चाचण्या आणि ही चाचणी अशा दोन्हींमध्ये फरक दिसून आला. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला अँजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला. अँजिओग्राफी म्हणजे रक्तवाहिन्या तपासण्यासाठी एक्स-रेद्वारे केलेली प्रक्रिया होय. अँजिओग्राफीदरम्यान या रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली पडला.

त्याचे हृदय फक्त १० टक्के काम करीत असल्याने डॉक्टरांनी त्याला ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला. आता त्याचा डावा पाय, मांडीच्या मध्यभागापर्यंत कापला आहे; ज्यामुळे त्याचे हृदयाचे कार्य सुधारू शकेल. जर रुग्णाचे आरोग्य उत्तम राहिले, तर हृदय ट्रान्सप्लांटची गरज भासणार नाही.

curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
After cochlear implant surgery included in Mahatma Phule Jan Arogya Yojana Nagpur saw first surgery
महात्मा फुले योजनेतून राज्यातील पहिली कर्णरोपण शस्त्रक्रिया नागपुरात… दोन वर्षीय चिमुकला…
4 Essential Tests Every Woman Over 20 Should Do
हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी विसाव्या वर्षापासून प्रत्येक महिलेने कराव्यात ‘या’ चार चाचण्या; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात… –
Puneri patya viral puneri pati outside hospital funny puneri poster goes viral
PHOTO:“मी डॉक्टर आहे इंजेक्शनसाठी…” दवाखान्याबाहेर पेशंटसाठी लिहलेल्या सूचना वाचून पोट धरुन हसाल
Fact Check Of Little Girl Trapped Under Rubble
ढिगाऱ्याखाली अडकली चिमुकली, मदतीची करतेय याचना; हृदय पिळवटून टाकणाऱ्या VIRAL VIDEO मुळे उडाली खळबळ, पण सत्य काय? वाचा
State Bank of India fraud
तुमचंही SBI बँकेत अकाऊंट आहे का? मग जाणून घ्या एसबीआयनं दिलेली महत्त्वाची माहिती; अन्यथा क्षणात अकाउंट रिकामे
Baroda BNP Paribas Mutual Fund, Prashant Pimple,
‘व्याजदर शिखरावर असताना दीर्घ मुदतीची रोखे गुंतवणूक योग्य’

हे प्रकरण नीट लक्षात घेऊन अँजिओग्राफीदरम्यान हृदयविकाराचा झटका येण्याच्या शक्यतेबाबत आपण समजून घेऊ या. हृदयातील रक्तवाहिन्यांचे आरोग्य तपासणे व हृदयविकारास कारणीभूत ठरणारे ब्लॉकेज शोधणे यांसाठी ही एक सामान्य तपासणी आहे. दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली आहे.

हेही वाचा : घरी रितेश, विवेक जेवायला आले अन् अक्षय कुमार ९.३० ला झोपायला गेला; वाचा अक्षयच्या दिनचर्येविषयी तज्ज्ञ काय सांगतात..

गुरुग्राम येथील मणिपाल हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट व कार्डियाक इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट डॉ. ब्रजेश कुमार मिश्रा यांच्या मते, जेव्हा आपली छाती दुखते किंवा श्वास घेण्यास त्रास होतो तेव्हा आपल्याला हृदयविकाराशी संबंधित समस्या असल्याची शंका येते. डॉ. मिश्रा सांगतात, “अँजिओग्राफी ही एक सुरक्षित प्रक्रिया मानली जाते; पण काही वेळा रुग्ण हृदयविकाराच्या धोक्यामुळे चिंतेत असतात.”

चाचणीदरम्यान काय घडते?

ही चाचणी शरीरासाठी एवढी परिणामकारक नाही. एक बारीक नळी असते; ज्याला आपण कॅथेटर म्हणतो. ही नळी एका नसेद्वारे मांडी किंवा मनगटातून पुढे हृदयाकडे नेली जाते. डॉ मिश्रा सांगतात, “या नळीत विशिष्ट द्रव्य टाकण्यात येते; ज्यामुळे एक्सरेद्वारे डॉक्टरांना हृदयातील ब्लॉकेज आणि अरुंद रक्तवाहिन्या तपासण्यास मदत होते.”

अँजिओग्राफीदरम्यान हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का?

डॉ. मिश्रा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले, “ही अत्यंत दुर्मीळ बाब आहे; पण अँजिओग्राफीमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.” विशेषत: ज्या रुग्णांना हृदयविकाराचा धोका असतो, त्यांना अँजिओग्राफीदरम्यान हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण सामान्यतः ०.००१ टक्क्यांपेक्षा कमी असते. अनेक रुग्णांच्या बाबतीत अँजिओग्राफीदरम्यान कोणतीही गंभीर समस्या उद्भवत नाही.”

डॉ. मिश्रा सांगतात, “अनेक प्रकरणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण हृदयाच्या आरोग्य स्थितीवर अवलंबून असते. कॅथेटरमुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक फुटू शकतात; ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. अशा वेळी त्वरित उपचार करण्यासाठी डॉक्टर पूर्णपणे प्रशिक्षित असणे गरजेचे असते.

हेही वाचा : Four habits : तुम्हीसुद्धा काम करताना मांडी घालून बसता का? आरामदायक वाटणारी स्थिती या आरोग्य समस्यांना देते आमंत्रण; वाचा डॉक्टरांचा सल्ला

अँजिओग्राफीदरम्यान हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा?

अँजिओग्राफीदरम्यान हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॉक्टर भरपूर काळजी घेतात. डॉ. मिश्रा याबाबत म्हणाले, “तुमचे हृदयाचे आरोग्य चांगले आहे का, हे रक्त चाचणी आणि इमेजिंग चाचणीद्वारे तपासले जाते. या चाचण्या अत्यंत अनुभवी हृदयरोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जातात.”

काय लक्षात घ्यावे?

मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलच्या हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विद्या सुरतकल सांगतात, “छातीत दुखणे किंवा अस्वस्थ वाटणे, छाती भरून येणे, श्वास घेण्यास अडचण येणे किंवा अशक्तपणा जाणवणे इत्यादी हृदयविकाराची लक्षणे दिसताना तुम्ही जर अँजिओग्राफी न करण्याचा विचार करीत असाल, तर धोका अधिक वाढतो हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला अँजिओग्राफी करायची असेल, तर त्यापासून असलेल्या धोक्याविषयी डॉक्टरांबरोबर चर्चा करा आणि त्यांचा सल्ला घ्या.