नवी दिल्ली : ग्रामीण भागांत राहणाऱ्या मुलांपेक्षा शहरांत राहणाऱ्या मुलांना श्वसनासंबंधी आजार होण्याचा अधिक धोका असतो, असे एका संशोधनानंतर स्पष्ट झाले आहे. ‘पीडियाट्रिक पल्मोनोलॉजी’मध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार शहरांतील पाळणा घर, दमट वातावरणातील घरे आणि अधिक दाटवस्तीत राहणाऱ्या मुलांना श्वसनासंबंधी आजार होण्याचा अधिक धोका असतो, असे दिसून आले. ‘युरोपीयन रेस्पिरेटरी सोसायटी इंटरनॅशनल काँग्रेस’मध्ये नुकतेच हे संशोधन सादर करण्यात आले.

हेही वाचा >>> महिलांनो ‘ती’ जागा स्वच्छ ठेवण्यासाठी व्हजायनल वॉशची गरज आहे का? डॉक्टरांनी सांगितले सत्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डेन्मार्कमधील कोपेनहेगन विद्यापीठाच्या निकलस ब्रस्टँड यांनी हे संशोधन सादर केले. या संशोधनात ६६३ मुले आणि त्यांच्या माता सहभागी झाल्या होत्या. संशोधनानुसार शहरांमध्ये राहणाऱ्या मुलांना तीन वर्षांदरम्यान १७ वेळा सर्दी, खोकला आदी श्वसनासंबंधी आजारांचा संसर्ग झाला. तर, ग्रामीण भागांतील मुलांना असा संसर्ग १५ वेळा झाला. नवजात बालकांची रक्त तपासणी आणि ही मुले चार आठवडय़ांची झाल्यानंतर त्यांच्या रोगप्रतिकार शक्तीच्या क्षमतेचे विश्लेषण करण्यात आले. त्यावेळी ग्रामीण भागातील मुलांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्याचे दिसून आले, असे संशोधकांनी सांगितले.