फिशिंग अटॅक कुणावरही आणि कधीही होऊ शकतो. जॉब देण्याच्या निमित्ताने, एखाद्या ऑनलाईन व्यवहाराच्या संदर्भात, लॉटरी, कुपन, सेवाभावी संस्थांना मदत, सण उत्सवांसाठीचे निधी, पार्ट्या किंवा अजून कुठल्याही कारणासाठी फिशिंग अटॅक हा होतो. ऑनलाईन व्यवहार करताना काही मूलभूत गोष्टींची काळजी घेण्याचंही अनेकदा राहून जातं हेच वारंवार घडणाऱ्या घटनांमधून दिसून येतं. सगळ्यात सायबर क्राईम्समध्ये आपल्या भावना जवळून जोडलेल्या असतात हे कधीही विसरता कामा नये.

इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं प्रोफाईल असतं. हे प्रोफाईलींग निरनिराळ्या कंपन्या करत असतात तसंच सरकारं आणि हॅकर्सही करतात. प्रत्येक गटाचा हेतू निराळा असतो. मात्र अनेकदा डिजिटल जगात वावरणाऱ्या माणसांची माहिती गोळा करुन त्याचा पुर्नवापर हाही हेतू असू शकतो. आपण नेमके कसे आहोत हे आपल्या डिजिटल फूटप्रिंट्स वरुन ठरवलं जातं. आपण ऑनलाईन जगात आल्यानंतर करतो काय, वागतो कसे, काय लिहितो, काय शेअर करतो, कुणाला फॉलो करतो, कुठे कॉमेंट्स करतो, काय फोटो शेअर करतो, पोस्ट्स शेअर करतो, हे सगळं करत असताना आपल्या कुठल्या भावना तीव्र असतात. कशामुळे आपल्या भावना ट्रिगर होतात. कशा प्रकारच्या कन्टेन्ट वर आपण थांबतो, खिळून राहतो या सगळ्याला मिळून आपलं प्रोफाइल तयार होतं. आपल्या डिजिटल सवयी त्यात नोंदवलेल्या असतात. या आपल्या प्रोफाईलचा किंवा फूट प्रिंटचा वापर करून जशा आपल्यासमोर जाहिराती येतात तसंच आपल्यावर सायबर हल्ले करायची तयारीही सुरु असते. अशा हल्ल्यात जर आपण अडकलो तर आपलं भावनिक नुकसान होतच पण आर्थिक, व्यावसायिक नुकसान ही मोठ्या प्रमाणावर होतं.

Anti-Rape Wears To Avoid Rape Cases:
Anti Rape Underwear काय काम करतात बघा; श्रीमंतीच्या वेडात उत्पादकांनी महिलांच्या ‘या’ प्रश्नांची उडवली खिल्ली
Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?

हेही वाचा…Health Special: मॅरेथॉन धावताय? तर या टेस्ट केल्या आहेत का? (भाग १)

फिशिंग म्हणजे काय?

तोतया बनून, एखाद्या व्यक्तीचं, संस्थेचं खोटं रुप घेऊन फसवणूक केली जाते तेव्हा त्याला फिशिंग म्हटलं जातं. असे गळ टाकून बसलेले हॅकर्स इंटरनेटच्या दुनियेत अगणित असतात. एखादा मासा जरी त्यांच्या गळाला लागला तरी त्यांचं काम झालं. आपण किंवा आपल्या मुलांनी तो मासा व्हायचं की नाही हे ठरवणं गरजेचं आहे. म्हणूनच सायबर सेफ्टीचा विचार अतिशय गांभीर्याने केला पाहिजे.

फिशिंग म्हणजे मुळात फ्रॉड. धोका. ई- तोतयागिरी. एखादी महत्वाची माहिती, डाटा, पैसे उकळण्यासाठी किंवा इतर कारणांनी केलेले हल्ला. वर म्हटल्या प्रमाणे एखाद्या व्यक्तीची, संस्थेची खोटी ओळख निर्माण करून मग हा हल्ला केला जातो. अशावेळी ज्या मेल्स पाठवल्या जातात त्यात वापरलेली भाषा, लोगो, सह्या हे सगळं अगदी बेमालूम पद्धतीने केलेलं असतं त्यामुळे आपण ज्या व्यक्तीशी अगर संस्थेशी बोलतोय, ती व्यक्ती किंवा संस्था खोटी आहे, फ्रॉड आहे हे लक्षात येत नाही आणि माणसं फसतात.

फिशिंगमध्ये माणसांच्या भावनांना हात घातला जातो हे लक्षात घेतलं पाहिजे. यात तीनच भावना हल्लेखोरांच्या दृष्टीने महत्वाच्या असतात. एक भीती, दोन लालूच/मोह/ आकर्षण आणि तीन असुरक्षितता. या तीन पैकी मेल वाचणाऱ्याच्या मनातली एखादी जरी भावना ट्रिगर झाली तरी मासा गळाला लागलाच म्हणून समजा. त्यात आपण येताजाता आपल्या भावनांचा रिएलिटी शो सोशल मीडियावर आणि चॅटिंगमधून उभा करत असतो. आपलं प्रोफाईलींग होताना याच्याही नोंदी होतच असतात हे विसरून चालणार नाही. मग कधी एखादा डॉक्टर १० लाखाचे २० लाख करण्याच्या ऑनलाईन स्कीमचा बळी ठरतो तर कुणी पत्रकार वेगळ्या वाटेवर दिसणाऱ्या प्रतिष्ठित नोकरीच्या संधीची. भावनांचा ट्रिगर कसा आणि कुठे चालू होईल आणि आपल्याही नकळत आपण कशावर भरवसा ठेवायला तयार होऊ सांगता येत नाही आणि गळ टाकून बसलेल्या तोतयांना हे नक्की माहित असतं.

हेही वाचा…Health Special : सायबर बुलिंग कसं खच्चीकरण करतं? ते झाल्यास काय करायचं?

आता मुद्दा येतो तो अशा हल्ल्यांपासून वाचायचं कसं?

१) सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा लॉजिक वापरा.
२) जॉब ऑफर आहे, तर प्रत्यक्ष मुलाखतीचं नियोजन आहे का, एचआरशी चर्चा होतेय का याकडे लक्ष ठेवा, फक्त इमेलवरून होणाऱ्या संवादावर भरवसा कधीही ठेवायचा नाही.
३) जर कुठली ऑफर देणारी मेल आली असेल, उदा. नेटफ्लिक्सकडून काही ऑफर आहे, लोगो नेटफ्लिक्सचाच आहे. तर अशावेळी नेटफ्लिक्स किंवा ऑफर देणाऱ्या कंपनीच्या साईटवर जाऊन ऑफर नक्की आहे का हे बघा. तिथे नीटसं काही समजलं नाही तर ऑफिशिअल वेबसाईटवर कस्टमर केअर नंबर असतो, तो फिरवा, माहिती घ्या, फुकट नेटफ्लिक्स मिळतंय म्हणून कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका.
४) अंध विश्वास नको. कितीही मोठी व्यक्ती, संस्था असली तरीही क्रॉस चेक करण्याची सवय ऑनलाईन जगात वावरताना प्रत्येकाने स्वतःला लावून घेतलीच पाहिजे.
५) आपण ऑनलाईन काय आणि कशासाठी शेअर करतोय हे स्वतःला विचारा. कारण आपण जे काही शेअर करू त्याचा उपयोग आपलं प्रोफाईलींग बनवण्यासाठी होणारच आहे.
६) फोन, लॅपटॉप किंवा इतर गॅजेट्सना अँटी व्हायरस असायलाच हवा.
७) चुकूनही कधीही स्वतःचा पासवर्ड, ओटीपी कुणालाही देऊ नका. शेअर करू नका.
८) माहित नसलेल्या लिंक्सवर कधीही क्लिक करू नका.
९) यातच एक विशिंग नावाचा प्रकार असतो, ज्यात फोनवरून टार्गेट केलं जातं. महत्वाची माहिती चोरण्याचा हेतू असतो. अशा कॉल्सकडून जर वैयक्तिक माहिती मागितली गेली तर देऊ नका. ते तुम्हाला बोलण्यात गुंगवून ठेवतील आणि मग हळूच माहिती काढून घेतील. अशा कॉल्सशी मुळात गप्पा मारत बसण्याचीच गरज नसते.
१०) स्मिशिंग, यात एसेमेस करून टार्गेट करतात. एसेमेसमध्ये लिंक असते. त्यावर क्लिक केलं की हमखास गडबड झालीच समजा. जर काही ऑफर किंवा तत्सम लालूच असेल तर क्रॉसचेक करा. चुकूनही एसेमेसला उत्तर देऊ नका. चुकूनही लिंकवर क्लिक करू नका.