Old Blood Pressure Drug Hydralazine Treat Brain Tumors: रक्तदाबाचे एक जुने औषध आता एका गंभीर आजारावर प्रभावी ठरत असल्याचा दावा एका नवीन संशोधनातून करण्यात आला आहे. ७० वर्षे जुने रक्तदाबाचे औषध आता मेंदूच्या ट्यूमरवर उपचा करण्यासाठी प्रभावी ठरू शकते असे नवीन संशोधनातून दिसून आले आहे. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी हायड्रॅलाझिनचा वापर अनेक वर्षांपासून केला जात आहे. प्रामुख्याने गरोदरपणात याचा वापर केला जातो. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील शास्त्राज्ञांना असे आढळून आले आहे की, हे औषध मेंदूच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी देखील प्रभावी ठरू शकते. हे संशोधन सायन्स अॅडव्हान्सेस या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

जुन्या औषधाचा वापर

हायड्रॅलाझिन हे ७० वर्षांहून अधिक जुने औषध आहे आणि ते धोकादायक असा उच्च रक्तदाब नियंत्रित कऱण्यासाठी वापरले जाते. हे गर्भवती महिलांसाठी वापरले जाते. महत्त्वाचं म्हणजे इतक्या वर्षांनंतरही डॉक्टरांना त्याची वास्तविक mollicular mechanism पूर्णपणे समजलेली नाही. डॉ. क्योसुके शिशिकुरा यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, हायड्रॅलाझिनहे सर्वात सुरूवातीच्या व्हॅसोडिलेटर औषधांपैकी एक आहे आणि तरीही प्रीक्लेम्पसियावर उपचार करण्यासाठी सर्वात प्रभावी असल्याचे सिद्ध होते. प्रीक्लेम्पसिया ही गर्भधारणेची एक स्थिती आहे. यामध्ये २० आठवड्यांनंतर अचानक उच्च रक्तदाब आणि मूत्रात प्रथिने (प्रोटीन्युरिया) दिसून येतात. हे आई आणि बाळ दोघांसाठीही गंभीर धोका निर्माण करू शकते.

हे औषध क्लिनिकल प्रयोगांमधून विकसित केले गेले होते, मात्र त्यामागील जीवशास्त्र त्यावेळी पूर्णपणे समजले नव्हते. संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, हे औषध उच्च रक्तदाब आणि मेंदूच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये आश्चर्यकारक अंतर्दृष्टी देते.

हायड्रॅलाझिन हे औषध कर्करोगाशी कसे लढते?

संशोधकांना असे आढळले आहे की, हायड्रॅलाझिन २-अमिनोइथेनेथिओल डायऑक्सिजेनेज (ADO) नावाच्या एका लहान पण महत्त्वाच्या एन्झाइमला थेट लक्ष्य करते. हे एन्झाइम रक्तवाहिन्यांना आकुंचन पावायचे सूचित करते. डॉ. मॅथ्यूजच्या मते, ADO ही शरीराची अलार्म सिस्टिम आहे, जी ऑक्सिजनची पातळी कमी होताच लगेच सक्रिय होते. बहुतेक प्रक्रियांना वेळ लागतो, मात्र ADO काही सेकंदात बायोकेमिकल स्विच चालू करते. हायड्रॅलाझिन हे औषध ADO ब्लॉक करते, त्यामुळे कर्करोगाच्या पेशींना पाठवलेला अलार्म सिग्नल बंद होतो. यामुळे आक्रमक अशा ब्रेन ट्यूमरची वाढ थांबू शकते.

मेंदूच्या कर्करोगासाठी हायड्रॅलाझिन हे सुरक्षित औषध कसे?

या संशोधनामुळे भविष्यात मेंदूच्या कर्करोगाविरूद्ध सुरक्षित आणि अधिक प्रभावी औषधे विकसित होऊ शकतात. डॉ. मॅथ्यूज म्हणतात की, जुने ह्रदयरोगावरील औषध आपल्याला मेंदूबद्दल काहीतरी नवीन शिकवते ह खूपच दुर्मिळ आहे. या संशोधनामुळे उपचारांसाठी नवीन मार्ग खुले होऊ शकतात.