आज आपण वेदनेबद्दलची थोडी क्लिष्ट पण महत्वाची संकल्पना बघणार आहोत, सेंट्रल सेंसिटायझेशन म्हणजे केंद्रीय मज्जासंस्थेने (central nervous system) कुठल्याही फिजिकल, केमिकल उत्तेजनेला दिलेली अवास्तव किंवा अबनोरमल प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद.

अजून सोप्या भाषेत सांगायचं तर मेंदूने कुठल्याही उत्तेजनेच (stimulus) केलेलं ओवरएस्टीमेशन. साहजिकच जेव्हा उत्तेजनेच मेंदूतल एस्टीमेशन अवास्तव असेल तेंव्हा दिला जाणारा प्रोटेक्टिव रिस्पॉन्ससुद्धा अवास्तव असेल आणि हा प्रोटेक्टिव रेस्पोंस म्हणजे वेदना! लहनात लहान किंवा अगदी निरुपद्रवी उत्तेजनेला मेंदू ओवरएस्टीमेट करतो आणि उत्तेजनेच्या कितीतरी अधिक पटीत वेदना निर्माण करतो. नुसता हात लावला तरी ओरडतो/ ओरडते-नाटकएत नुसती, हीच रोजच नवीन काही ना काही दुखत, असं कसं कुणाचं पूर्ण शरीर च दुखु शकतं, सेंट्रल सेंसिटायझेशन च्या रुग्णांबद्दल त्यांचे नातेवाईक, मित्र बहुतेकवेळा असा विचार कारतात. द पेशंट इज फेकिंग द पेन ! असा दृष्टिकोन ठेवून बघितल्या जातं, सेंट्रल सेंसिटायझेशनचे रुग्ण त्यांच्या वेदना ज्याप्रकारे अनुभवतात ते खरं आहे आणि हियर द पेशंट इज नॉट फेकिंग द पेन!

45 year old man underwent successful periampullary cancer surgery
४५ वर्षीय व्यक्तीवर स्वादुपिंडाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया!
jupiter transit Earn lots off money of the people of these three signs
३०० दिवस कमावणार बक्कळ पैसा! गुरू ग्रहाच्या कृपेने ‘या’ तीन राशीच्या लोकांची आर्थिक समस्या होणार दूर
After 50 years Sun-Saturn will create Shadashtak Yoga
५० वर्षांनंतर सूर्य-शनी निर्माण करणार ‘षडाष्टक योग’; ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना करावा लागणार अडचणींचा सामना
Twelve year girl rescued from obesity Treatment by bariatric surgery pune print news
बारा वर्षांच्या मुलीची लठ्ठपणापासून सुटका; बॅरिॲट्रिक शस्त्रक्रियेद्वारे उपचार; वजन १०६ वरून ८६ किलो
mars saturn sextile What does this planetary movement mean for your zodiac sign magal shani sextile at 60 degree angle these zodiac sign will get rich soon
आता पालटणार ‘या’ राशींचे नशीब! १०० वर्षांनंतर शनि अन् मंगळाचा दुर्मीळ संयोग; अचानक होणार धनलाभ, तिजोरी भरणार?
268 days Happiness and prosperity in the life
पुढचे २६८ दिवस पैसाच पैसा! शनीच्या कृपेने ‘या’ चार राशीधारकांच्या आयुष्यात सुख-समृद्धी
My friend Half a century of friendship
माझी मैत्रीण : मैत्रीचं अर्धशतक!
Rahu In Shani Nakshatra Gochar 2024
शनीच्या नक्षत्रात सोन्याचे दिवस, ‘या’ ५ राशींचे अच्छे दिन जुलैच्या पहिल्याच आठवड्यात होणार सुरु; तुम्हाला कशी लाभेल श्रीमंती?

आणखी वाचा: Health Special: पावसाळ्यात थंड पदार्थ का टाळावेत?

सेंट्रल सेंसिटायझेशनची कारणं

१ कुठलीही वेदना बर्‍याच काळापर्यंत राहिली (क्रोनिक पेन) की मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये बदल होऊ शकतात हे बदल संरचनात्मक, कार्यात्मक आणि रासायनिक असतात ज्यामुळे ते उत्तेजनांना अधिक संवेदनशील बनवतात, या प्रक्रियेला केंद्रीय संवेदीकरण म्हणतात.

२ (न्यूरोइनफ्लेमेशन)Neuroinflammation: एखादी वेदना शरीरात वर्षानुवर्ष राहिली की मेंदू आणि पाठीच्या कण्यातील मज्जातंतूंचं इनफ्लेमेशन होतं, त्यामुळे त्यांची वेदनेचं प्रोसेसिंग करण्याची पद्धत आणि क्षमता बदलते. अशावेळी मेंदूला वेदनादायक आणि वेदनारहित उत्तेजनामधला फरक लक्षात येत नाही, नॉर्मल उत्तेजना जसं की हलका स्पर्श (Light touch) सुद्धा वेदनादायक ठरविला जातो आणि त्यानुसार प्रतिक्रिया दिली जाते. म्हणूनच बाकी व्यक्तींना हे कळत नाही की या रूग्णाला नुसता स्पर्श केला तरी इतकी वेदना का होते आहे, काहीवेळा उत्तेजना वेदनादायक असली तरी दिला जाणारा प्रतिसाद हा उत्तेजनेच्या कितीतरी पट अधिक असतो, क्रोनिक संधिवात, कंबरदुखी, मानदुखी, पाठीच्या कण्याचे आजार, अॅमप्युटेशन (शरीराचा एखादा भाग कापावा लागणे), दीर्घकाळ चालत आलेला मानसिक ताण, नैराश्य, शिवाय मेंदूला दुखापत, काही विशिष्ट औषधे यामुळे सेंट्रल सेंसिटायझेशन होऊ शकते.

आणखी वाचा: Mental Health Special: मोबाईलमध्ये मश्गुल मुलांचं काय करायचं?

३ दुखापती: जेव्हा शरीराच्या ऊतींना दुखापत होते, तेव्हा ते बरे होण्यास मदत करण्यासाठी शरीरात काही इन्फलमेटरी रसायनं तयार होतात. ही प्रक्रिया न्यूरॉन्सना (मज्जातंतू पेशी) संवेदनशील करते, त्यामुळे व्यक्तीला दुखापत बरी झाल्यानंतरही वेदना जाणवत राहते.

४ मानसशास्त्रीय घटक: वेदना हा भावनिक आणि शारीरिक अनुभव आहे. तुम्हाला तुमच्या वेदना कशा वाटतात, तुम्ही त्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघता, त्याबद्दल कसा विचार करता यावर तुमच्या मेंदूतलं वेदनेचं प्रोसेसिंग अवलंबून आहे.

सेंट्रल सेंसिटायझेशनची लक्षणं
अनएक्सप्लेन्ड पेन अशी वेदना ज्याचे कारण डॉक्टर निदान करू शकत नाही. पेन नॉट रेस्पोंडिंग टु ट्रीटमेंट तीव्र वेदना जी शारीरिक उपचारांना प्रतिसाद देत नाही. अनयुज्वल पेन सेंसिटीविटी शारीरिक वेदनेप्रति अति संवेदनशीलता अलोडायनिया हलका स्पर्श यासारख्या सामान्य उत्तेजनांना संवेदनशीलता हायपरालजेसिया उत्तेजनेच्या तीव्रतेपेक्षा अवास्तव तीव्रता आणि कालावधी असलेली वेदना. सेकंडरी हायपरालजेसिया उत्तेजनामुळे प्रभावित क्षेत्राच्या पलीकडे असलेल्या भागात जाणवलेली वेदना हायपरपथिया कमी तीव्रतेच्या पण पुन्हा पुन्हा येणार्‍या उत्तेजनेपासून होणारी वेदना.

क्रमश: