लहान मुलांच्या हातात मोबाईल देताना अनेकदा या मोबाईलच्या सवयीचं पुढे काय होईल याचा विचार पालकांनी केलेला नसतो. सुरुवातीला ही पालकांची सोय असते. पण मुलांना एकदा सवय झाली आणि मुलं किशोरवयात आली की पालक अचानक जागे होतात आणि मुलांच्या हातातला फोन काढून घ्यायला बघतात. एव्हाना, फोन सतत जवळ असण्याची सवय मुलांना लागलेली असते. दहाबारा वर्षांची किंवा त्याहीपेक्षा लहान मुलं मोबाईल घेऊन काय करतात? तर गेम्स खेळतात आणि त्यावरच्या वयोगटातली मुलं गेम्सबरोबर व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक यावर वावरायला लागतात. मुलांच्या मोबाईल गेम्सची स्वतंत्र इंडस्ट्री आपल्याकडे उभी राहिली आहे. ते त्यांना माहीत असलेल्या साइट्‌स बघतात, गुगल करून नवीन साइट्स शोधतात. यूट्युबवर वेगवगळे व्हिडिओज्‌ बघतात. पॉर्न साईट्सवर जातात. नेटवरचा मुलांचा संचार आपल्याला वाटतो त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त आणि वेगवान आहे. भारतीय माणसांचा सर्वसाधारण स्क्रीन टाइम सात ते आठ तासांचा आहे. आणि यात मुलंही आलीच.

जिथे पालकांनाच इंटरनेट वापरासंदर्भात बंधनं नको असतात; तिथे ती लहान मुलांना का हवीशी वाटतील? बहुतेकदा स्मार्टफोनच्या सवयी किंवा व्यसनं पालकांमुळेच मुलांना लागतात. एकतर अनेकदा पालक स्वतःच नको त्या वयात मुलांच्या हातात फोन देतात किंवा पालकांचाच स्क्रीन टाइम इतका प्रचंड असतो की त्यांचं बघून मुलंही प्रचंड प्रमाणात फोन वापरायला लागतात. बाथरूममध्ये फोन घेऊन जाणाऱ्या मुलांचे पालकही अनेकदा बाथरूममध्ये फोन घेऊन जाणारे असतात. आईबाबा स्मार्टफोन कसा वापरतात हे बघून मुलं स्वतःच्या हातातला फोन वापरायला शिकतात. ज्याप्रमाणे आजूबाजूच्या बऱ्याच गोष्टी मुलं अनुकरणातून आणि अनुभवांतून शिकतात; त्याच पद्धतीनं स्मार्टफोन, इंटरनेट हे वापरणंही मुलं पालकांकडून कळत-नकळत शिकतात हे समजून घेतलं पाहिजे.

kids at home
शाळांना सुट्ट्या लागल्या, मुलांना कुठे ठेवायचं? पालकांच्या प्रश्नांची सोपी उत्तरे!
children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
what is learning disorder marathi, learning disorder marathi article
Health Special: अध्ययन अक्षमता म्हणजे काय ? अशा मुलांसाठी काय करायचं?
Son Of Farmer Placed To Job Pass Goverment Exam While Farming
VIDEO: जिथे संघर्ष तिथे विजय! वडील शेतात असताना लेकाचा रिझल्ट लागला; एकमेकांना मिठी मारुन रडू लागले बाप-लेक

हेही वाचा : तुमच्या मित्रांचे ‘हे’ स्वभाव आयुष्य वाढवण्यासाठी ठरतात जादुई फंडा; पण ‘ही’ एक बाजू सांभाळाच!

पालकांच्या इंटरनेटच्या आणि स्मार्टफोन वापराच्या सवयी ज्या आणि जशा आहेत; त्यांचा प्रभाव मुलांवर पडणार आहे. इंटरनेट, सोशल मिडिया आणि स्मार्टफोन या आधुनिक काळाच्या महत्त्वाच्या क्रांतीचा प्रभाव आपल्या मुलांच्या जगण्यावर असणार आहे हे समजून घेऊन स्वतःच्या डिजिटल सवयी जर पालकांनी योग्य केल्या तर मुलांपर्यंत ते पोहोचणार हे लक्षात घ्या. आजची मुलं या तंत्रज्ञानाच्या डाएटबरोबरच मोठी होत आहेत ही गोष्ट मान्य करायला हवी. अनेकदा पालकांना मानसिक पातळीवर या गोष्टीचा स्वीकार नसतो; त्यामुळे मुलांच्या आयुष्यातलं आभासी जग त्यांना आवडत नाही, झेपत नाही. आपल्यापेक्षा वेगळं जगणाऱ्या मुलांशी जीवनशैलीवरून त्यांची भांडणं होतात. तंत्रज्ञानाशी किंवा तंत्रज्ञानाविषयी मुलांशी भांडून प्रश्न सुटणार नाही.

हेही वाचा : Winter Blues : हिवाळ्यात उदासपणा का जाणवतो? ‘या’ गोष्टी असू शकतात कारणीभूत; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात

आपण एकदा पालक झालो की जगातले सगळे नियम फक्त आपल्या मुलांसाठी आहेत आणि ते नियम राबवून आपण मुलांना योग्य वळण आणि शिस्त लावतो असा आपला म्हणजे तमाम पालकांचा समज असतो… पण वर म्हटल्याप्रमाणे मुलं अनुकरण करतात. जर मुलांनी स्मार्टफोन योग्य पद्धतीनं वापरावा असं वाटत असेल, जर त्यांच्या तंत्रज्ञान वापरासंदर्भातल्या सवयी चांगल्या विकसित व्हाव्यात असं वाटत असेल; तर नियम फक्त मुलांसाठी करून चालणार नाही. आधी नियम पालकांनी स्वतःला लावले पाहिजेत. मुलांना शिस्त लावण्याआधी स्वतःला शिस्त लावली पाहिजे. जर तुमचा सोशल मिडिया आणि स्मार्टफोन वापर मुलांना चांगला आणि ‘हेल्दी’ दिसला; तर त्यांच्या सवयीही तशाच तयार होतील हे लक्षात घ्या.

हेही वाचा : Health Special : स्थित्यंतरे आणि मानसिक स्वास्थ्य

आपल्याकडे होतं उलट. आईबाबा हॉटेलमध्ये गेल्यावर आपापल्या फोनमध्ये डोकं खुपसून बसणार आणि मुलांनी तसं केलं; तर मात्र त्यांना रागावणार किंवा आईबाबा जेवताना सतत व्हॉट्सॲप चेक करणार आणि तेच मुलांनी केलं की त्यांच्या हातातनं फोन काढून घेणार. हे योग्य नाही. जर मुलांनी जेवताना फोन बघू नये असं वाटत असेल, जर कुटुंबाबरोबर बाहेर गेल्यानंतर मुलांनी नेटमध्ये डोकं घालून बसू नये असं वाटत असेल; तर या गोष्टी आधी पालकांनीही टाळल्या पाहिजेत. आम्ही बेफाम वागणार आणि मुलांनी शिस्तीत राहायचं हे कसं जमणार बरं?
त्यामुळे मुलांना नियम आणि शिस्त लावण्याआधी आपण काय करतोय हे पालकांनी बघितलेलं बरं !