Seating in folding leg position health risk: अनेकदा जेवताना, मित्रांसोबत गप्पा मारताना किंवा खुर्चीवर आरामात बसताना मांडी घालून बसल्यास आरामदायी वाटते. ही सवय अशी सामान्य मानली जाते. मात्र एका संशोधनानुसार, जास्त वेळ मांडी घालून बसल्याने शरीराला अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. या सवयीचा तुमच्या तुमच्या शरीरावर खोलवर परिणाम होऊ शकतो. तसंच हळूहळू तुमच्या पाठीचा कणा, पेल्विस स्नायू आणि रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो.

बीएमसी स्पोर्ट्स सायन्स, मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, जे लोक नियमितपणे मांडी घालून बसतात त्यांच्या कंबरेची स्थिती अतिशय कमकुवत असल्याचे आढळून आले. तसंच पबमेडमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, मांडी घालून बसल्याने पेल्विसचा झुकाव वाढतो आणि मणक्यावर दबाव पडतो. दीर्घकाळ मांडी घालून बसण्याचे तोटे काय आहेत आणि ते कमी करण्याचे मार्ग काय आहेत हे जाणून घेऊन…

बॅलन्स किंवा संतुलन लक्षात घेणं

शरीराची पोझिशन आपली कंबर स्थिर ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. संशोधनानुसार, जे लोक दिवसातून तीन तासांपेक्षा जास्त वेळ मांडी घालून बसतात त्यांना पाठीच्या दुखण्याचा त्रास होतो. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला काही कळतच नाही की त्याची पाठ सरळ आहे की वाकलेली आहे. कालांतराने त्याच्या पाठीची पोझिशनच बदलून जाते.

ओटीपोट आणि असमान दबाव

मांडी घालून बसल्याने शरीराचे वजन समान प्रमाणात वितरित होत नाही. त्यामुळे पेल्विसचा एक भाग उंचावतो.त्यामुळे पेल्विस तिरकस होऊ शकते. सोबतच ग्लूटियल स्नायूंवर म्हणजेच कंबरेवरील स्नायूंवर असमान दबाव पडतो. ही परिस्थिती कंबरदुखी असलेल्यांसाठी अधिक धोकादायक ठरू शकते.

मणक्याच्या नैसर्गिक वक्रतेत बदल

आपल्या मणक्याला लंबर लॉर्डोसिस नावाचा एक नैसर्गिक आतील वक्र असतो. बराच वेळ मांडी घालून बसल्याने हा वक्र सपाट होतो. यामुळे मणक्यावर आणि डिस्कवर जास्त दबाव पडतो. कालांतराने ही समस्या दीर्घकालीन पाठदुखीमध्ये बदलू शकते.

कंबर आणि पेल्विक स्नायूंवर ताण

मांडी घालून बसल्याने पिरिफॉर्मिस हा एक लहान पण महत्त्वाचा स्नायू असामान्यपणे ताणला जातो. त्यामुळे पाठीचा कणा आणि पेल्विसला जोडणाऱ्या सॅक्रोइलियाक सांध्यावर देखील दबाव येतो. या सवयीमुळे पेल्विसच्या स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो आणि तुमच्या चालण्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

कोअर बॅलन्स
मांडी घातल्याने केवळ शरीराच्या खालच्या भागावरच नाही तर वरच्या भागावरही परिणाम होतो. अशा स्थितीत छातीची हालचाल कमी होते. पोटाच्या काही स्नायूंची क्रियाशीलता कमी होते. त्यामुळे धडाची स्थिरता कमी होते. दीर्घकाळ अशा अवस्थेत राहिल्यास श्वासोच्छवासाच्या क्षमतेवर आणि शरीराच्या संतुलनावर परिणाम होऊ शकतो.

याव्यतिरिक्त सकाळी उठल्यानंतर काही लक्षणे दिसल्यास ह्रदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकची शक्यता वाढते. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.