Daily Habits To Stay Fit: तंदुरुस्त राहणे म्हणजे कठीण डाएट किंवा जिममध्ये तासन् तास व्यायाम करणे नाही. बहुतेकदा दररोजच्या दिनचर्येतील लहान लहान सवयीदेखील आरोग्यात चांगले बदल घडवू शकतात. फिटनेस व्यावसायिकांच्या दृष्टीने तंदुरुस्त राहणे म्हणजे आहार, व्यायाम कमी आणि दररोज त्यांच्या आरोग्य उद्दिष्टांना समर्थन देणारी दिनचर्या तयार करण्याबद्दल जास्त लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे असते.

टोन३० पिलेट्समधील फिटनेस व पायलेट्स तज्ज्ञ डॉ. वजल्ला श्रावणी, एमपीटी यांनी अशा सात दैनंदिन सवयी सांगितल्या आहेत, ज्यांचे पालन त्या सडपातळ आणि तंदुरुस्त राहण्यासाठी करतात.

नियम झोपण्याची आणि उठण्याची वेळ : डॉ. श्रावणी म्हणतात की, त्या नियमित झोपेचे आणि जागे होण्याचे चक्र स्थिर ठेवतात. चांगली झोप भुकेच्या संप्रेरकांचे नियमन करते, पुनर्प्राप्तीस मदत करते व दिवसभर ऊर्जा स्थिर ठेवते.

कामाच्या ठिकाणी चालणे : तज्ज्ञांच्या मते दिवसाला दररोज सात ते १० हजार पावले चालायला हवे. चालण्यासारख्या कमी तीव्रतेच्या हालचालींमुळे चरबीची चयापचय क्षमता सुधारते आणि नसांमधील कडकपणा टाळता येतो. त्यामुळे ज्यांना ऑफिसमध्ये तासन् तास बसून काम करावे लागते, त्यांनी दर दोन तासांनी चालावे.

दिवसाच्या सुरुवातीला हायड्रेशनला प्राधान्य देणे : डॉ. वजल्ला श्रावणी सांगतात की, त्या सकाळची सुरुवात त्या किमान ५०० मिली पाण्याने करतात. बऱ्याचदा लोक तहान आणि भूक यात गोंधळतात; परंतु हायड्रेटेड राहिल्याने ऊर्जा वाढते.

लक्षपूर्वक खाणे : डॉ. श्रावणी हळूहळू आणि स्क्रीनशिवाय खाण्याचे महत्त्व अधोरेखित करतात. त्यामुळे त्यांना पोट कधी भरले आहे हे ओळखण्यास मदत होते आणि कालांतराने जाणीवपूर्वक निर्बंध न ठेवताही जेवणाचे प्रमाण नैसर्गिकरीत्या कमी होते.

दररोज किमान १० मिनिटे हालचालींचे काम करणे : फक्त १० मिनिटे स्ट्रेचिंग किंवा शारिरीक हालचाल करण्याचे काम दुखापतींपासून बचाव करते आणि व्यायामाची गुणवत्ता सुधारते. हे मानसिकदृष्ट्याही आधारभूत आहे.

सकाळच्या वेळेचा सदुपयोग करणे : डॉ. श्रावणी सांगतात की, सकाळी उठल्यानंतर त्या सुरुवातीला ईमेल किंवा सोशल मीडिया तपासणे टाळतात. त्याऐवजी तो वेळ त्या श्वास घेणे, थोडे फिरायला जाणे किंवा वाचन यांसाठी वापरतात.

रात्रीचे जेवण व झोपण्याची वेळ यांमध्ये दोन तासांचे अंतर ठेवणे: रात्रीचे जेवण आणि झोपण्याची वेळ यांमध्ये दोन तासांचे अंतर ठेवावे. ही कृती पचनास मदत करते, झोपेची गुणवत्ता सुधारते आणि या सवयीमुळे जास्त खाण्याची शक्यता कमी होते.

दिनचर्येत लवचिकतेसह शिस्तीचे संतुलन साधणे

डॉ. श्रावणी सांगतात, “मला आता हे समजले आहे की, शिस्त ही परिपूर्णतेसाठी नाही, तर ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिसून येण्याबद्दल आहे. जरी ती तुमची ‘आदर्श’ दिनचर्या नसली तरीही. कमी प्रेरणा असलेल्या दिवसांमध्ये, त्या २० मिनिटांचा छोटासा व्यायाम, काही स्ट्रेच किंवा बाहेर फक्त चालणे अशा दिनचर्येचा एक सोपा पर्याय अवलंबतात. काहीही नसण्यापेक्षा काहीतरी नेहमीच चांगले असते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेवटी डॉ. श्रावणी शारीरिक संतुलनावर भर देत हे स्पष्ट करतात की, विश्रांती, सामाजिक जीवन आणि कधी कधी मजा-मस्ती, अशी दिनचर्या असावी. त्यामुळे शरीर लवचिक राहायला मदत होते. निरोगी राहण्यासाठीचे प्रयत्न हे शिक्षेसारखे वाटता नयेत. कारण- त्यांचा तुमच्या शरीराशी दीर्घकालीन संबंध आहे.