सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या वर्षी तर यावर्षीचा राष्ट्रीय पोषण मास सुपोषित भारत,साक्षर भारत, सक्षम भारत या धर्तीवर साजरा केला जाणार आहे.

भारतात अनेक भागात कुपोषणामुळे विविध वयोगटातील व्यक्तींच्या आरोग्यावर दुष्परिणाम झाल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी​ पूरक आहार न मिळाल्यामुळे एक मोठा वर्ग कुपोषणाला बळी पडल्याचे पाहायला मिळते. अनेक शहरी भागांमध्ये अनेकदा खाण्याच्या चुकीच्या निर्णयांमुळे निकस आकाराचे प्रमाण जास्त आहे. इथेच आहार साक्षरतेचा मुद्दा अधोरेखित इथेच आहार साक्षरतेचा मुद्दा अधोरेखित होतो. आहाराशी निगडित खाद्यपदार्थां बाबत असणाऱ्या गैरसमजांमुळे आहारामध्ये मोठ्या प्रमाणात चुकीच्या अन्न घटकांचे प्रमाण अवाजवी वाढविले जाते. परिणामी आहाराचे संतुलन ढळते. अनेक शहरांमध्ये अतिपोषण हादेखील कुपोषणाचा भाग पाहवयास मिळतो.

crow playing tic tac toe viral video
मालक अन् कावळ्यात रंगला फुल्ली-गोळ्याचा खेळ! पाहा कोण जिंकलं…. Video होतोय व्हायरल
Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral
big boss winner munawar faruqui
‘बिग बॉस’ विजेता मुनावर फारुकीवरून दुकानात येण्यावर दोन व्यावसायिकांमध्ये वाद, सात जणांवर गुन्हा दाखल

भारतात विविध प्रकारची उत्तम तृणधान्ये कडधान्य तयार होतात. दरवर्षी वेगवेगळ्या हंगामात वेगवगेळ्या प्रकारची पीकं घेतली जातात . भारतात बदलणाऱ्या ऋतूनुसार वेगेवेगळ्या प्रकारच्या भाज्या, फळे यांचे उत्पादन घेतले जाते. या सगळ्या अन्न पदार्थाचं आहारशास्त्र आणि आरोग्य शास्त्रांबरोबर विशेष नातं आहे. अन्न घटकांतील पोषक तत्वांचे आहारात योग्य पदार्थात समावेश करता यावा आणि त्यातील पोषणमूल्यांचा पूर्णपणे शरीराला फायदा मिळावा यासाठी त्यावर योग्य संस्कार करणे आणि त्यांचे योग्य घटकांसोबत सेवन करणेदेखील तितकेच महत्वाचे आहे.

आजच्या युगामध्ये आहाराबद्दलची अमाप माहिती उपलब्ध असताना देखील केवळ एखाद्या ट्रेंडपायी किंवा विचित्र आपण आहारातील पोषण मूल्यांपासून बरंच दूर जातो. आहार साक्षरता हा मुद्दाआहारातील मूलभूत तत्वांशी म्हणजेच समग्र आहाराशी संबंधित आहे.


कोणताही खाद्य पदार्थ खाताना मग तो घरात असो किंवा घराबाहेर ;त्याचा शरीरावर होणार परिणाम जाणून घेणे आवश्यक आहे . आपण आपल्या भुकेनुसार खातोय कि अन्नाचा वापर वेळ मारून नेण्यासाठी आहे? आपल्या शरीराला एखादा अन्नपदार्थ पचेल का , त्यातून केवळ कॅलरीज मिळतायत कि जीवननसत्त्वे देखील पूरक आहेत. शिवाय आपल्या आताच्या प्रकृतीसाठी हे अन्न मानवणारे आहे का? एखादा अन्न पदार्थ वर्ज्य करताना आपण मूलभूत अन्नघटक तर आहारबाह्य करत नाही आहोत ना याबद्दल माहिती करून घेणे आवश्यक आहे . यासारख्या प्रश्नाची उत्तर अन्नाबद्दलच्या सजग भानामधून येते .

कोणत्याही आहार पद्धतीचा किंवा कोणताही आहार घटकाचा आपण अतिरेक तर करत नाही ना याचा विचार म्हणून खूप आवश्यक आहे. विशेषतः पदार्थ शिजवताना किंवा त्यापासून एखादी वेगळी रेसिपी तयार करण्याच्या निमित्ताने आपण पोषणमूल्यांचा ऱ्हास होणार नाही यावर लक्ष द्यायला हवे. काही आठवड्यांपूर्वी एका व्हिडिओमध्ये पोह्यातील पोषक तत्व वाढवण्यासाठी हिरवे पोहे तयार केले गेले ज्यामध्ये पालकाच्या रसामध्ये पोहे भिजवून त्यानंतर त्याचे पोहे तयार केले गेले होते आणि व्हिडिओ सोबत असेही सांगितले गेले होते की पालकातील पोषक तत्वे या पोह्यांमध्ये आहेत आणि पोह्यांचा रंगही सुंदर दिसतो आहे.
पालकाचा रस पोह्यात एकत्र केल्याने केवळ हरितकांमुळे असणारा हिरवा रंग पोह्यात उतरू शकतो. शिवाय सोबत पालकात असणाऱ्या पोटॅशिअम आणि सोडियमचे प्रमाण अनावश्यक प्रमाणात वाढू शकते. आहार साक्षरतेचा मुद्दा लक्षात घेता वैज्ञानिक माहितीचा आधार आणि योग्य आह्रातज्ज्ञांचा सल्ला या दोन्ही गोष्टीचा विचार होणे गरजेचे आहे.

सकस आहारबाबत – हे कायम महागडं प्रकरण आहे असा एक गैरसमज आहे . खरं तर आहार संतुलन भारतीयांसाठी सगळ्यात सोपी आणि सहज उपलब्ध असणारी गोष्ट आहे. आपल्याकडे घरगुती, पोषक आणि सहज तयार केले जाणारे पदार्थ आहेत; तसेच विविध प्रदेशांमध्ये विविध प्रकारचे पाकसंस्कार केले जाणारे पदार्थ देखील आहेत . अनेक संशोधन प्रक्रियेत सक्रिय असणारे अनेक आहारतज्ज्ञ भारतीय आहाराबाबत आपल्या पारंपरिक पद्धतीचा आहारात समावेश करण्यासाठी आग्रही असतात . साखर असो किंवा मांसाहार आहारातील प्रथिने, कर्बोदके स्निग्ध पदार्थ आणि पोषक तत्त्वांचा या त्रयींचा योग्य संतुलन राखण्यासाठी आपण प्रयत्नशील असायला हवे.

मला हेच खायची सवय आहे किंवा मला हेच आवडतं किंवा मला ते आवडतच नाही अशा केवळ भ्रामक समजुतीपायी किंवा स्वतःच्या समजांचे लाड करण्यापायी आपण अनेक बाबतीत शरीराचे नुकसान करतो. हे टाळण्यासाठी आहाराबद्दल जागरूक असणं आणि त्याबद्दल तिळमात्र देखील कोणत्याही प्रकारचे गैरसमज करून न घेणं आणि गैरसमज पसरू न देणं हि जबाबदारी प्रत्येक भारतीयाने घ्यायला हवी. कोणत्याही पाश्चात्त्य आहार पद्धतीचे अंधानुकरण करताना त्याचा आपल्या शरीरावरील परिणामांची जाणीव ठेवून आहारात बदल करण्याबद्दल निर्णय व्हायला हवा.

राष्टीय पोषण महिना साजरा करताना – अन्नपदार्थांचा शरीरावर होणार परिणाम सुकर होईल याकडे लक्ष दिल्यास सुपोषित, साक्षर आणि सक्षम भारताचे ध्येय आपण नक्की गाठू शकू.