नवी दिल्ली : झोपेतील व्यत्ययाचा आपल्या दैनंदिन कामकाजावर नकारात्मक परिणाम होतो. अपुरी झोप आणि मन:स्थिती याबाबत ५० वर्षांपासून करण्यात आलेल्या संशोधनाच्या विश्लेषणानंतर हे स्पष्ट झाले आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार एक- दोन रात्री झोपमोड होणे, रात्री उशिरापर्यंत जागे राहणे किंवा अपुऱ्या झोपेमुळे आनंद, उत्साह आणि संतुष्टीची भावना क्षीण करू शकते. अमेरिकेतील ह्युस्टन विद्यापीठासह अनेक संस्थांच्या संशोधनानुसार झोपेतील व्यत्ययामुळे संशोधनातील स्वयंसेवकांमध्ये चिंतेची लक्षणे वाढली होती. त्याच्या हृदयाचे ठोके वाढले. तसेच अस्वस्थताही वाढली.

हेही वाचा >>> Health Special : सर्वोत्तम देहबल कधी असते?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१५४ संशोधनांमधील ५ हजार ७१५ स्वयंसेवकांच्या आकडय़ांच्या विश्लेषणानंतर हा अनुमान काढण्यात आला आहे. अमेरिकेतील मोंटाना स्टेट युनिव्हर्सिटीच्या साहाय्यक प्राध्यापिका आणि ‘सायकॉलॉजिकल बुलेटीन जर्नल’मध्ये प्रकाशित संशोधनाच्या सहलेखिका कारा पामर यांनी सांगितले की, अधिक दिवस झोपेपासून वंचित असलेल्या लोकांच्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आरोग्यासाठी हे संशोधन अतिशय महत्त्वपूर्ण आहे. दरम्यान, ३० टक्क्यांपेक्षा अधिक प्रौढ व्यक्ती आणि ९० टक्क्यांपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांची पुरेशी झोप होत नाही, असे अनुमान याआधीच्या संशोधनांच्या आधारे तज्ज्ञांनी काढला आहे.