scorecardresearch

सॉफ्ट ड्रिंक्स, रेडीमेड ज्युस यांमुळे वाढू शकते Blood Sugar; डायबिटीज रुग्णांनी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

कोणत्या पदार्थांमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते जाणून घ्या

सॉफ्ट ड्रिंक्स, रेडीमेड ज्युस यांमुळे वाढू शकते Blood Sugar; डायबिटीज रुग्णांनी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
डायबिटीज टिप्स (Photo: Freepik)

ख्रिसमस सण साजरा केल्यानंतर आता सर्वजण ३१ डिसेंबरच्या पार्टीची तयारी करत आहेत. सरत्या वर्षाला निरोप देत, नव्या वर्षाचे जंगी स्वागत केले जाते. यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ, सॉफ्ट ड्रिंक्स, रेडीमेड ज्युस यांचे पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींनी अशावेळीआरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. कारण काही पदार्थ किंवा पेयांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते आणि गंभीर समस्या उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी डायबिटीज रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी जाणून घ्या.

डायबिटीज असणाऱ्या रुग्णांनी पुढील गोष्टींची काळजी घ्या

सॉफ्ट ड्रिंक्स, रेडीमेड ज्युस पिणे टाळा
पार्टीच्या वेळी सॉफ्ट ड्रिंक्स, रेडीमेड ज्युस यांचे सेवन जास्त केले जाते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते, त्यामुळे अशा पेयांचे सेवन टाळा.

जेवण टाळू नका
अनेकदा पार्टीमधील कार्यक्रमांमुळे किंवा इतर कार्यक्रमांमुळे जेवणाची वेळ निघून जाते आणि मग भूक नसल्याने अनेकजण जेवण टाळतात. पण यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण बिघडू शकते. त्यामुळे डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींनी जेवण टाळू नये.

आरोग्यासाठी फायदेशीर असणारे फॅट्सचा समावेश
आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या फॅट्सचा समावेश करावा. यामुळे सणांच्या काळात खाल्ल्या जाणाऱ्या इतर खाद्यपदार्थांचे संतुलन करण्यास मदत मिळते. यामध्ये बदाम, अक्रोड, एवोकॅडो यांचे तेल, ऑलिव्ह ऑइल याचाही समावेश होतो.

बटाट्याच्या जागी रताळे खा
पार्टीमध्ये बटाट्याचे बरेच पदार्थ असतात, पण ते खाल्ल्याने त्रास होऊ शकतो. यासाठी रताळे उत्तम पर्याय आहे. रताळ्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-12-2022 at 20:59 IST

संबंधित बातम्या