नवी दिल्ली : नकारात्मक विचार दाबणे योग्य आहे का? असा प्रश्न मानसोपचारतज्ज्ञांना वारंवार विचारण्यात येतो. नव्या संशोधनाने याबाबत उत्तर शोधले आहे. यानुसार नकारात्मक विचार दाबल्याने त्याचा मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो, असे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा >>> Health Special: हृदयविकाराचे प्रकार

एखादी व्यक्ती कोणताही विचार दाबून टाकते, त्यावेळी त्यांच्या मनामध्ये ते विचार पुन्हा अधिक वेगाने येतात, असे सांगण्यात येते. मात्र, केंब्रिज विद्यापीठाच्या मायकल अ‍ॅडरसन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या संशोधनानुसार नकारात्मक विचार दाबल्याने त्याचा चांगला परिणाम मानसिक स्थितीवर होतो. यासाठी मेंदूला प्रशिक्षणाची आवश्यकता असते.

हेही वाचा >>> भारतीयांकडून मिठाचे अतिसेवन : आहारातून मीठ कमी करण्यासाठी डॉक्टरांनी सुचवलेले ‘हे’ उपाय करा फॉलो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संशोधनासाठी १६ देशांतील १२० नागरिकांच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करण्यात आला. यावेळी ज्या नागरिकांनी मनातील नकारात्मक विचार दाबले त्यांच्या मनातून भीती कमी झाली. तसेच त्यांचे मानसिक आरोग्यही सुधारले. अंडरसन यांनी सांगितले की, नकारात्मक विचार रोखण्यासाठी मेंदूला प्रशिक्षणाची आवश्यकता असते. तणाव, नैराश्य आणि अन्य मानसिक आजारांच्या रुग्णांवरील उपचारांसाठी ही बाब महत्त्वाची ठरू शकते.