डॉ. वैशाली वलवणकर

पंचेंद्रियांपैकी महत्त्वाचे इंद्रिय म्हणजे डोळे. अतिशय संवेदनशील अवयव असून त्याला प्रकाशाची जाणीव होते. डोळे नसले तर आपण काहीच पाहू शकणार नाही. कशाचाच अनुभव सुद्धा घेऊ शकत नाही. डोळे हे खूप नाजूक असतात. त्यांची काळजी घेणे आवश्यक असते.

आपण दररोज डोळय़ांची काळजी घेण्याच्या सवयींचा सराव केल्यास डोळय़ाच्या अडचणी सहज टाळता येतात. आपल्या डोळय़ाचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आणि दृष्टी दृढ ठेवण्यासाठी, आपल्या रोजच्या नित्यकर्माचा भाग असावा त्यासाठी डोळय़ांची निगा व काळजी घेतली पाहिजे.

शरीरातील सर्वात जास्त संवेदनशील त्वचा ही डोळय़ांभोवतीची असते. त्यामुळे त्याची काळजी योग्य प्रकारे घेणे आवश्यक आहे. धूर, धूळ, प्रदूषण, मोबाइलचा सतत वापर यामुळे डोळय़ांना अ‍ॅलर्जीचा त्रास होतो. त्याचप्रमाणे डोळय़ांभोवती काळी वर्तुळे दिसू लागतात.

हेही वाचा >>> Mental Health Special: मुलांना सांगा या १० महत्वाच्या टिप्स!

डोळय़ांची काळजी घेताना खालील गोष्टी करू नयेत

१ चेहेरा धुण्यासाठी अति गरम पाणी वापरू नये.

२ डोळय़ांना सतत आयलायनर, मस्कारा वापरू नये.

३ जवळून सतत मोबाइल वापरू नये.

४ अंधारात टीव्ही किंवा मोबाइल पाहू नये.

काय करावे?

’ बाहेर उन्हात जाताना डोळय़ांवर गडद रंगाचा चष्मा किंवा गॉगल वापरावा.

’ डोळे थंड पाण्याने धुवावेत (दिवसातून ३- ४ वेळा)

’ रात्री झोपताना नियमाने डोळय़ांना केलेला मेकअप काढावा आणि मॉईश्चरायझर लावावे.

’ रात्री झोपताना नरिशिंग व रिपेअर करणाऱ्या क्रीमचा वापर करावा.

’ योग्य अंतरावरून टीव्ही पहावा.

’ डोळय़ांचे व्यायाम करावेत.

’ काकडीचे काप, कोरफड गराचे आयपॅड थंडाव्यासाठी डोळय़ांवर ठेवावेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

’ लोहाच्या कमतरतेमुळे डोळय़ांखाली काळी वर्तुळे येतात, त्यासाठी डॉक्टरांचा सल्ल घेऊन औषधोपचार करावेत.v.valvankar@gmail.com