What is a nuchal cord or loop : अ‍ॅम्बिकल कॉर्ड म्हणजे नाळ जी आई आणि बाळाला गर्भाशयात एकत्र जोडते. आईकडून बाळापर्यंत अन्न आणि ऑक्सिजन, पोषक तत्त्वे, विटॅमिन, फॅट्स वाहून नेण्याचे काम नाळ करत असते. नाळेमुळेच बाळाचा गर्भाशयात विकास होणे शक्य होते. मात्र अनेकदा बाळाची सतत होणारी हालचाल आणि नाळ लांब असेल तरी ती बाळाच्या गळ्याभोवती अडकते किंवा गुंडाळली जाते. ज्याला न्यूकल कॉर्ड असे म्हणतात. अशा परिस्थितीत बाळाचा जन्म होताना गुंतागुंत होऊ शकते. 

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनमधील अभ्यासानुसार, गर्भधारणेदरम्यान न्यूकल कॉर्ड्सची समस्या २४ ते २६ आठवड्यांपर्यंत अंदाजे १२ टक्के असते. पण पूर्ण मुदतीपर्यंत ३७ टक्के घटनांची नोंद होते.

न्यूकल कॉर्डची कारणे

बाळाची गर्भाशयात जास्त हालचाल हे न्यूकल कॉर्डचे मुख्य कारण आहे, असे प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. जागृती वार्ष्णेय यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, बाळ गर्भाशयात फिरत असते. अशा वेळी गर्भाशयात कमी प्रमाणात अॅम्नीओटिक द्रव असल्यास किंवा नाळेचा आकार मोठा असल्यास ती बाळाच्या मानेभोवती गुंडाळली जाण्याची किंवा अडकण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत गर्भातील धमन्या आणि शिरा संकुचित होऊ शकतात, ज्यामुळे रक्ताभिसरणात व्यत्यय येऊ शकतो.

गर्भधारणेदरम्यान नाभीसंबंधीचा दोर अडकल्याने योनीतून प्रसूती होताना समस्या येतात. यामुळे अनेकदा सिझेरियन करावे लागते.

आईच्या झोपण्याच्या स्थितीचा नाळेवर परिमाण होतो का?

गर्भवती महिलांनी डाव्या कुशीवर झोपणे नेहमीच चांगले असते. यावर तज्ज्ञांनी असे म्हटले आहे की, गर्भवती स्त्री जेव्हा डाव्या कुशीवर झोपते तेव्हा गर्भाला रक्तपुरवठा व्यवस्थित होतो. तसेच गर्भवती महिलेने अंथरुणावरून उठतानाही नेहमी प्रथम डावीकडे वळून मग नंतर अलगद उठले पाहिजे, या महिलांनी पटकन कोणतीही हालचाल करू नये. कोणत्याही स्थितीत झोपल्याने नाळ बाळाच्या गळ्याभोवती गुंडाळली जाते असे नाही. बाळाच्या हालचालीवर नाळ बाळाच्या गळ्याभोवती अडकण्याची किंवा गुंडळली जाण्याची स्थिती उद्भवते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या या समस्येवर कोणताही प्रतिबंधात्मक उपचार नाही, किंवा उपचारांचा कोणता मार्ग नाही. यामुळे जोपर्यंत बाळाच्या हृदयाचे ठोके व्यवस्थित आहेत आणि श्वास घेण्यास त्रास होत नाही तोपर्यंत कोणतीही शारीरिक लक्षणे दिसत नाहीत. न्यूकल कॉर्ड ही समस्या केवळ अल्ट्रासाऊंड स्कॅनदरम्यानच समजू शकते.