“फार ताण होता विजयच्या डोक्यावर! त्यामुळे बायपास सर्जरी करण्याची वेळ आली त्याच्यावर!” विजयचा मित्र सांगत होता. “अहो, कुटुंबाची जबाबदारी कायमच विजयवर! आईचे आजारपण, भावंडांचे आर्थिक संकट, कोणा भाच्याची मेडिकलची अॅडमिशन, बहिणीच्या संसारातील अडचणी अशा अनेक गोष्टी. विजय नेहमीच सगळ्यांसाठी धावून जातो. शिवाय बिझिनेसचा ताण वेगळाच. कोविडमध्ये झालेले आर्थिक नुकसान आत्ता कुठे भरून यायला लागले होते आणि आता हा आजारी पडला! इतका स्ट्रेस सहन नाही झाला त्याला. ब्लड प्रेशर आणि डायबिटीस आहेतच साथीला गेली १० वर्षे.”
विजयचे म्हणणे खरेच होते. सततच्या मानसिक ताणाचा विजयच्या हृदयाच्या कार्यावर परिणाम झाला असण्याची शक्यता खूप. मानसिक ताणतणाव, स्वभाव, अतिथकवा आणि उदासीनता हे मानसिक घटक हृदयाच्या कार्यावर विपरीत परिणाम करतात.

हृदयरोगामध्ये हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात, हृदयाचा रक्तप्रवाह कमी होतो. रक्तवाहिनीतील अडथळा म्हणजे चरबी, रक्त पेशी अशा प्रकारच्या पदार्थांचा एक थर तयार होतो, ज्याने रक्त वाहिनी अरुंद बनते. एखादे वेळेस या अडथळ्यातील एखादा तुकडा सटकतो, रक्तवाहिनीत अडकतो आणि रक्तवाहिनीतील प्रवाह पूर्ण बंद होतो. तेव्हा हृदयाला होणारा रक्तप्रवाहदेखिल काही काळ कमी होतो, ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही, हृदयाच्या स्नायूतील काही पेशी मरण पावतात आणि हृदयाची आकुंचन शक्ती कमी होते. अचानक असे घडले तर जोरात छातीत दुखते आणि हार्ट अटॅक येतो.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

मानसिक स्थितीचा हृदयाच्या कार्याशी कसा काय संबंध असू शकतो? हृदयरोगाचे धोके असणाऱ्यांमध्ये पुरुष असणे, स्थूलपणा, ब्लड प्रेशर, मधुमेह, धूम्रपान, चरबीचे जास्त प्रमाण (hyperlipidemia) हे प्रमुखपणे दिसून येतात. त्याबरोबरच आता अधिकाधिक संशोधन मानसिक घटकांचा हृदय रोगाशी असलेला संबंध दाखवून देते.

आणखी वाचा: Health Special: सगळं संपवून टाकावं वाटतं तेव्हा काय विचार …
उदासपणामुळे तर हृदयरोगाची शक्यता जवळजवळ दुपटीने वाढते. केवळ हृदयरोगाच्या लक्षणांपेक्षा जर जोडीला डिप्रेशन असेल जगण्याची गुणवत्ता खूप कमी होते. बायपास सर्जरीच्या आधीपासून असलेले डिप्रेशन पुढचे सहा महिने सुरू राहिले किंवा बायपास सर्जरीनंतर डिप्रेशन काही काळ कायम राहिले तर हृदयरोगानंतर ५-१० वर्षांनंतर मृत्यूदर वाढतो. असेच डिप्रेशनमुळे पुन्हा पुन्हा हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता वाढते. डिप्रेशनचा अंतर्ग्रंथी आणि त्यांच्या कार्यावर परिणाम होतो, कॉर॒टिसॉलचे (cortisol) शरीरातील प्रमाण सतत वाढलेले राहते. त्याचा हृदयाच्या आतील स्तरातील पेशींवर वाईट परिणाम होतो आणि रक्तवाहिनीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता वाढते. डिप्रेशनमध्ये रक्तातील प्लेटलेट या पेशी एकत्र होऊन गुठळी होण्याची शक्यता वाढते, तसेच sympathetic nervous systemच्या उत्तेजनामुळे हृदयाची गती अनियमितपणे (arrhytmias) वाढू शकते आणि हृदयरोगाची शक्यता वाढते. उदासपणामुळे काही जणांमध्ये धूम्रपान वाढते आणि अर्थात ते हृदय रोगाला कारणीभूत ठरते.

आपण अनेक माणसे सतत स्पर्धा करताना पाहतो. प्रत्येक गोष्टीत अगदी जीव तोडून स्पर्धा करण्याचा हा स्वभाव असतो. अशी माणसे फार रागीट असतात, सतत घाईत असतात, आक्रमक असतात आणि मनात सहजपणे शत्रुत्त्वाची भावना (hostility) बाळगतात. या स्वभावाला Type A personality म्हणतात. अशा लोकांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण वाढलेले दिसते. हृदयाचे कार्य, त्याची गती नियंत्रित करणारी नस vagus nerve हिच्या कार्यावर अशा स्वभावाचा परिणाम होतो, रक्तातील ऍड॒रीनॅलीन (adrenaline) सारख्या रसायनांचे प्रमाण वाढते आणि अचानक येणाऱ्या ताणाबरोबर चरबीचे प्रमाण वाढते. नकळतपणे होणारे हे शारीरिक बदल हृदयरोगाला कारणीभूत ठरतात. या उलट एखादी व्यक्ती जर नमते घेणारी, नम्र अशी असेल तर हृदयरोगाची शक्यता कमी होते! हृदयरोग झाल्यानंतर जे मानसिक उपचार केले जातात त्यात यामुळेच राग नियंत्रणात आणण्यावर भर दिला जातो.

आणखी वाचा: मनोमनी : गुणगुणणारे मन

मनात आलेले नैराश्य, कामातील रस नाहीसा होणे, अतिथकवा, burnout या गोष्टीसुद्धा हृदयाच्या कार्यावर परिणाम करतात. अचानक आलेला ताण म्हणजे अचानक मनात निर्माण झालेली भीती, राग, उत्साह, यामुळे हृदयाचा रक्तप्रवाह अचानक कमी होतो. सततचा ताणही हृदयाच्या कार्यावर परिणाम करतो. मानसिक स्थिती आणि हृदयरोग यांचा असा जवळचा संबंध आहे.

मानसिक विकार असलेल्यांमध्येसुद्धा हृदयरोगाचे जास्त प्रमाण आढळून येते. तीव्र मानसिक विकार जसे स्किझोफ्रेनिया, मेनिया (bipolar disorder) असलेल्यांमध्ये हृदय रोगाने मृत्यू येण्याचे प्रमाण आधी आहे. या रुग्णांमधले चरबीचे प्रमाण, स्कीझोफ्रेनियामुळे क्रियाशील नसणे, स्थूलपणा, धूम्रपानाचे जास्त प्रमाण अशा सगळ्या गोष्टींचा हृदयावर परिणाम होतो. या रोगांसाठी वापरलेली जाणारी काही औषधेसुद्धा डायबिटीस, चरबी वाढणे, स्थूलपणा याला जबाबदार ठरतात.
या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे असलेले डिप्रेशन दुर्लक्षित न करणे. उदासपणावर मात करण्यासाठी योग्य आणि वेळेवर उपाय योजणे महत्त्वाचे. हृदयरोग प्रतिबंधामध्ये जीवनशैली सुधारण्यावर भर दिला जातो. व्यायाम, आहार नियंत्रण, व्यसनांपासून मुक्ती या सगळ्याबरोबरच मनःस्वास्थ्य टिकवण्यासाठीचे विविध उपाय करणे फार महत्त्वाचे. आपल्यावरील ताण ओळखता येणे आणि त्याचे नियोजन करायला शिकणे महत्त्वाचे. रागावर नियंत्रण करायला शिकणे आवश्यक. मित्र, नातेवाईक यांच्याशी दृढ नातेसंबंध, आवश्यकतेनुसार सल्लामसलत करणे, मिळूनमिसळून राहणे, छंद जोपासणे, निसर्गाशी नाते जोडणे, समाजाशी नाते जोडणे या सगळ्याचा चांगला उपयोग होतो. योग, प्राणायाम, ध्यानधारणा यांचा मनःशान्तीसाठी नक्कीच उपयोग होतो. आपल्यातली अध्यात्मिकता ताणतणावाला, संकटांना सामोरे जाण्याचे, आपल्यातील स्वभावदोष दूर करण्याचे बळ देते.
मन आणि हृदय एकमेकांशी सुसंवाद साधतील ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी. ती ओळखूया हृदयरोग टाळूया!

Story img Loader