Yoga for weight loss : सध्याच्या काळात बहुतेक लोकांचं काम हे डेस्कवर बसून असतं. मग, ऑफिसमध्ये सतत एकाच जागी बसून लोक काम करताना दिसतात. त्यात आजकालचे लोक फास्टफूड मोठ्या प्रमाणात खाताना दिसतात; तर एकाच जागी बसून काम करणं, फास्टफूड मोठ्या प्रमाणात खाणं अशा अनेक गोष्टींमुळे लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो. लोकांच्या शरीरातील चरबी वाढते, पोट सुटायला लागतं. त्यामुळे लठ्ठपणाचा सामना लोकांना करावा लागतो. लोकं वजन कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करत असतात. मग जिमला जाणं, डाएट करणं अशा अनेक गोष्टी करत असतात. पण, त्यांना दररोजच्या कामामुळे या गोष्टी करायला वेळ मिळत नाही. मात्र, फिट राहण्यासाठी तुम्ही घरच्या घरी काही योगासने करू शकता. योग शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. चालण्याच्या व्यायामापेक्षा योगामुळे जास्त कॅलरी बर्न करण्यास मदत होते. अशी काही योगासने आहेत, जी स्नायूंना ताणण्यासदेखील मदत करतात. त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर योगा खूप उपयुक्त ठरू शकतो. जाणून घ्या त्या योगासनांबद्दल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

योगतज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

व्यायामाच्या तुलनेत योगामुळे कॅलरीज लवकर बर्न होतात का?

पिट्सबर्ग युनिव्हर्सिटी, ड्यूक युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर आणि युनिव्हर्सिटी ऑफ झुरिच येथील संशोधकांना निरिक्षणात असं आढळून आलं आहे की, दररोज योग्य प्रमाणात योगा केल्यानं व्यायामाच्या तुलनेत योगामुळे कॅलरीज लवकर बर्न होतात. आणखी एका अभ्यासात असे दिसून आले की, योगामुळे पोटाभोवती जमा झालेली कठीण चरबीही लवकर वितळण्यास मदत होते.

कोणते योगा आसन करावे?

सूर्यनमस्कार :

सूर्यनमस्कार तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे. सूर्य नमस्कार हा योगाचा सराव सुरू करण्याचा उत्तम मार्ग आहे. १२ आसनांची ही एकात्मिक मालिका आसन पद्धत आहे. रोज सकाळी सूर्यनमस्कारासोबतच १३ मंत्रांचा उच्चार केल्याने आजार तुमच्या जवळसुद्धा भटकणार नाही आणि सूर्यनमस्कार केल्याने वजनपण कमी होते. दररोज पाच ते दहा वेळा सूर्यनमस्कार केल्यास तुमची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होईल. जर तुम्ही सूर्यनमस्काराच्या सगळ्या स्टेप करू शकत नसाल, तर ताडासन करू शकता.

फलकसन :

शरीरातील कॅलरी बर्न करण्यासाठी सर्वात प्रभावी योगासनांपैकी एक म्हणजे प्लँक पोझ किंवा फलकसन.

हा योगा कसा करायचा?

हा योगा करण्यासाठी पोटावर जमिनीवर झोपावे आणि नंतर कोपरा ते तळहातापर्यंतचा भाग जमिनीवर घेऊन शरीर उचलावे. हे मुख्य शक्ती तयार करते, संतुलन सुधारते आणि कॅलरी बर्न करते.

उत्कटासन :

पायाच्या स्नायूंच्या मजबुतीसाठी हे आसन उपयुक्त आहे. या आसनाला कुर्सी आसन असेही म्हणतात.

हा योगा कसा करायचा?

 • पायात थोडे अंतर ठेवून ताठ उभे राहा.
 • हात खांद्यांच्या सरळ रेषेत शरीराच्या पुढील बाजूस घ्या. तळहात जमिनीच्या दिशेला असतील. हात कोपरात वाकवू नका.
 • आता गुडघे पायात वाकवून कंबर आणि पोटाचा भाग थोडा खाली आणा. आपण खुर्चीत बसत आहोत, अशी कल्पना करून त्या स्थितीत कंबर व पोट खाली घ्या.
 • मात्र, हात जमिनीला समांतर असावे. पाठ न वाकवता ताठ ठेवावी.
 • श्वसन चालू ठेवावे. कंबर अधिकाधिक खाली घेण्याचा प्रयत्न करा. आता वर येऊन श्वास सोडावा.

अंजनेयासन :

वजन कमी करण्यासाठी या आसनाचा खास वापर केला जातो. त्याचबरोबर पचनक्रिया सुधारते, शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते व शरीराचा ताण कमी होऊन लवचिकताही येते.

 • हे आसन करण्यासाठी जमिनीवर बसून एक पाय पुढे आणि दुसरा मागे ठेवावा.
 • आता आपले हात वरच्या दिशेने हलवा आणि त्यांना खेचा.
 • मानेची काळजी घेत डोक्याकडे पाठ करून बघा.
 • आता एक मिनिट मुद्रेत राहून दीर्घ श्वास घ्या.

हेही वाचा >> किडनी खराब करु शकते केसांची केराटिन ट्रिटमेंट? डॉक्टरांनी सांगितला धोका, कशी घ्याल काळजी

काकासन :

काकासन म्हणजेच ‘क्रो वॉक पोज’ हे आहे. हे आसन आपल्या आरोग्यासाठी फक्त एकाच नाही तर अनेकरित्या फायदेशीर आहे. हे आसन केल्याने केवळ पोटावरील चरबीच कमी होत नाही तर यामुळे शरीर चपळही बनते.

 • हे करण्यासाठी सर्वप्रथम गुडघे वाकवून मलासानामध्ये बसा. या दरम्यान आपल्या बोटांचा जमिनीला आणि टाचांचा हिप्सला स्पर्श झाला पाहिजे आता हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवा.
 • पुढे, उजवा गुडघा दुमडून जमिनीवर आडवा ठेवा व डावा पाय सरळ ठेवा, म्हणजेच उजव्या गुडघ्यावर बसा.
 • मग डावा पाय उचलून पुढे घेऊन जा आणि काही वेळ याच पोझमध्ये विश्रांती घ्या.
मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which yoga asanas can help you burn calories faster yoga for weight loss srk
First published on: 07-04-2024 at 12:21 IST