Weight Loss help in treating psoriasis : सोरायसिस हा एक त्वचाविकार आहे आणि त्यात त्वचेवर लाल-पांढरे चट्टे किंवा पुरळ येतात. कधी कधी खाज सुटते. डोके, नाभी, गुडघे, कोपर, तळवे, तळपाय शरीराच्या या भागांवर हा विकार दिसून येतो. हा एक सामान्य दीर्घकालीन आजार आहे. सोरायसिस कशामुळे होतो, या संदर्भात गुरुग्राम येथील पारस हेल्थच्या प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमख डॉ. मनदीप सिंह यांनी द इंडियन एक्स्प्रेसला याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
डॉ. सिंह सांगतात, “सोरायसिस नेमका कशामुळे होतो, हे अजूनही पूर्णपणे समजलेले नाही. पण, त्यामागे आनुवंशिक आजार, रोगप्रतिकारशक्ती, शारीरिक कार्यप्रणालीमध्ये अनियमितता आणि पर्यावरणीय समस्या जसे की संक्रमण, त्वचेला दुखापत, तणाव, धूम्रपान, काही औषधी आणि वातावरणात होणारा बदल इत्यादी कारणे असू शकतात.”
सोरायसिसची लक्षणे नियंत्रणात आणण्यासाठी काही उपचारपद्धती आहेत; तसेच निरोगी जीवनशैली या सोरायसिसचा सामना करण्यास मदत करू शकते.

२०१७ मध्ये डर्माटॉलॉजीच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, काही पुराव्यांवरून असे समोर आले आहे की, लठ्ठपणा हा सोरायसिससाठी धोकादायक घटक मानला जातो; जो सोरायसिसचे प्रमाण आणखी वाढवतो. जास्त वजन असलेल्या लोकांनी जर वजन कमी केले, तर सोरायसिसचे प्रमाण कमी होऊ शकते.

glacial lake outburst isro
इस्रोच्या अहवालातून हिमनदी तलावांबाबतचे धक्कादायक वास्तव उघड; भविष्यात तलावफुटीच्या घटना वाढणार?
how eating onions included food in summer helps to beat the heatwaves
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा कसा ठरतो फायदेशीर; जाणून घ्या उन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Efforts to encroach on flamingo habitat for construction projects in Navi Mumbai
नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवासाचा गळा घोटला जातोय का? सरकारी यंत्रणाच ऱ्हासास कारणीभूत?

वजन कमी केल्यामुळे सोरायसिस कसा कमी होऊ शकतो याविषयी त्वचारोगतज्ज्ञ श्रेया कपूर यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलेली आहे. त्या सांगतात, “जर तुमच्या कुटूंबातील सदस्याला सोरायसिस असेल, तर वजन कमी करून तुम्हाला फायदा मिळू शकतो. वजन वाढल्याने सोरायसिसचा त्रास वाढतो. जर तुम्ही पाच टक्के वजन कमी केले तरी तुम्हाला सोरायसिसमध्ये खाज सुटणे कमी होईल, नवीन प्लेक्स तयार होणार नाही आणि तुम्हाला जर सोरायसिस होण्याची शक्यता असेल, तर वजन कमी करून तुम्ही हा धोका टाळू शकता.”

हेही वाचा : Til Gul : हिवाळ्यात तिळगूळ का खावा? जाणून घ्या, तज्ज्ञांनी सांगितलेले तिळगुळाचे फायदे…

याविषयी डॉ. सिंहसुद्धा सांगतात, “वजन कमी केल्यामुळे सोरायसिसची लक्षणे कमी होतात आणि एकूण आरोग्यावर याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. वजन कमी करणे हा सोरायसिसवरील उपचार नाही; पण थोड्या प्रमाणात याचा त्रास कमी करण्यास ते फायदेशीर आहे.
ते पुढे सांगतात, “ज्या लोकांना सोरायसिस आहे आणि त्यांचे वजन जास्त आहे, त्यांना काही उपचारांवर लगेच आराम मिळत नाही. वजन कमी केल्यामुळे औषधी आणि इतर उपचारांचा प्रभावीपणे परिणाम दिसू शकतो; ज्यामुळे सोरायसिसच्या लक्षणांमध्ये सुधारणा होऊ शकते.

डॉ. कपूर यांनी, सोरायसिसची लक्षणे कमी करण्यासाठी गोड पदार्थ कमी खाण्याचा सल्ला दिला आहे. त्याशिवाय ओमेगा-३ ने परिपूर्ण असे चांगले फॅट्सयुक्त पदार्थ खावेत आणि कमीत कमी ३०-३५ मिनिटे चालावे, असेसुद्धा सांगितले आहे.
डॉ. सिंह सांगतात, “सोरायसिसवरील उपचारासाठी एक व्यापक दृष्टिकोन असणे अत्यंत गरजेचा आहे; ज्यामध्ये वजन कमी करणे, उपचार, निरोगी जीवनशैली इत्यादी घटक महत्त्वाचे आहेत. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तुम्ही सोरायसिसची लक्षणे कमी करू शकता.”