दिवसेंदिवस भारतातील स्त्री आणि पुरुषांमध्ये व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असण्याचे प्रमाण वाढते आहे. एखादा साथीचा रोग वेगात पसरावा अशीच अवस्था व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेबाबत दिसून येते आहे. या संदर्भातील अनेक अहवाल सातत्याने प्रकाशित होत असून त्यातून ही बाब उघडकीस आली आहे. .मुख्यत: चुकीची जीवनशैली, चुकीची आहारपद्धती, योग्य प्रकारे पोषक तत्वांचे शोषण न करू शकणारी आरोग्य स्थिती आणि आवश्यक जीवनसत्वांचा अभाव यामुळे ही स्थिती निर्माण होत आहे. "व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता कशामुळे उद्भवते आणि त्याचे तुमच्या शरीरावर कोणते परिणाम होऊ शकतात याबद्दल एकूणच समाजात कमी जागरूकता आहे. नवी दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील वरिष्ठ सल्लागार डॉ. सुरंजित चॅटर्जी यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले की, व्हिटॅमिन बी १२, ज्याला कोबालामीन (Cobalamin) म्हणूनही ओळखले जाते, ते लाल रक्तपेशींची निर्मिती, डीएनए संश्लेषण (DNA synthesis) आणि चेतासंस्थेच्या कार्याशी संबंधित असंख्य कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्याच्या कमतरतेमुळे सौम्य थकवा आणि अशक्तपणापासून ते चेतासंस्थांशी संबंधित गंभीर विकार, ॲनिमिया यांसारखी लक्षणे आणि आरोग्यविषयक गुंतागुंतीची स्थिती निर्माण होऊ शकते. व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता कशामुळे निर्माण होते? आहार : वनस्पतीजन्य आहार (Plant Based) अधिक करणे आणि तसेच प्राण्यांपासून मिळणाऱ्या उत्पादनांचा वापर कमी केल्याने बी १२ चे आहाराती प्रमाणदेखील कमी होते. व्हिटॅमिन बी १२ प्रामुख्याने मांस, मासे, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ यांसारख्या प्राण्यांपासून तयार झालेल्या पदार्थांमध्ये आढळते. पुरेशा पूरक आहाराशिवाय (supplementation) व्हेगन (वनस्पती आधारित दुग्धजन्य पदार्थांशिवाय) किंवा केवळ शाकाहारी आहार ( वनस्पती आधारित दुधजन्य पदार्थांसह) अधिक केल्यास पुरेशा प्रमाणात बी १२ चा पुरवठा शरीराला होत नाही, ज्यामुळे त्याच्या कमतरतेचा धोका वाढतो. हेही वाचा - व्हेगन आहारामुळे खराब कोलेस्ट्रॉल झटपट कमी होऊ शकते का? नव्या अभ्यासाबाबत तज्ज्ञ काय सांगतात… लोकांचे वाढते वय : व्यक्तीचे वय जसजसे वाढते, तसतसे अन्नातून बी १२ शोषण्याची क्षमता कमी होते. प्रौढांच्या बाबतीत अनेकदा पोटातील ॲसिडचे उत्पादन कमी होते. खालेल्या अन्नातून बी १२ विलग करण्यासाठी ते आवश्यक असते. परिणामी व्हिटॅमिनचे कमी प्रमाणात शोषण होते आणि प्रौढांमध्ये बी १२ ची कमतरता निर्माण होते. गॅस्ट्रोइंटेस्टीनल डिसऑर्डर (Gastrointestinal Disorders) : काही गॅस्ट्रोइंटेस्टीइनल आरोग्य समस्या (gastrointestinal conditions), जसे की क्रोहन डीसिज (Crohn’s disease), सेलिआक डीसिज (Celiac disease) आणि एट्रोफिक गॅस्ट्ररिटिस (atrophic gastritis) यांसारखे आजार होऊ शकतात, तसेच शरीराची बी १२ शोषण्याच्या क्षमतेमध्ये बिघाड होऊ शकतो. हे विकार पचनसंस्थेवर परिणाम करतात, बी १२ सह पोषक तत्वांचे शोषण रोखतात, ज्यामुळे पुरेसा आहार घेत असलेल्या व्यक्तींमध्येदेखील बी १२ ची कमतरता निर्माण होते. औषधे : सामान्यतः मधुमेहासाठी दिल्या जाणाऱ्या ॲसिड रिफ्लक्सवर (acid reflux) आणि मेटफॉर्मिनसारख्या उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्या प्रोटॉन पंप इनहिबिटर (PPIs) सारख्या विशिष्ट औषधांचा दीर्घकाळ वापर करणे हे व्हिटॅमिन बी १२ च्या शोषणात अडथळा निर्माण करू शकते. PPI पोटातील ॲसिडचे उत्पादन कमी करते, जे अन्नातून बी१२ विलग करण्यासाठी आवश्यक असते, तर मेटफॉर्मिनमुळे आतड्यांतील बी १२ शोषणावर परिणाम होऊ शकतो. व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची लक्षणे कोणती आहेत?व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, सुन्नपणा वाटणे, हातापायाला मुंग्या येणे आणि गोष्टी लक्षात न राहणे, लक्ष केंद्रित न होणे यांसारख्या अडचणींचा (cognitive difficulties) सामना करावा लागतो. अशी लक्षणे (non-specific symptoms) साधारणत: वाढत्या वयाबरोबर पाावयास मिळतात. त्यामुळेच त्याकडे दुर्लक्ष होते आणि निदान पटकन न झाल्याने उपचारांनाही विलंब होतो. व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेचा सामना कसा करावा?व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे हळूहळू निर्माण होणाऱ्या विकारांचा सामना करण्यासाठीचे काही उपाय खाली दिले आहेत. आहारातील बदल : बी १२-समृद्ध आहार किंवा फोर्टिफाइड उत्पादनांचा (आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक घटक पुरवण्यासाठी दिला जाणारा आहार) समावेश असलेल्या संतुलित आहारास प्रोत्साहन दिल्यास बी १२ ची कमतरता टाळण्यास मदत होते. विशेषत: व्हेगन किंवा शाकाहारी आहार करणाऱ्या व्यक्तीसाठी हे फायदेशीर ठरू शकते. लोकांना अन्नातून मिळणाऱ्या पोषक तत्त्वांबाबत शिक्षित करणे आणि पुरेशा प्रमाणात बी १२ च्या करण्याचे महत्त्व पटवून देणे महत्वाचे आहे. हेही वाचा - दूध आणि मासे एकत्र खाऊ नये, मध खाल्यानंतर गरम पाणी पिऊ नये; विरुद्ध आहार म्हणजे काय? आयुर्वेद काय सांगते..जाणून घ्या पूरक आहार : बी १२ कमतरतेचा धोका असलेल्या व्यक्तींसाठी, ज्यामध्ये वयस्कर, प्रौढ काटेकोरपणे शाकाहारी/ व्हेगन आहार घेतात आणि मालाबसोर्प्शन (malabsorption) समस्या (अशी स्थिती ज्यामध्ये लहान आतडे काही पदार्थ शोषून घेऊन शकत नाही) अशा व्यक्तींसाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने पूरक आहार घेण्याची शिफारस केली जाते. नियमित तपासणी आणि चाचणी : वृद्ध व्यक्ती, गॅस्ट्रोइंटेस्टीइनल विकार असलेल्या व्यक्ती किंवा बी १२ शोषणावर परिणाम करणारी दीर्घकालीन औषधे घेणाऱ्या व्यक्तींना व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेचा धोका आहे का, हे जाणून घेण्यासाठी नियमित तपासणी करण्याचा विचार डॉक्टर अथवा आहारतज्ज्ञांनी केला पाहिजे. जेणेकरून वेळेवर चाचणी करून लवकर निदान झाल्यास आणि योग्य वेळी उपचार घेता येतील. सार्वजनिक आरोग्य मोहिमा : सार्वजनिक आरोग्य मोहिमांद्वारे बी १२ च्या कमतरतेची लक्षणे, धोका वाढवणारे घटक आणि परिणामांबद्दल जागरूकता वाढवणे, लवकर निदान करणाऱ्या आणि त्याच्या कमतरतेशी संबंधित गुंतागुंत टाळण्यासाठी आवश्यक उपाय वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यास मदत करू शकते. वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षण : डॉक्टर अथवा आहारतज्ज्ञांना बी १२ ची कमतरता ओळखणे आणि त्याचे नियंत्रण करणे यासाठी सतत शिक्षण आवश्यक आहे, जेणेकरून प्रभावित व्यक्तींना वेळेवर निदान आणि योग्य उपचार मिळावेत.