scorecardresearch

वयाच्या ६१ व्या वर्षी संजय दत्तने केली होती कॅन्सरवर मात; स्टेज ४ कॅन्सर असतानाही कसा केला पराभव जाणून घ्या

World Cancer Day: चौथ्या स्टेजचा कॅन्सर असतानाही अभिनेता संजय दत्त याने कॅन्सरचा पराभव केला. या गंभीर आजाराशी त्याने कसा लढा दिला जाणून घ्या..

how sanjay sutt defeated cancer
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम'

बॉलीवुडचा अभिनेता संजय दत्त हा कॅन्सर सारख्या गंभीर आजारातून बाहेर पडला, त्याने स्वतः ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली होती. २०२० साली जेव्हा अभिनेता संजय दत्त त्याच्या ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर शेवंती लिमये यांच्याकडे गेला तेव्हा त्याला स्टेज ४ फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले. त्याने यावेळी घाबरून न जाता या आजाराशी लढण्याचा निर्णय घेतला. जेव्हा तो पूर्णपणे या आजारातून बरा झाला तेव्हा त्याने सांगितले की, कॅन्सरशी लढा चालू असताना तो कोणतंही टेन्शन किंवा काळजी न करता पूर्णपणे शांत होता. त्याने डॉ लिमये यांना असंही सांगितले की, ‘मला कॅन्सर झाला नसल्याप्रमाणे मी पुढे जाणार आहे, मी फक्त माझे जीवन परत मिळवण्यावर लक्ष केंद्रित करेन आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या शिस्तीचे पालन करेन’. त्याने कॅन्सरशी लढा देताना नकारात्मकता कधीच जवळ येऊ दिली नाही. त्याच्या इच्छाशक्तीमुळे त्याने कॅन्सरचा सामना केला. कॅन्सरशी लढा देणं त्याच्यासाठी नवीन नव्हतं, याआधीही त्याने त्याची आई आणि पहिली पत्नीला कॅन्सरमुळे गमावलं होतं.

कुटुंब आणि मित्राचा पाठिंबा ही ठरली प्रभावी थेरिपी..

डॉ लिमये पुढे असंही म्हणाल्या “तो मानसिकरित्या स्ट्रॉंग होता, त्याने कधीही आपला आजार लपवला नाही आणि पहिल्या दिवसापासून त्याने कॅन्सरशी लढण्याचे आव्हान स्वीकारले. त्याने कधीही आपल्या मित्र आणि कुटुंबीयांसमोर स्वतः कमजोर दाखवून दिले नाही. ही दुसरी सर्वात प्रभावी थेरपी आहे, कुटुंबाचा आणि मित्रांचा पाठिंबा, जो तुम्हाला कोणत्याही कॅन्सर थेरपीच्या संकटातून बाहेर काढू शकतो,”. तिसरी महत्वाची थेरेपी म्हणजे डॉ. लिमये स्वतः होत्या. ज्यांनी त्याच्या आजारावर योग्य उपचार केले आणि त्या स्थितीला अनुकूल असा प्रोटोकॉल तयार केला, याला प्रिसिजन ऑन्कोलॉजी म्हणतात.

केमो डेजमध्ये संजय दत्त याने कधीही वर्कआऊट चुकवला नाही

प्रिसिजन ऑन्कोलॉजीचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ते रुग्णाला लवकर बरं होण्यास मदत करते. संजय दत्त याने फक्त आपले शरीराला मजबूत करणे यावर लक्ष केंद्रित केले. “अनेकदा डॉक्टर रुग्णांना प्रेरणा देत असल्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल. पण दत्तच्या बाबतीत बोलयाला गेलं तर त्याचा व्यायाम करण्याचा आणि पथ्य पाळण्याची शिस्त बघून मी थक्क झाले. हे कोणालाच माहीत नसेल, पण त्यांने उपचारा दरम्यान वर्कआऊट देखील केला. मी त्याला सांगितले की त्याला मळमळ आणि अशक्तपणा वाटू शकतो. पण केमोथेरपीच्या दिवसांतही त्याने वर्कआउट्स सोडले नाही. मी त्याला केमोथेरपीच्या दिवशी ट्रेडमिलवर जाताना पाहिले आहे. तो दररोज न चुकता एक तास व्यायाम करायचा. आमच्या टीमने थेरपीदरम्यानच त्याच्यासोबत काम केले आणि त्याची मानसिक ताकदही वाढवली,” असं डॉ लिमये म्हणाल्या.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 16:05 IST