Heart attack 7 early sign and symptoms: हृदयविकार झाल्यास हृदयाचे स्नायू शरीराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात रक्त पंप करू शकत नाहीत. याचा अर्थ असा नाही की, हृदय काम करणे थांबवते; परंतु रक्त प्रवाहित करण्याची किंवा रक्ताभिसरण घडवून आणण्याची हृदयाची क्षमता कमकुवत होते. हृदय हे एका पंपासारखे आहे, जे शरीराच्या प्रत्येक भागाला ऑक्सिजन आणि पोषक घटकांनी समृद्ध रक्त पुरवते. पण जेव्हा हा पंप कमकुवत किंवा मंदावतो. तेव्हा शरीराच्या अवयवांना आवश्यक त्या प्रमाणात रक्त मिळत नाही, ज्यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.
डाव्या बाजूचा हृदयविकार हा सर्वांत सामान्य प्रकार आहे, ज्यामध्ये फुप्फुसांमध्ये द्रव भरतो, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.
दुसरे म्हणजे उजव्या बाजूचा हृदयरोग ज्यामध्ये पाय, घोटे, पोट अशा शरीराच्या खालच्या भागात सूज येऊ शकते. यकृत आणि पोटातही द्रव जमा होऊ शकतो.
कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये शरीराच्या विविध भागांमध्ये द्रव जमा होऊ लागतो. ही बाब हृदयाच्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही बाजू निकामी होण्याशी संबंधित असते.
हृदयविकाराची सामान्य लक्षणे :
हृदयविकाराची लक्षणे कधी कधी सामान्य वाटतात; परंतु जर ती वेळीच ओळखली गेली नाहीत, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. हृदयविकाराचा झटका येण्याआधी शरीरात कोणती लक्षणे दिसतात ते जाणून घेऊया.
श्वास घेण्यास त्रास होणे हे हृदयविकाराचे एक सामान्य लक्षण आहे. या स्थितीत चालताना किंवा झोपताना श्वास घेण्यास त्रास होतो. कधी कधी झोपेत असतानाही श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
थकवा आणि अशक्तपणा हीखील हृदयविकाराची लक्षणे असू शकतात. या स्थितीत एखाद्या व्यक्तीला खूप थकवा जाणवतो किंवा सौम्य हालचाली करूनही शरीरात ऊर्जेची कमतरता जाणवते.
पाय, घोटे व पोटात सूज येणे ही हृदयविकाराची लक्षणे असू शकतात. ही सूज शरीरात द्रव जमा झाल्यामुळे होते.
सततचा खोकला किंवा कफ येणे हे हृदयविकाराचे लक्षण असू शकते. खोकल्यावर पांढरा किंवा गुलाबी कफ येणे हे फुप्फुसांमध्ये द्रव जमा होण्याचे लक्षण असू शकते.
जलद किंवा अनियमित हृदयाचे ठोके हेदेखील हृदयविकाराचे लक्षण असू शकते.
व्यायाम करण्याची किंवा जास्त काम करण्याची ताकद कमी होणे.
फुप्फुसांमध्ये द्रव साचल्यामुळे श्वास घेताना घरघर होणे हेदेखील हृदयविकाराचे लक्षण असू शकते.
भूक न लागणे किंवा मळमळ होणे, अचानक वजन वाढणे.
रात्री वारंवार लघवी होणे, छातीत दुखणे ही हृदयविकाराची लक्षणे आहेत.
लक्ष केंद्रित करण्यात अडचण किंवा गोंधळ
हृदयविकाराची कारणे
६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो.
उच्च रक्तदाब हे हृदयविकाराचे एक प्रमुख कारण असू शकते.
मधुमेह हृदयाच्या स्नायूंवर परिणाम करतो.
धूम्रपान आणि तंबाखू सेवन हृदयाला हानी पोहोचवू शकते.
जास्त स्थूलपणामुळे हृदयावर अतिरिक्त दबाव येतो.
कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असल्यासही या आजाराचा धोका वाढू शकतो.
हृदयविकार कसा टाळायचा?
जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल करा.
नियमित व्यायाम करा.
मिठाचे सेवन कमी करा.
ताणतणावाचे व्यवस्थापन करा
वेळोवेळी डॉक्टरांकडून स्वतःची तपासणी करून घ्या.