Heart Attack While Sleeping: रात्री झोपेत असताना तुमचं हृदय जास्त धोक्यात असतं, हे ऐकून थक्क व्हाल. अनेकांना वाटतं की, झोपेत शरीर आणि हृदय दोन्ही विश्रांती घेतात; पण खरं तर या काळातच हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका दुप्पट वाढतो. शरीरात अचानक वाढणारे स्ट्रेस हार्मोन्स, झपाट्याने उसळणारा रक्तदाब आणि आकसणाऱ्या रक्तवाहिन्या यांमुळे मध्यरात्रीनंतर हृदयावर प्रचंड ताण येतो. सर्वांत धोकादायक म्हणजे ही लक्षणं झोपेत असतानाच दबून जातात आणि मृत्यूचा धोका मात्र नकळत वाढतो… डॉक्टरांनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे तुम्हालाही धडकी भरू शकते.

झोपेत तुम्ही सुरक्षित आहात, असं वाटतं? पण सत्य त्याहून भयानक आहे. मध्यरात्री तुमच्या नकळत हृदयावर एवढा ताण येतो की, हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका दुप्पट वाढतो. रक्तदाब उसळतो, रक्तवाहिन्या आकसतात आणि शरीरातील हार्मोन्स हृदयाला थेट धक्का देतात… मग धोक्याची घंटा वाजली तरी तुम्हाला कळतही नाही.

प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. दिमित्री यारानोव यांनी नुकत्याच एका पोस्टमध्ये सांगितले की, रात्री अचानक वाढलेले हार्मोन्स, झपाट्याने उसळलेला रक्तदाब आणि घट्ट झालेल्या रक्तवाहिन्या यांमुळे हृदयावर प्रचंड ताण येतो. आणि मग छातीतील जडपणा, थकवा किंवा श्वास घेण्यास त्रास अशी बहुतेक वेळा सुरुवातीला जाणवणारी लक्षणं झोपेतच दबली जातात. परिणामी धोका दुप्पट वाढतो.

रात्री हृदयाचा धोका का वाढतो?

वैज्ञानिकांच्या मते, शरीराच्या नैसर्गिक घड्याळानुसार (Circadian rhythm) पहाटेच्या सुमारास रक्तदाब वाढतो. सामान्य व्यक्ती याला तोंड देऊ शकते; पण हृदयरुग्णांसाठी हीच वेळ ‘सायलेंट किलर’ ठरू शकते. रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, हृदय वेगाने धडधडू लागतं आणि अचानक झालेला ताण घातक ठरू शकतो.

हे झटके अधिक धोकादायक का?

रात्री झोपेत असताना सावधगिरीचा इशारा देणारी चिन्हं उशिरा कळतात आणि त्यामुळे मदत मिळण्यासाठी वेळ लागतो. त्याशिवाय शरीरातील हार्मोन्सचा प्रचंड दबाव हृदयाला आणखी कमजोर बनवतो. त्यामुळे रात्रीचे हृदयविकाराचे झटके अनेकदा जास्त तीव्र ठरतात.

धोका टाळण्यासाठी काय कराल?

  • हृदयासाठी दिलेल्या औषधांचे वेळेवर सेवन करा.
  • रक्तदाब नियमित तपासा, विशेषतः रात्री / सकाळी.
  • झोपायच्या आधी जड जेवण, मीठ आणि तणाव टाळा.
  • ध्यान, श्वसनक्रिया, हलकी व्यायामशैली अंगीकारा.
  • डॉक्टरांकडे नियमित तपासणी करून घ्या.

लक्षात ठेवा- रात्री शांत झोप मिळवायची असेल, तर हृदयासाठी सतर्क राहणं आवश्यक आहे. कारण- झोपेत येणारे झटके जीवघेणे ठरू शकतात. त्यामुळे आजपासूनच औषधं वेळेवर घ्या, रक्तदाब सांभाळा आणि हृदयाची काळजी घ्या… नाही तर तुमच्या नकळत मृत्यू तुमचा घास घेऊ शकतो.