Kitchen Tips – स्वयंपाक करणे ही काही सोपी गोष्ट नाही. मग ती भाजी असो की पोळी. दोन्हीसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते पण गोल आणि मऊ पोळ्या करण्यासाठी खूप जास्तच मेहनत घ्यावी लागते. आपल्याकडे सहसा महिलाच घरातील स्वयंपाक करतात त्यामुळे ज्या महिलेला चांगला स्वयंपाक करता येतो तिला सुगरण असे म्हटले जाते विशेषत: जर जिला गोल आणि मऊ पोळ्या लाटता येत असतील तर.

अनेकां चुटकीसरशी गोल पोळी लाटता येते पण त्यासाठी त्यांनी कित्येक वर्ष मेहनत घेतली असते. हळू हळू सराव केल्यानंतर त्यामध्ये सुधारणा होते. पण आजच्या धावपळीच्या काळात महिलांना नोकरी करायची असते, स्वयंपाकही करायचा असतो आणि घरातील इतर कामेही करायची असतात त्यामुळे फार वेळ नसतो. त्यामुळे त्या झटपट काम उरकण्यासाठी काही नाही काही जुगाड शोधून काढतात. अनेकदा आपण पाहतो की गोल पोळ्या करण्यासाठी गोल ताटली वापरून गोलाकार दिला जातो. असे जुगाड वापरून महिला हळू हळू पोळ्या लाटायला शिकतात. आज आम्ही देखील तुम्हाला सोपा जुगाड सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही झटपट पोळ्या लाटू लाटू शकता तेही अगदी गोल.

हेही वाचा – अंड्याचे कवच कचरा समजून फेकू नका! असा करा त्याचा पुन्हा वापर, जाणून घ्या भन्नाट ट्रिक

पोळ्या लाटताना कधी पीठ चिकट होते तर कधी घट्ट होते. अनेकदा पोळी लाटताना पोळी लाटण्याला चिकटते. चांगली गोल पोळी लाटली ती चिकटली तर आपली विनाकारण चिडचिड होते आणि वेळही वाया जातो. पोळी चिकटून नये म्हणून अनेकदा आपण भरपूर पीठ लावतो आणि पोळी लाटतो अशा वेळी पोळी गोल लाटली जाते पण भाजताना ती जास्त पीठामुळे पातड होऊन जाते. अशावेळी करायचं काय असा प्रश्न आपल्याला पडतो. काळजी करू नका आम्ही तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो.

हेही वाचा – तुम्हाला रेवडी खायला आवडते का मग ‘हा’ व्हायरल व्हिडीओ नक्की पाहा; आयुष्यात पुन्हा कधीही

पोळी लाटण्याआधी गॅस पेटवा आणि तुमच्या हातातील लाटणे गॅसवर ठेवा. सर्व बाजूने लाटणे थोडे गरम करा आणि त्यानंतर त्या हलक्या गरम लाटण्याने पोळी लाटा. पोळी लाटण्याला चिकटणार नाही आणि ती अगदी गोलाकार लाटली जाईल. कणकेतील ओलावा कमी करण्यासाठी ही ट्रिक उपयूक्त ठरेल. तुम्हाला जास्त पीठ न वापताही गोल आणि मऊ पोळी किंवा पराठा सहज लाटता येईल. ही ट्रिक काम करते की नाही ते तुम्ही स्वत: वापरून तपासू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(सूचना – या लेखातील माहिती सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता संकेतस्थळाचा याच्याशी काहीही संबंध नाही. लोकसत्ता संकेतस्थळ याची हमी देत नाही.)