Winter Tips: थंडीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. संध्याकाळच्या वेळेस वातावरणात गारवा वाढू लागला आहे. हिवाळ्यामध्ये आरोग्याच्या छोट्या-मोठ्या तक्रारी उद्भवतात. तापमानात घट झाल्यानं सर्दी-खोकला, ताप, त्वचेशी संबंधित विकार इत्यादी त्रास निर्माण होतात. हिवाळा येताच आपल्या शरीराची स्थिती बदलू लागते. या दरम्यान फ्लू आणि इंन्फेक्शन पसरण्याचा धोका सुद्धा खूप वाढतो. बहुदा याच कारणामुळे लोक या हंगामात जास्त आजारी पडतात. गरम-गरम कॉफी, गरम कपडे आणि गरम पाणी यांची या हवामानात मोठी गरज असते. परंतु या सर्व वस्तू आपल्या प्रकृतीसाठी किती नुकसानकारक ठरू शकतात. हे आज आपण जाणून घेऊया…

उशीरापर्यंत गरम पाण्याने आंघोळ करणे – यामुळे शरीर आणि मेंदू दोन्हीवर वाईट परिणाम होतो. गरम पाणी केराटिन नावाच्या स्किन सेल्स डॅमेज करते. ज्यामुळे त्वचेची खाज, ड्रायेनस आणि रॅशेसची समस्या वाढते.

गरम कपडे – थंडीत उबदार कपडे घातल्याने मोठा आराम मिळतो. मात्र जास्त उबदार कपडे घालून शरीराला उष्णतेचा सामना करावा लागतो.

कमी पाणी पिणे – थंडीत कमी तहान लागते. कमी पाणी प्यायल्याने बॉडी डिहायड्रेट होऊ लागते. यामुळे किडनी आणि डायजेशनची समस्या वाढते.

जास्त खाणे – या काळात आहार अचानक वाढतो. थंडीने खर्च झालेल्या कॅलरीची भरपाई, जास्त खाण्यातून केली जाते. हॉट चॉकलेट किंवा एक्स्ट्रा कॅलरीवाले फूड खाल्ले जाते. अशावेळी भूक लागल्यास केवळ फायबरवाल्या भाज्या आणि फळे खावीत.

आणखी वाचा : Health Tips: तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, राहाल आनंदी!

कॅफीन – हिवाळ्यात चहा आणि कॉफी जास्त पिणे हानीकारक ठरू शकते. कारण यामध्ये कॅफीन असते. दोन किंवा तीन कपपेक्षा जास्त कॉफी पिऊ नका.

झोपण्यापूर्वी काय करावे – एका शोधानुसार, स्लीपिंग क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी हात आणि पाय ग्लव्हजने कव्हर करा.

बेडटाइम रूटीन – या काळात दिवस छोटा आणि रात्र मोठी असते. अशा दिनचर्येमुळे सिर्काडियन सायकल डिस्टर्ब होते, तसेच शरीरात मेटालोनिन हार्मोन (झोप देणार हार्मोन) चे प्रोडक्शन सुद्धा वाढते. यामुळे झोप येते. सुस्ती वाढते. यासाठी स्लीपिंग टाइममध्येच चांगली झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

आणखी वाचा : Bad Breath: श्वासाच्या दुर्गंधीमुळे त्रस्त आहात? ‘या’ सोप्या टिप्समुळे दूर होईल दुर्गंधी!

बाहेर जाणे टाळणे – हिवाळ्यात थंडीमुळे लोक बाहेर जाणे टाळातात. याचा आरोग्यावर खूप परिणाम होतो. फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी खराब होते. लठ्ठपणा वाढतो आणि सूर्याच्या किरणांतून मिळणारे व्हिटॅमिन-डी सुद्धा मिळत नाही.

एक्सरसाइज टाळणे- थंडी जास्त असल्याने लोक एक्सरसाइज टाळतात. फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी शून्य झाल्याने इम्यून सिस्टम सुस्त पडते. यासाठी सायकलिंग, वॉकिंग किंवा इतर वर्कआऊट करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेल्फ मेडिकेशन – या हंगामात लोकांना नेहमी खोकला, ताप, सर्दीची समस्या होते. अशावेळी डॉक्टरच्या तपासणीशिवाय सेल्फ मेडिकेशन जीवघेणे ठरू शकते. ही एखाद्या गंभीर आजाराची सुद्धा लक्षणे असू शकतात. यासाठी कोणतेही औषध किंवा उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.