देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी Hero MotoCorp ने आपल्या लोकप्रिय बाइकच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीची Hero Splendor Plus आता महाग झाली आहे. या बाइकसोबतच कंपनीने काही दिवसांपूर्वीच आपली सर्वात स्वस्त बाइक Hero HF Deluxe च्या किंमतीतही वाढ केली आहे.

आणखी वाचा :- (Bajaj Pulsar चौथ्या क्रमांकावर, सर्वाधिक विक्री झालेल्या ‘या’ आहेत टॉप 10 बाइक्स)

Splendor Plus स्पेसिफिकेशन्स –
बीएस6 हीरो स्प्लेंडर स्टाइलच्या बाबतती जुन्या मॉडेलप्रमाणेच आहे. पण, बाइक नवीन डेकल्स आणि नवीन ड्युअल-टोन कलरच्या पर्यायांमध्ये आली आहे. बाइकच्या इंस्ट्रुमेंट कन्सोलवर इंजिन चेक लाइट दिल्यात. स्प्लेंडर प्लसमध्ये एक्ससेन्स टेक्नॉलॉजी आणि फ्युअल-इंजेक्शनसोबत बीएस-6 कम्प्लायंट, 97.2cc, सिंगल-सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन 8000 rpm वर 7.8 bhp ची ऊर्जा आणि 6000 rpm वर 8.05 Nm पीक टॉर्क निर्माण करते. बीएस-4 व्हर्जनच्या तुलनेत बीएस-6 इंजिनमध्ये पावर थोडी कमी झालीये. बीएस-4 इंजिनची पावर 8.24 bhp आहे.

आणखी वाचा : – (क्रेटा-सेल्टॉसच्या Turbo पेक्षा 5 लाखांनी ‘स्वस्त’! लाँच झाली ‘पॉवरफुल’ Renault Duster Turbo)

Splendor Plus नवीन किंमत –
Hero MotoCorp ने आपली Splendor Plus ही बाइक फेब्रुवारी महिन्यात बीएस-6 इंजिनमध्ये लाँच केली होती. त्यानंतर मे महिन्यात पहिल्यांदा कंपनीने या बाइक्या किंमतीत 750 रुपयांची वाढ केली, आणि आता पुन्हा एकदा ही बाइक महाग झाली आहे. Splendor Plus ही बाइक विविध व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. किंमतीत झालेल्या वाढीनंतर आता या बाइकच्या किक स्टार्ट व्हेरिअंटची एक्स-शोरुम किंमत 60 हजार 500 रुपये, तर सेल्फ स्टार्ट व्हेरिअंटची किंमत 62 हजार 800 रुपये आणि सेल्फ स्टार्ट i3S व्हेरिअंटची किंमत 64 , 010 रुपये झाली आहे.

आणखी वाचा :- ( OFFER : देशातील सर्वात स्वस्त फॅमिली कार अजून स्वस्तात खरेदी करण्याची संधी)

HF Deluxe नवीन किंमत –
याशिवाय कंपनीने आपली सर्वात स्वस्त बाइक Hero HF Deluxe च्या किंमतीतही वाढ केली असून या बाइकची बेसिक एक्स-शोरुम किंमत आता 48 हजार रुपये झाली आहे.

आणखी वाचा :- (Bajaj Pulsar चौथ्या क्रमांकावर, सर्वाधिक विक्री झालेल्या ‘या’ आहेत टॉप 10 बाइक्स)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा :- (Kia Seltos चा रेकॉर्ड मोडला, ‘या’ SUV ला जबरदस्त रिस्पॉन्स; पहिल्याच दिवशी तब्बल…)