उच्च रक्तदाबामुळे त्रस्त असणाऱ्या व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सामान्य रक्तदाब १२०/८० mmHg असणे आवश्यक असते. यापेक्षा जास्त झाल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होतो. उच्च रक्तदाबामुळे मेंदू, हृदय यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांचे नुकसान होण्याची शक्यता असते. यासह अशा रुग्णांच्या आरोग्याबाबत अनेक समस्या निर्मण होऊ शकतात. त्यातीलच एक म्हणजे उच्च रक्तदाबाचा त्रास असणे मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तणावाबरोबर जेवणावर नियंत्रण नसल्यानेही रक्तदाब वाढू शकतो. बदललेल्या जीवनशैलीमध्ये तणाव आणि जेवणाचे बिघडलेले वेळापत्रक तसेच सतत तेलकट, जंक फूड अशा पदार्थांचा समावेश यांमुळे रक्तदाबाची समस्या उद्भवते. उच्च रक्तदाब असल्यास शरीरातील रक्त प्रवाहाचा वेग वाढतो. त्यामुळे हृदयाला जास्त रक्त पंम्प करावे लागते. यामुळे हृदयावर दबाव पडतो आणि हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते.

आणखी वाचा : मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यात करावा ‘या’ गोष्टींचा समावेश; Blood Sugar नियंत्रणात ठेवण्यासाठी होईल मदत

उच्च रक्तदाब मानसिक आरोग्याला कसे प्रभावित करते

  • कामाचा ताण, वैयक्तिक आयुष्यातील समस्या यांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. अशात उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. शारीरिक हालचाल वाढवल्यास तणाव कमी होण्यास मदत मिळते. यासाठी पुरेसा व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. तणाव कमी केल्यास उच्च रक्तदाबाची समस्या देखील कमी होईल.
  • शरीरात असणारे काही हार्मोन्स तणावामध्ये रक्तदाब वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात. तसेच यामुळे हृदयाचे ठोके पण वाढतात. यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे वेळीच तणावास कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टींवर उपाय करून शांत आणि चिंतामुक्त राहण्याचा प्रयत्न करा.
  • मानसिक आरोग्य बिघडल्यास शरीरातील पूर्ण यंत्रणा बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे उच्च रक्तदाबामुळे किंवा इतर कोणत्याही कारणाने मानसिक आरोग्य बिघडणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकारिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High blood pressure can be dangerous for mental health know more pns
First published on: 09-10-2022 at 09:22 IST