Tips: उन्हाळ्यात अनेकदा घामामुळे मान काळवंडते (Dark Neck), यासाठी आपण ब्युटी पार्लरमध्ये स्क्रबिंग, क्लिन्जिंग, मसाज आणि फेशियल यासारख्या गोष्टी करून घेतो. पण असे अनेक लोक आहेत ज्यांना पार्लर किंवा स्पामध्ये जाऊन ग्रूमिंग करून घेण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. तर मानेचा काळेपणाही घरगुती उपायांनी (Home Remedies) ठीक करता येऊ शकतो. यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या स्वयंपाकघराकडे वळायचे आहे. मानेभोवतीची डार्क सर्कल दूर करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येतील ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्राय करा ‘हे’ सोप्पे उपाय

१. एलोवेरा जेलचा (aloe vera gel) वापर सर्व प्रकारच्या सौंदर्य उपचारांमध्ये केला जातो. किचन गार्डनमध्ये तुम्हाला ते सहज मिळेल. मानेला काळ करणाऱ्या एंझाइम्सला अँटिऑक्सिडंट-समृद्ध कोरफड लॉक करते. यामुळे हळूहळू मानेचा काळेपणा कमी होऊ लागतो. तुम्हाला फक्त रोज कोरफडीचे पान तोडून जेल काढायचे आहे आणि १५ ते २० मिनिटे मानेवर मसाज करायचे आहे. बाजरात रेडीमेड जेलही मिळते तेही वापरले तरी चालेल.

(हे ही वाचा: Diabetes Symptoms: ‘ही’ पाच आहेत मधुमेहाची लक्षणं, आजच करा रक्तातील साखरेची चाचणी)

२. अॅपल्ल सायडर व्हिनेगरमुळेही (apple cider vinegar) मानेचा काळेपणा कमी होतो. तुम्हाला फक्त दोन चमचे अॅपल्ल सायडर व्हिनेगर घ्यायचे आहे आणि ते चार चमचे पाण्यात चांगले मिसळायचे आहे. नंतर कापसाच्या साहाय्याने मानेच्या काळेपणावर लावा, १० मिनिटांनी धुवा. त्याचा परिणाम लवकरच दिसून येईल.

३. बेकिंग सोडा (baking soda) देखील मानेचा काळेपणा दूर करण्यास मदत करेल. तुम्हाला फक्त दोन ते तीन चमचे सोडा घ्यायचा आहे आणि पाण्याच्या मदतीने पेस्ट तयार करायची आहे. नंतर ही पेस्ट मानेवर लावायची आणि काही वेळ तशीच राहू द्यावी. कोरडे झाल्यावर ओल्या हातांनी मसाज करून स्वच्छ करावा. यानंतर मानेला मॉइश्चरायझ करायला विसरू नका.

(हे ही वाचा: कलिंगड खाण्याची योग्य वेळ काय? चुकीच्या वेळेचा किडनीवर होऊ शकतो परिणाम)

४. बटाट्याचा रस (Potato Juice)देखील मानेभोवतीचा काळवटपण कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. यात ब्लीचिंग गुणधर्म आहेत ज्यामुळे मानेची त्वचा चमकदार होते. हे करण्यासाठी, तुम्हाला बटाटा किसून घ्यावा लागेल, नंतर त्याचा रस पिळून घ्या आणि कापसाच्या साहाय्याने मानेभोवती लावा. असे काही दिवस केल्याने मानेवरील काळेपणा नक्कीच दूर होईल.

( हा लेख केवळ सामान्य माहिती प्रदान करतो. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. )

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home remedies for getting rid of dark neck ttg
First published on: 01-05-2022 at 12:53 IST