Pure Homemade Ghee: भारतीय घरांमध्ये तुपाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बहुतेक लोक तूप बाजारातून खरेदी करतात, तर काही जण आवर्जून घरी तूप बनवतात. तूप बनवण्यासाठी खूप खटाटोप करावा लागतो, ज्यात आपला वेळही खूप वाया जातो. पण तुम्हाला माहीतेय का? तुम्ही तूप प्रेशर कुकरमध्ये सहज बनवू शकता. ही पद्धत तुमचा वेळ वाचवते, शिवाय याची चवही अतिशय छान लागते. चला तर मग आज आम्ही प्रेशर कुकरमध्ये घरी तूप बनवण्याची रेसिपी शेअर करत आहोत.
प्रेशर कुकरमध्ये तूप कसे बनवायचे?
- सर्वप्रथम प्रेशर कुकरमध्ये साठवलेले लोणी टाका आणि दोन शिट्या होईपर्यंत शिजवा. त्यानंतर काही मिनिटे ते तसेच राहू द्या.
- त्यानंतर कुकर थंड झाल्यावर तो उघडा आणि मंद आचेवर लोणी शिजवा. काही क्षणात तूप सुंदर पिवळ्या रंगात दिसू लागेल, काही वेळानंतर त्याचा सुंगधदेखील येऊ लागला की गॅस बंद करा. अशा प्रकारे तुमचे शुद्ध आणि स्वादिष्ट तूप तयार होईल.
तूप खाण्याचे अनेक फायदे
तूप बनवण्याची ही पद्धत विशेषतः त्यांच्यासाठी फायदेशीर आहे, जे वेळेच्या कमतरतेमुळे बाजारातून खरेदी केलेले तूप खातात. घरगुती तूप रसायने किंवा संरक्षकांपासून मुक्त असते. घरगुती तूप आरोग्यासाठीदेखील चांगले मानले जाते.