शरीराच्या चांगल्या कार्यासाठी हार्मोन्सचे संतुलन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हार्मोन्स ही अशी रसायने आहेत जी रक्ताद्वारे अवयव, त्वचा, स्नायू आणि इतर ऊतींमध्ये संदेश वाहून शरीरातील विविध कार्यांचे समन्वय साधण्यास मदत करतात. हे सिग्नल तुमच्या शरीराला काय आणि कधी करावे हे सांगतात. हार्मोनल समस्यांमुळे सामान्य कामकाजावर परिणाम होऊ शकतो. पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये हार्मोन्स असंतुलनामुळे वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळेच हा त्रास टाळण्यासाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहावे.
हार्मोन्स आणि बहुतेक ऊती (प्रामुख्याने ग्रंथी) जे त्यांना तयार करतात आणि सोडतात ते तुमच्या अंतःस्रावी प्रणालीसाठी आवश्यक असतात. हार्मोन्स मेटाबॉलिज्म, होमिओस्टॅसिस , शारीरिक विकास, लैंगिक कार्य, पुनरुत्पादन, झोपणे-जागण्याचे चक्र इत्यादीसारख्या विविध शारीरिक प्रक्रिया नियंत्रित करतात. असे असमतोल दूर करण्यासाठी सर्व लोकांनी असे उपाय सातत्याने केले पाहिजेत. अशा उपायांबद्दल जाणून घेऊया.
(हे ही वाचा: तुमची नखेही निळी होत आहेत का? हे गंभीर फुफ्फुस-हृदय रोगाच लक्षणं असू शकत, वेळीच सावध व्हा)
हार्मोन्सच्या असंतुलनामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या समस्या
हार्मोन्सच्या असंतुलनामुळे शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. अनेक असंतुलनांना उपचारांची आवश्यकता असते, काही तात्पुरत्या असू शकतात आणि स्वतःहून निघून जातात. मुरुम, मधुमेह, थायरॉईड, लठ्ठपणा ते वंध्यत्व यासारख्या समस्यांचे कारण हार्मोन्सचे असंतुलन देखील असू शकते. चला जाणून घेऊया अशा समस्या टाळण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात?
सकस आहार घ्या
अत्यावश्यक संप्रेरकांच्या असंतुलनाची समस्या टाळण्यासाठी आहारावर विशेष काळजी घेतली पाहिजे. पौष्टिक आहार घेतल्यास शरीराच्या सर्व गरजा पूर्ण होण्यास मदत होते. फळे, भाज्या, मासे, चिकन आणि तृणधान्ये, फायबर, खनिजे आणि जीवनसत्त्वे असलेले इतर पदार्थ खाल्ल्याने हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत होते.
( हे ही वाचा: निरोगी आरोग्यासाठी रोज सकाळी प्या मधाचे पाणी; शरीराला मिळतील आश्चर्यकारक फायदे)
नियमित योगा आणि व्यायाम
नियमितपणे योगा आणि व्यायामाची सवय लावून हार्मोन्सचा समतोल राखता येतो. रोज व्यायाम करण्याची सवय लावा. जॉगिंग किंवा चालणे, पोहणे-सायकल चालवणे यांसारख्या सवयीही यात तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात. मन आणि शरीर शांत करण्यासाठी रोज ध्यानाचा सराव करा, त्याचाही फायदा होतो.
धूम्रपान आणि अल्कोहोल सोडा
धूम्रपान आणि जास्त मद्यपान हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे ओळखले जाते . याचा शरीरावर अनेक प्रकारे नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अशा समस्या टाळण्यासाठी, त्यांच्यापासून अंतर ठेवा. धूम्रपान आणि अल्कोहोल देखील हार्मोन्सच्या कार्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात. प्रत्येकाने याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.