Blue light effect on sleep: कामासाठी, अभ्यासासाठी किंवा मनोरंजन म्हणून डिजिटल उपकरणांचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यातला अविभाज्य घटक बनला आहे. दीर्घकाळ स्क्रीनसमोर बसल्याने त्याचा डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो. स्मार्टफोनपासून ते एलईडी लाईट्सपर्यंत हा विशिष्ट निळा प्रकाश डोळ्यांवर घातक परिणाम करतो. हा निळा प्रकाश आपल्या नैसर्गिक झोपेच्या चक्रात व्यत्यय आणतो. संशोधनातून असे समोर आले आहे की, बहुतेक लोक झोपल्यानंतर एका तासाच्या आत इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरतात, त्यामुळे झोपेत व्यत्यय येतो. संध्याकाळच्या वेळेस या ब्लू लाईटचा संपर्क कमी असला पाहिजे. कारण तुमच्या शरीराला झोपेसाठी नैसर्गिकरित्या तयार होण्यास आणि दर्जेदार विश्रांती मिळवण्यास मदत करण्याचा एक मार्ग आहे.
ब्लू लाईट म्हणजे नेमकं काय?
प्रकाश हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनपासून बनलेला असतो. हा ऊर्जेचा एक अदृश्य प्रकार आहे. आपले डोळे प्रकाशाच्या रंगांचे अर्थ त्यांच्यात असलेल्या ऊर्जेच्या प्रमाणानुसार ठरवतात. म्हणजेच पांढरा प्रकाश, यामध्ये सूर्याद्वारे उत्सर्जित होणारा काही प्रकाश समाविष्ट आहे.
ब्लू लाईटचा मुलांवर कसा परिणाम होतो?
मुले प्रकाशाप्रती अधिक संवेदनशील असू शकतात. एका संशोधनातून असे समोर आले आहे की, संध्याकाळच्या प्रकाशामुळे मुलांमध्ये प्रौढांच्या तुलनेत दुप्पट प्रमाणात मेलाटोनिनचे प्रमाण कमी होते. मुलाचे वय आणि विकासाचा टप्पादेखील याचे परिणाम दाखवू शकतात. ज्या मुलांनी अद्याप तारूण्य अनुभवले नाही, त्यांना मेलाटोनिनचे प्रमाण प्रौढांपेक्षा लक्षणीयरित्या जास्त होते असेही अभ्यासात आढळले आहे.
मुलांच्या झोपेवर परिणाम कसा होतो?
मुलांचा स्क्रीनचा वापर त्यांच्या उशिरा झोपण्याच्या वेळेशी संबंधित आहे. मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी झोपेचं महत्त्व लक्षात घेता रात्री मुलांना सातत्याने पुरेशी झोप मिळ आहे याची खात्री पालकांनी करणे गरजेचे आहे. स्क्रीन टाइम जास्त असेल आणि त्याचा परिणाम मुलावर होत असेल तर काही योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे.
तंत्रज्ञानावर बंधने घाला- रात्रीचे वेळापत्रक तयार करा आणि त्यात झोपेच्या एक तास आधी स्क्रीनचा वापर टाळा. झोपण्यापूर्वी वाचन, चित्रकला किंवा स्ट्रेचिंग अशा शांत करणाऱ्या पर्यायांचा वापर करा.
झोपेच्या जागी तंत्रज्ञान नको- शक्य असल्यास फोन किंवा इतर उपकरणं बेडरूमच्या बाहेरच ठेवा.
ब्लू लाईटचे फिल्टर वापरा- ब्लू लाईट फिल्टर असणारे चष्मा बनवून मिळतो. ब्लू लाईटचे फिल्टरिंग अॅपदेखील मदत करू शकतात.
सेटिंग्ज बदला- उपकरणांमध्ये नाईट मोड किंवा डार्क मोडचा वापर करा.
लाल दिव्यांचा पर्याय निवडा- लाल दिव्याच्या संपर्कामुळे मोलाटोनिन प्रो हार्मोन दाबले जात नाही. पिवळा किंवा नारिंगी प्रकाशदेखील चांगला पर्याय ठरू शकतो.
दिवसा प्रकाशाची खात्री करा- दिवसा तेजस्वी प्रकाशाच्या संपर्कात राहिल्याने सर्केडियन रिदमचे समन्वय साधण्यास मदत होते आणि झोपेच्या वेळी झोप येते. तुमच्या मुलांना दिवसा भरपूर तेजस्वी प्रकाश, नैसर्गिक प्रकाश मिळेल यावर लक्ष द्या.
ब्लू लाईट सर्केडियन रिदमवर कसा परिणाम करते?
सर्केडियन रिदम म्हणजे शरीराचे नैसर्गिक २४ तासांचे चक्र जे झोप आणि जागे राहण्याच्या चक्राचे नियमम करते. तसंच आपल्या शरीराला आवश्यक कार्ये करण्यासाठी सिग्नल देतं. सर्केडियन रिदम राखण्यासाठी प्रकाश हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि मानवी इतिहासाच्या बऱ्याच काळासाठी हा रिदम सूर्योदय आणि सूर्यास्ताशी जवळून संबंधित आहे.
इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, बदलती जीवनशैली, कामाचा ताण, अभ्यासाचा ताण अशा अनेक कारणांमुळे लोकांचा आणि अगदी लहान मुलांचाही स्क्रीन टाइम वाढला आहे. सर्व प्रकारच्या दृश्यमान प्रकाशाचा सर्केडियन रिदमवर परिणाम होऊ शकतो. मात्र, ब्लू लाईटचा प्रभाव सर्वात जास्त पडतो. ब्लू लाईट मेंदूच्या अशा भागांना उत्तेजित करते, ज्यामुळे सतर्कता येते. आपल्या शरीराचे तापमान आणि ह्रदय गती वाढते.
झोपण्यापूर्वी काही तासांत ब्लू लाईटच्या संपर्कात राहिल्याने झोपेमध्ये अडथळा येऊ शकतो. ब्लू लाईट शरीरातील मेलाटोनिनच्या उत्सर्जनाला प्रतिबंधित करतो. मेलाटोनिन हार्मोन आपल्यात एक तंद्री निर्माण करतो. हे दिवसा जागे राहण्यास प्रोत्साहन देत असले, तरी रात्री जेव्हा आपण झोपण्याचा प्रयत्न करतो तेव्हा झोप लागत नाही. संध्याकाळी ब्लू लाईटच्या संपर्कात आल्याने मेंदूला असा संदेश जाऊ शकतो की अजूनही दिवस आहे. त्यामुळे सर्केडियन रिदम विस्कळीत होते.
सर्केडियन रिदममुळे आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम होतात. चयापचय आणि नैराश्य अशा मानसिक स्थितींचा सामना करावा लागू शकतो.
ब्लू लाईटचा संपर्क कोणत्या उपकरणांमुळे येतो?
फ्लोरोसंट दिवे
एलईडी दिवे
स्मार्टफोन
टेलिव्हिजन
संगणक
ई-रीडर
व्हिडीओ गेम