Tips for keep your skin happy and glowing during hot weather : उन्हाळा असून काही दिवसांपूर्वी मुंबईसह अनेक राज्यांमध्ये भरपूर पाऊस पडला. पण, एक ते दोन दिवसांपासून पुन्हा एकदा प्रचंड उकाडा जाणवू लागला आहे. त्यामुळे प्रचंड घाम, त्वचा तेलकट होऊ लागली आहे. त्यामुळे या उष्ण आणि दमट हवामानामुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होईल याची काळजी प्रत्येकाला वाटते आहे. या हवामानात डिहायड्रेटेड त्वचा, ज्यामध्ये मुरुमे आणि निस्तेजपणा अधिक दिसून येईल, त्यामुळे तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी योग्य टिप्स फॉलो करा.

फरीदाबाद येथील वन स्किन क्लिनिकच्या संस्थापक आणि झा, एमडी, मुख्य त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टर खुशबू झा, यांनी काही हायड्रेशन टिप्स शेअर केल्या आहेत; ज्या उन्हाळ्यात दिवसभर त्वचेला थंड, शांत आणि तेजस्वी ठेवण्यास मदत करतात…

त्वचेवर हायड्रेट राहण्यासाठी क्रमाने प्रोडक्ट्स लावा (Layer hydrating products on the skin)

तुमच्या त्वचेला उष्ण आणि दमट हवामानसाठी तयार करण्यासाठी सगळ्यात आधी हायड्रेटिंग टोनर किंवा मिस्टने सुरुवात करा. त्यानंतर हायल्युरोनिक ॲसिड किंवा पॉलीग्लुटामिक ॲसिडने समृद्ध सीरम लावा, जे ओलावा टिकवून ठेवण्यासाठी स्पंजसारखे काम करते. शेवटी हलक्या हाताने जेल-आधारित मॉइश्चरायझर लावून घ्या.

ह्युमेक्टंट्स समृद्ध सीरम (Serum with humectants)

ह्युमेक्टंट्स असलेले सीरम त्वचेत ओलावा वाढवण्यास मदत करतात. हायल्यूरोनिक ॲसिड, ग्लिसरीन आणि कोरफड हे उष्ण हवामानात तुमच्या त्वचेसाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.

सनस्क्रीनवर (Sunscreen)

सनस्क्रीन थेट हायड्रेट करत नसले तरी, ते सनबर्न आणि जळजळ यामुळे होणारे ओलावा कमी होण्यास प्रतिबंध घातले . अतिरिक्त ओलावा वाढवण्यासाठी पॅन्थेनॉल, नियासिनमाइड किंवा स्क्वालेन सारख्या घटकांसह नॉन-कॉमेडोजेनिक, हायड्रेटिंग सनस्क्रीन तुम्ही निवडू शकता .

आतून आणि बाहेरून हायड्रेशन (Hydration)

कोणतेही स्किनकेअर उत्पादन पाण्याच्या कमतरतेची भरपाई पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे दररोज किमान ८ ते १० ग्लास पाणी प्या. जर तुम्हाला जास्त घाम येत असेल तर दररोज एका बाटलीत एक चिमूटभर मीठ किंवा इलेक्ट्रोलाइट पावडर घाला.

आइस रोलर्स किंवा कूल कॉम्प्रेस (Usage of ice rollers or cool compresses)

थंडगार फेस रोलर वापरणे किंवा सकाळी २ ते ३ मिनिटे कोल्ड कॉम्प्रेस लावल्याने चेहऱ्याची सूज कमी होते आणि ओपन पोर्स घट्ट होतात. उष्णता आणि प्रदूषणामुळे त्वचेला शांत राहण्यास देखील मदत होते.

वॉटर बेस मेकअप उत्पादने (water-based makeup products)

जाड फाउंडेशन आणि क्रिमी उत्पादने ओपन पोर्स बंद करू शकतात आणि घाम रोखून ठेवू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ह्युमिडिफायर लावून झोपणे (Sleeping with a humidifier on)

शक्य असल्यास तुमच्या खोलीत एअर कंडिशनर वापरल्याने रात्रीच्या वेळी ह्युमिडिफायर वापरण्याची मागणी वाढते. कारण एसीच्या कोरड्या वाऱ्यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होऊ शकते. पण, ह्युमिडिफायर त्वचा कोरडी होण्यापासून रोखतील आणि ती चमकदार आणि दमट राहू देतील.