Food for gas acidity: पोटात गॅस, आम्लपित्त आणि पोट फुगणे या समस्या आपल्या सर्वांनाच वारंवार येतात. ही समस्या पचनक्रिया खराब झाल्यामुळे असू शकते. गॅस आणि पोट फुगणे यामुळे तुम्हाला केवळ अस्वस्थताच वाटत नाही तर कधीकधी तीव्र वेदनादेखील होऊ शकतात. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट म्हणतात की बद्धकोष्ठता, गॅस, आम्लता, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) सारख्या समस्या जास्त खाल्ल्याने किंवा खूप लवकर खाल्ल्याने होतात. तुम्ही जे खाता त्याचा थेट परिणाम तुमच्या पचनावर होतो.
हेल्थ लाईनच्या मते, या सर्व पचन समस्या खराब आहार, जास्त जंक फूड खाणे, पुरेसे पाणी न पिणे, वेळेवर अन्न न चावणे, योग्य झोप न घेणे यामुळे होतात. अन्न हळूहळू खा आणि चांगले चावून खा. आहारात फायबर, हिरव्या भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्ये समाविष्ट करा. दररोज किमान ८-१० ग्लास पाणी प्या. नियमित व्यायाम करा किंवा फिरायला जा. लिंबू पाणी, ताक, आले, पुदिना आणि बडीशेप पचन सुधारते. ताण कमी करण्यासाठी, ध्यान करा आणि पुरेशी झोप घ्या. असे अनेक पदार्थ आहेत, जे पोट फुगणे कमी करण्यास आणि तुमचे पोट सपाट करण्यास मदत करतात.
आयुर्वेदिकतज्ज्ञ डॉ. सलीम झैदी म्हणाले की, पचनाची सर्वात मोठी समस्या म्हणजे बद्धकोष्ठता; ज्यामुळे शरीर दुखणे, डोकेदुखी, चिडचिड, शरीरातील कमकुवतपणा, पोटात गॅस, फुगणे, आंबट ढेकर येणे असे त्रास होतात. जर ही स्थिती दीर्घकाळ नियंत्रित केली नाही तर मूळव्याध आजाराचा धोकादेखील वाढतो. तज्ज्ञांच्या मते, काही फळांचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, पोट फुगणे, पोटातील वायू आणि आम्लता नियंत्रित होण्यास मदत होते. पोटफुगी नियंत्रित करणारी आणि पचन सुधारणारी फळं कोणते आहेत ते जाणून घेऊया.
पपई
पपईमध्ये पपेन नावाचे एंझाइम असते, जे तुमच्या पचनसंस्थेतील प्रथिने तोडण्यास मदत करते आणि पचन सोपे करते. पपईमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे दाह कमी करण्यास मदत करतात. त्यामध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठतेपासून आराम देते आणि पोटफुगी रोखण्यास मदत करते. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट म्हणतात की, जेवणानंतर १०० ग्रॅम ताज्या पपईचे तुकडे खाल्ल्याने पोटफुगी कमी होण्यास मदत होते आणि पोटातील वायू कमी होतो.
किवीने पचनक्रियेवर उपचार करा
किवी हे एक गोड आणि आंबट फळ आहे, जे खूप शक्तिशाली आहे. या फळात अॅक्टिनिडिन नावाचे एंझाइम असते, जे प्रथिने तोडण्यास मदत करते आणि पचन जलद करते. किवी हे पोटॅशियम आणि फायबरचा एक उत्कृष्ट स्रोत आहे, जे पोट फुगणे नियंत्रित करते आणि पोटातील वायू कमी करण्यास मदत करते. केळी आणि अॅवोकॅडोसारख्या पोटॅशियमयुक्त फळांप्रमाणे किवी शरीरातील सोडियमची पातळी नियंत्रित करून पाणी टिकवून ठेवण्यासदेखील प्रतिबंधित करते. किवी फळ खाल्ल्याने पोटातील सूज कमी होते आणि पोटातील वायू कमी होतो. हे फळ पचन सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
अननस
अननसमध्ये पोटॅशियम आणि ब्रोमेलेन नावाचे पाचक एंझाइम असते, जे प्रथिने तोडण्यास मदत करते आणि शरीर संतुलित ठेवते. याचे सेवन केल्याने पचनसंस्थेला आराम मिळतो. प्रथिनांच्या जलद विघटनामुळे बद्धकोष्ठता आणि पोटफुगीपासून आराम मिळतो. जेवणासोबत किंवा जेवणानंतर एक ग्लास अननसाचा रस किंवा ताज्या अननसाचे तुकडे घेतल्याने गॅस नियंत्रित होतो आणि पोट फुगण्याची समस्या कमी होते.