Viral video: दूध आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि अनेक प्रकारची खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे शरीराला पोषण मिळते. दूध प्यायल्याने शरीर मजबूत होते, पण तुम्हाला माहित आहे का की दूध उकळताना आपण काही चुका करतो, ज्या अजिबात करू नये. दूध किती वेळा उकळावे हे तुम्हालाही माहिती नसेल तर जाणून घ्या.

आपण दुध उकळताना अशा काही चुका करतो ज्यामुळे शरीराला दुधाचा पुरेपूर फायदा मिळत नाही आणि अनेक वेळा दूध उकळावे लागते. होय, बरेच लोक दूध घट्ट करण्यासाठी बराच वेळ उकळतात. त्याच वेळी, काही लोक दूध पुन्हा पुन्हा उकळण्याची चूक करतात. इतकेच नाही तर काही लोक दूध उकळू लागल्यावर गॅस कमी करतात आणि बराच वेळ उकळत ठेवतात. चला जाणून घेऊया दूध उकळण्याची योग्य पद्धत कोणती आहे.

दूध उकळण्याची योग्य पद्धत कोणती?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की, दूध जास्त वेळ उकळल्याने किंवा वारंवार उकळल्याने पोषक तत्वांचा नाश होतो. यामुळे शरीराला दुधाचे सर्व फायदे मिळत नाहीत.
  • दूध उकळण्याची योग्य पद्धत म्हणजे दूध गॅसवर ठेवल्यानंतर त्यात चमचा टाकून ढवळत राहणे.
  • जेव्ही दुधाला उकळी येईल तेव्हा लगेच गॅस बंद करा.
  • सारखं सारखं दूध उकळवू नका.
  • दूध एकदाच उकळून पहा. जर असे वाटत असेल की दूध खराब होईल तर तुम्ही ते आणखी एकदा उकळू शकता.

दूध पिताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • जेवल्यानंतर दूध प्यायची सवय असेल तर दूध हे योग्य प्रमाणातच प्या जास्त पिऊ नका. अन्यथा पचन बिघडू शकते.
  • जर तुम्ही वांग आणि कांदा खाल्ला असेल तर त्यावर दूध पिऊ नका, त्यामुळे त्वचेचे आजार होऊ शकतात.
  • मासे आणि मांसाहारासोबत दूध कधीही पिऊ नका. यामुळे त्वचेवर पांढरे डाग होऊ शकतात.

हेही वाचा >> सकाळी रिकाम्यापोटी बदाम खाताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा होऊ शकतात गंभीर परिणाम !

  • जेवणानंतर लगेच दूध पिऊ नये. यामुळे पोटात जडपणा आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
  • दुधासोबत खारट पदार्थ खाणे टाळावे.