निरोगी राहण्यासाठी फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. फळांमध्ये सर्व प्रकारची पोषक तत्वे आढळतात. त्यामध्ये जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट, खनिजे, अँटी-ऑक्सिडंट्स यांसारखे घटक असतात, जे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. मात्र, अनेकजण फळे खाण्याऐवजी रस पिणे पसंत करतात. फळांचा रस पिणे देखील फायदेशीर आहे परंतु त्यातील फळाची साल काढून टाकल्याने फायबर आणि इतर सूक्ष्म पोषक घटक दूर होतात. अशावेळी प्रश्न पडतो की, दिवसभरात किती रस पिणे फायदेशीर आहे? चला तर मग जाणून घेऊयात..
फळांचा रस फायदेशीर आहे की हानिकारक?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एक कप रसामध्ये ११७ कॅलरीज आणि सुमारे २१ ग्रॅम साखर असते. त्यामुळे काही प्रकरणांमध्ये त्याचा परिणाम शरीरावर होऊ शकतो. विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांसाठी अजिबात फायदेशीर नाही. फळांचा रस जास्त प्यायल्याने जंत होऊ शकतात. यामुळे गॅस्ट्रिकच्या रुग्णाला त्रास होऊ शकतो.
एका दिवसात किती फळांचा रस प्यावा?
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, वृ्द्ध व्यक्तींनी दररोज एक ग्लासपेक्षा जास्त रस पिऊ नये, कारण जास्त रस आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतो. त्याचा परिणाम लगेच दिसत नाही पण नंतर शरीरावर परिणाम होऊ शकतो.
रस कधी पिऊ नये?
सकाळी रिकाम्या पोटी रस पिणे टाळावे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सकाळी रिकाम्या पोटी ज्यूस प्यायल्याने पोटातील ॲसिडिटीची समस्या वाढू शकते. त्यामुळे काही खाल्ल्यानंतरच रस प्यावा. दुपारी रस पिणे फायदेशीर आहे.
हेही वाचा >> Ghee Or Butter: लोणी की तूप? उत्तम आरोग्यासाठी कशाची करावी निवड? जाणून घ्या
जर रस नसेल तर तुम्ही काय खाऊ शकता?
डॉक्टर सांगतात की जर तुम्हाला फळांचा रस जास्त आवडत असेल तर फळाचा रस काढल्यानंतर उरलेली सालही खावी कारण त्यात पोषक तत्वे असतात. तसेच रोज रस पिण्यापेक्षा फळे खावी असा सल्ला डॉक्टर देतात.