नाश्त्याला रोज काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. वेळ कमी पण काहीतरी तर करायचं असतंच. अशा वेळेस घरात ब्रेड बटर असेल तर नाश्त्याचा प्रश्न सुटतो. ब्रेड बटर, ब्रेड जॅम, ब्रेडचे सॅण्डविच असे ब्रेडचे पदार्थ पटकन होतात आणि आवडीनं खाल्ले जातात. पण म्हणून नाश्त्याला रोजच ब्रेड खायचं? मुळात ब्रेड हे आपलं स्थानिक अन्न नाही. पण सध्या आहारात ब्रेडचा समावेश बघता तो मूळ पदार्थ असल्यासारखा वाटतो. ब्रेडचे पदार्थ कधी तरी खाणं योग्य असले तरी आरोग्याचा विचार करता रोज ब्रेड खाणं आरोग्यास अपयकारक आहे. ब्रेडवर तूप लावायचे की लोणी असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर जाणून घेऊयात, तूप लावायचे की लोणी.

ब्रेडवर लोणी लावायचे की तूप?

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
Bombil Khengat Recipe In Marathi bombil fish recipe in marathi
“बोंबलाचे खेंगाट” गृहिणींनो ‘ही’ रेसिपी एकदा नक्की ट्राय करा; केस गळती होईल कायमची दूर
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या
vada pav recipe
वडापाव नव्हे! इडली वडापाव; कधी खाल्ला का? जाणून घ्या ही सोपी रेसिपी

बऱ्याच कारणांमुळे तूप आणि बटर खाणे टाळले जाते. आज आम्ही तुमच्या डोक्यातील हा संभ्रम कमी करण्यासाठी या दोन्हीमधले काही फरक आणि साधर्म्य सांगणार आहोत. यानंतर तुमच्यासाठी या दोन्हींपैकी काय योग्य आहे? हे ठरवणे तुम्हाला सोपे जाईल. तुपामध्ये कॅलरीज आणि फॅट्सचे प्रमाण बटरपेक्षा थोडे जास्त असते. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या लोकांसाठी तुपापेक्षा बटर चांगला पर्याय ठरू शकतो. प्रोटीनचे प्रमाण तुपामध्ये बटरपेक्षा जास्त असते. त्यामुळे ज्या लोक्कां प्रोटीनची जास्त आवश्यकता आहे त्यांनी तुपाचीच निवड करावी. बटर तुमची डोळे निरोगी ठेवण्यात मदत करते

लोणी आणि तूप हे दोन्ही दुग्धजन्य पदार्थ आहेत. लोण्यापेक्षा तुपाचा स्मोकिंग पॉईंट जास्त असतो, जो उच्च तापमानात शिजवण्यासाठी योग्य असतो. तुपाचा हा गुण हिवाळ्यात फायदेशीर ठरू शकतो. याशिवाय, तुपात दुधाचे घन पदार्थ नसल्यामुळे, ज्यांना लॅक्टोज किंवा दुग्धजन्य पदार्थांची समस्या आहे त्यांच्यासाठी हे विशेषतः चांगले असू शकते.

लोणी जास्त काळ फ्रेश केस ठेवाल?

लोणी जास्तवेळ फ्रेश राहत नाही. याचं कारण म्हणजे ते आंबट पदार्थापासून बनते. दही जरी आपण जास्तवेळ ठेवलं तरी ते जास्त आंबट होतं. त्यामुळे लोणी काढल्यानंतर तुम्ही ते फ्रिजरला ठेऊ शकता. फ्रिजरमध्ये लोणी घट्ट बनतं आणि ते अनेक दिवस राहू शकतं.

हेही वाचा >> १०० ग्रॅम भोपळ्याच्या बियांमध्ये दडलेत ‘इतके’ फायदे; वजनापासून ते मधुमेह व हृदयावर कसा होईल प्रभाव?

ब्रेड बटर कसे कराल?

  • सर्व प्रथम ब्रेड स्लाइसच्या कडा काढून घ्याव्या, नाही काढल्या तरी चालेल.
  • बटर घ्यावे आणि ब्रेड वर भरपूर लावून घ्यावे.
  • तवा गरम करून त्यावर ब्रेड दोन्ही बाजूने भाजून घेणे म्हणजेच शैलो फ्राय करून घेणे.
  • चला तर ब्रेड बटर तयार आहे.