Psychological Impact of Social Media Influencers : आज सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. वाढत्या सोशल मीडियाची क्रेझ अन् त्यात नवनवीन इन्फ्ल्युएन्सर आपल्याला दररोज पाहायला मिळतात. इन्फ्ल्युएन्सर म्हणजे प्रभावित करणारी व्यक्ती. इन्फ्ल्युएन्सर आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून नवनवीन माहिती देत असतो, मनोरंजन करत असतो, समाजप्रबोधन करतो, जाहिरात करतो; एकंदरीत आपला विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करतो, पण इन्फ्ल्युएन्सर यांनी दिलेली माहिती खरी आहे का? त्यांचा आपल्यावर कितपत प्रभाव होतो? त्यांच्या लहान-मोठ्या पोस्टमुळे आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो का? याचा विचार तुम्ही कधी केला आहे?

अभ्यास काय सांगतो?

सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरचा किशोरवयीन मुलांच्या वागणुकीवर कसा प्रभाव पडतो, या विषयी स्प्रिंजरनी एका अभ्यासात सांगितले होते की, इन्फ्ल्युएन्सरच्या प्रभावाखाली येऊन त्यांच्यासारखे अनुकरण करणे, स्वत:ला त्यांच्यापेक्षा कमी समजणे, आत्मपरीक्षण न करणे, स्वत:ची ओळख विसरणे इत्यादी व्यक्तिमत्त्वावर परिणाम करणारी लक्षणे काही लोकांमध्ये दिसून येतात.

Why you must never drink fruit juice on an empty stomach
तुम्ही सकाळी उठल्या उठल्या फळांचा रस पिता का? उपाशीपोटी फळांचा रस का पिऊ नये? डॉक्टरांनी सांगितले कारण…
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…

सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरचा तरुणाईच्या मानसिकतेवर कसा परिणाम होतो?

खरं तर इन्फ्ल्युएन्सरचे आपल्या जीवनावर नकळतपणे वर्चस्व आणि नियंत्रण दिसून येते आणि याचा थेट परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर दिसून येतो. सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरचा तरुणाईच्या मानसिकतेवर चांगला वाईट कसा परिणाम होतो? याविषयी लोकसत्ताने मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रश्मी जोशी यांच्याकडून जाणून घेतले.

डॉ. रश्मी जोशी सांगतात, “जे लोक आपल्या मनावर छाप पाडतात, त्याला आपण इन्फ्ल्युएन्सर म्हणतो. ही लोकं आपल्या मनात खूप लवकर घर करून जातात. त्यांची बोलण्याची शैली असेल, त्यांनी दिलेली माहिती असेल किंवा सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर जे काही कोणतेही मुद्दे लोकांसमोर घेऊन येतात; मग ते शैक्षणिक, पर्यावरणीय, सामाजिक संदेश देणारे मेसेज असेल तर या गोष्टींचा मोठा परिणाम आपल्यावर होऊ शकतो, कारण इन्फ्ल्युएन्सरकडे ती जादू असते. ते म्हणतील ती पूर्व दिशा असे मानले जाते. चांगल्या पद्धतीचे व्हिडीओ जर बनवले तर ते अतिशय उपयुक्त असतात, ज्यामुळे लोकांना योग्य मार्गदर्शन मिळू शकते. कोणत्याही विषयावर मग ते सामाजिक, आर्थिक किंवा मानसिक बाबींवर इन्फ्ल्युएन्सर उघडपणे बोलले तर त्याचा तरुणाईच्या मानसिकतेवर चांगला परिणाम पडू शकतो.”

असं म्हणतात, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. एक चांगली आणि वाईट. याविषयीसुद्धा डॉ. रश्मी जोशी सांगतात, “कोणी सोशल मीडियावर भांडणाचे व्हिडीओ अपलोड करतात, शिवीगाळ करणारे व्हिडीओ अपलोड करतात. लोकप्रिय होण्यासाठी चुकीच्या प्रकारे फोटो एडिट करतात, तेवढ्या प्रसिद्धीसाठी ते वाट्टेल ते करतात आणि अशा लोकांचे भरपूर फॉलोवर्स असेल तर त्याचा वाईट परिणाम तरुणाईच्या मानसिकतेवर होतो. प्रसिद्धीच्या नादात अनेकदा इन्फ्ल्युएन्सरलासुद्धा कळत नाही की ते काय करताहेत आणि तरुणाई यांचे अनुकरण करण्याची शक्यता जास्त असते.”

हेही वाचा : Health Special: टीबीच्या रुग्णांसाठी AI कसं उपयोगी ठरु शकतं?

डॉ. रश्मी जोशी यांनी तरुणाईच्या मानसिकतेवर परिणाम करणारे काही महत्त्वाचे घटक सांगितले आहेत.

तुलना करणे – तरुणाई अनेकदा सोशल इन्फ्ल्युएन्सरबरोबर स्वत:ची तुलना करतात. काही इन्फ्ल्युएन्सर अनेकदा त्यांचा एक फोटो काढून हजारदा एडिट करतात आणि तो कसा आकर्षित वाटेल, यासाठी भरपूर इफेक्ट्स वापरतात. अनेकदा हे इन्फ्ल्युएन्सर काल्पनिक व्यक्तिमत्त्व उभे करतात, त्यामुळे लोकांना वाटते की यांचे आयुष्य किती सुंदर आहे आणि आपलेही असे आयुष्य असावे. “ती किती सुंदर दिसते, अशी बॉडी हवी, अशी पर्सनॅलिटी हवी, असे केस हवे”, अशा गोष्टींमुळे युजरच्या संकुचित मानसिकतेवर याचा परिणाम पडतो; यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो.

आत्मसन्मानाचा त्याग करणे – आत्मसन्मान म्हणजे स्वत:चा आदर करणे. स्वत:ला महत्त्व देणे आणि समजून घेणे होय. अनेकदा इन्फ्ल्युएन्सरबरोबर तुलना केल्यामुळे ते स्वत:चे महत्त्व कमी करतात. ते स्वत:शी एकनिष्ठ राहत नाही. इन्फ्ल्युएन्सरच्या वर्चस्वाखाली ते आत्मसन्मान विसरतात आणि त्यांना बघून नको त्या गोष्टींचा विचार करतात, ज्यामुळे अनेकदा ते स्वत:वरच राग व्यक्त करतात.

मानसिक आरोग्य खालावणे – “इन्फ्ल्युएन्सर कसा बोलतो, तसं मला बोलता येत नाही, मला तसं इंग्रजी येत नाही, भाषा येत नाही, मी काही करू शकत नाही”, असे विचार वारंवार मनात येत असतील तर यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. कमीपणा वाटणे, उदास वाटणे, स्वत:ला असहाय्य समजणे यामुळे नैराश्य येण्याची शक्यता जास्त असते.

आंधळा विश्वास ठेवणे – एखादा इन्फ्ल्युएन्सर काहीतरी सांगतोय म्हणून लगेच विश्वास ठेवणे चुकीचे आहे. आपल्याला रिसर्च करणे गरजेचे आहे. वास्तविकता अनेकदा वेगळी असते. सोशल मीडियावर अनेकदा लोकांना खरं सांगितलेलं/दाखवलेलं आवडत नाही. काहीतरी वेगळं किंवा हटके दिसले तर लोक प्रभावित होतात. इन्फ्ल्युएन्सरला जेव्हा लाइक्स येतात, तेव्हा त्यांना लोकांकडून व्हिडीओ आवडल्याचं सर्टिफिकेट मिळाल्यासारखं वाटतं, त्यामुळे आपण काय लाइक करतोय हे खूप जास्त महत्त्वाचं आहे.

वर्चस्व आणि नियंत्रण – अनेकदा इन्फ्ल्युएन्सर एखाद्या ब्रॅण्डची किंवा गेमची जाहिरात करतो आणि आपल्या आवडत्या इन्फ्ल्युएन्सरने ती जाहिरात केली म्हणून आपण त्याचे अनुकरण करतो, पण त्याविषयी पडताळणी करणे खूप गरजेचे आहे. सरसकट अनुकरण करणे चुकीचे आहे. विशेषत: पालकांनी आपली मुले इन्फ्ल्युएन्सरच्या वर्चस्वाखाली येऊन चुकीच्या गोष्टी करताहेत का हे तपासले पाहिजे. कमी वयातील मुले सोशल मीडिया हाताळत असतील तर या ठिकाणी पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते.

डॉ. रश्मी जोशी सांगतात, ” एखाद्या सिनेस्टारच्या आत्महत्येची बातमी समोर आली तर त्यावर इन्फ्लुएन्सर्स आत्महत्याविषयी चर्चा करतात, वारंवार बोलतात, फोटो दाखवतात; पण अशा वेळी त्यांना फॉलो करणाऱ्या तरुण मुला-मुलींवर याचा काय परिणाम होतो, याचा विचार ते करत नाही. अशावेळी अनेक तरुण मुले-मुली माझ्याकडे यायचे आणि म्हणायचे, मला भीती वाटते, मलापण तसंच करावंस वाटतं. अशा चुकीच्या इन्फ्लुएन्सरच्या पद्धतीमुळेसुद्धा मुलांवर परिणाम होऊ शकतो.”
त्या सांगतात, ” पालकसुद्धा आमच्याकडे येतात आणि सांगतात की, सोशल साइटवर कोणाच्या तरी सांगण्यावरून आमच्या मुलाला गेमचे व्यसन लागले आहे. या बाबी समजून घेणे खूप गरजेचे आहे.

सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी?

डॉ. रश्मी जोशी सांगतात, “फक्त सोशल मीडियाचा वापर न करता तुम्ही नियमित वृत्तपत्र वाचावीत किंवा घरच्या लोकांबरोबर अनेक गोष्टींवर चर्चा करावी. एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर तुम्ही जवळच्या व्यक्तीबरोबर शेअर करा. जवळ कोणी नसेल तर तुम्ही महाराष्ट्र सरकारची हितगूज ही मोफत समुपदेशन सेवा आहे, त्यावर तुम्ही तुमचे विचार शेअर करा.
त्या पुढे सांगतात, ” फक्त युजरचं नाही तर इन्फ्लुएन्सरनीसुद्धा मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी. तुम्ही तासनतास स्क्रीन बघता तेव्हा डोळ्यांबरोबर तुमच्या बुद्धीचाही वापर करा. आपण काय बघतोय आणि त्याचा आपल्या मानसिकतेवर काय परिणाम होईल, याची काळजी घेणे गरजेचे आहे.