how to boost cucumber: उन्हाळा असो वा हिवाळा, भाज्यांमध्ये काकडी ही वर्षभर सहज उपलब्ध असते. शरीरात पाण्याची भरपूर मात्रा हवी असेल आणि कमी कॅलरीज घेऊन वजन कमी करायचे असेल, तर काकडी खूप उपयोगी आहे. काकडीत व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम व फायबर असतात, जे शरीर हायड्रेट ठेवायला मदत करतात.त्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीरातील दाह कमी करतात आणि पेशींचे संरक्षण करतात. पचन सुधारण्यापासून त्वचेपर्यंत अनेक फायदे देणारी काकडी जर काही खास पदार्थांसोबत खाल्ली, तर तिचा पौष्टिक फायदा दुपटीने वाढतो. ते कोणते ५ पदार्थ आहेत, ज्यांसोबत काकडी खाल्ल्यास आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते.

१) अ‍ॅव्होकॅडो

  • का खावे? – अ‍ॅव्होकॅडोमध्ये हेल्दी फॅट्स, फायबर व पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे काकडीतील पोषण मूल्ये अधिक प्रभावीपणे काम करतात.
  • कसे खावे? – कापलेल्या काकडी आणि अ‍ॅव्होकॅडो सॅलड तयार करून, त्यावर लिंबू आणि मिरपूड शिंपडा. हे तयार सॅलड हृदयाला निरोगी बनवते.

२) टोमॅटो

  • का खावे? – टोमॅटोमध्ये असणारे लाइकोपीन आणि व्हिटॅमिन सी त्वचेच्या आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते.
  • कसे खावे? –ऑलिव्ह ऑईल आणि हर्ब्स घालून, काकडी-टोमॅटो सॅलड बनवले, तर ते सॅलड शरीरात पाणी टिकवून ठेवते आणि शरीराची स्वच्छता (डिटॉक्स) करते. हवे असल्यास हे मिश्रण सँडविचमध्येही वापरता येते.

३) दही

  • का खावे? –दह्यात असलेले प्रोटीन, कॅल्शियम व चांगले जीवाणू पचन सुधारतात आणि काकडीतील पाण्यामुळे हा फायदा दुप्पट वाढतो.
  • कसे खावे? – थंडगार काकडीचे रायते किंवा काकडीची स्मूदी हे दही आणि काकडीच्या जोडीचे उत्तम आणि आरोग्यदायी उदाहरण आहे.

४) हरभरे

  • का खावे? – हरभर्‍यात प्रोटीन, लोह व फायबर असते. त्यामुळे काकडीसोबत हरभरे खाल्ल्यास हा आहार पौष्टिक आणि पोटभर होतो. तो आरोग्यदृष्ट्या तृप्त करणारा आहार ठरतो.
  • कसे खावे? – उकडलेल्या हरभर्‍यात काकडी, ऑलिव्ह ऑईल, हिरवी मिरची व पुदीना टाकून हलक्या हाताने मिसळा. बघा, तयार झाला हाय-प्रोटीन सॅलड.

५) पुदीना किंवा तुळस

  • का खावे? – हे हर्ब्स अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात आणि पचन सुधारण्यासाठी मदत करतात.
  • कसे खावे? –सर्वांत लोकप्रिय म्हणजे काकडी-पुदिन्याचे पाणी. तुळस-काकडी सॅलडही वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.