Parenting Tips: बालपण हा असा काळ असतो जो एकदा गेला की कधीही परत येत नाही. मुलांची कौशल्य लहानपणीच दिसून येते आणि ते आपल्या शाळेत, घरात किंवा मित्र-मैत्रिणीं किंवा नातेवाईंकांमध्ये आपल्या कौशल्यासाठी ओळखले जातात. जिथे एकीकडे आत्मविश्वासाने मुलं प्रत्येक स्पर्धेत भाग घेतात आणि वेगळी ओळख तयार करतात तिथे दुसरीकडे काही मुलांमध्ये आत्मविश्वास कमी असतो ज्यामुळे ते हातात आलेली संधी देखील सोडून देतात. कोणतीही गोष्ट करताना या मुलांना खूप संकोच जाणवतो. पालक म्हणून तुमच्या मुलांचा आत्मविश्वास कसा वाढवावा आणि त्यांना प्रोत्साहान कसे द्यावे हा एक मोठा प्रश्न असतो. काळजी करू नका आम्ही तुमची मदत करणार आहोत. आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत होईल.

मुलांचा आत्मविश्वास कसा वाढवावा?

मुलांना चुका करू द्या

जेव्हा मुलं कोणताही निर्णय घेतात तेव्हा हा विचार करून मागे हटतात की कदाचित त्यांच्याकडून काही चूक झाली तर….पण हे मुलांना स्वत:वर विश्वास ठेवून पुढे जाणे आवश्यक असते. त्यामुळे मुलांना समजवा की, ”पुढे जाण्याचा प्रयत्न न करता हार स्विकरण्याऐवजी, चुका करा, त्या चुका सुधारा द्या आणि त्यातून शिका.”

हेही वाचा – झोपण्याची आणि उठण्याची एक ठरलेली वेळ का असावी? झोपेचे वेळापत्रक पाळण्याचे फायदे जाणून घ्या

मुलांना हार स्विकारण्यास शिकवा

मुलांना लहान वयापासूनच अशी भिती असते की, जर त्यांनी काही करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ते योग्य प्रकारे जमले नाही तर लोक त्यांच्यावर हसतील आणि लोक त्यांचे मस्करी उडवतील. तुम्ही स्वत: मुलांची मस्करी करणे टाळा, मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना लाज वाटेल अशा गोष्टींपासून दूर ठेवा आणि त्यांना हार कशी स्विकारावी हे समजते.

विजय होवो की पराभव, मुलांचे कौतूक करा

जरी मुलं एखादी स्पर्धा हरले तरी, त्याला वाईट वाटू देऊ नका किंवा त्याची निंदा करू नका. पराभव आणि विजय आयुष्यात होतच असतात पण जर आई-वडिलांनी मुलांना पराभव मिळाल्याबदद्ल काही वाईट बोलले तर घाबरू लागतात. मुलाला पालकांना निराश करायचे नसते आणि म्हणूनच जर तो स्वत: ला सक्षम मानत नसेल तर तो त्याचा आत्मविश्वास गमावू लागतात.

हेही वाचा – लांब, घनदाट केस हवेत? मग कोरफडबरोबर ‘या’ गोष्टी मिसळून केसांना लावा, झटपट होईल वाढ

मुलांची तुलना करू नका

मुलांची एकमेकांबरोबर तुलना करणे एक मोठी चूक आहे जे कित्येक पालक करतात. ही तुलना मस्करीत असू शकते. खूप छोट्या छोट्या गोष्टींवरून असू शकते पण ही तुलना मुलांच्या नाजुक मनावर वाईट परिणाम करू शकते. त्यांच्यात कौशल्य असूनही स्वत:मध्ये कमी लेखतात आणि आत्मविश्वास गमावतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलांना प्रोत्साहन देत राहा

आई-वडिलांकडून मिळाणारे प्रोत्साहन मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतो. जर मुलं बाकी लोकांसमोर आत्मविश्वास गमावत असतील आणि कोणत्याही स्पर्धेत जाण्यासाठी किंवा स्टेज परफॉर्मन्स करण्याची भिती वाटत असेल तर त्यांना प्रोत्साहन देणे टाळू नका. मुलांना सांगा की ते किती चांगले सादरीकरण करत आहेत.